वयाच्या 85 व्या वर्षी दिली मधुकरराव चव्हाण यांनी इच्छूक म्हणून मुलाखत...

वयाच्या 85 व्या वर्षी दिली मधुकरराव चव्हाण यांनी इच्छूक म्हणून मुलाखत...
Published on: 
Updated on: 

उस्मानाबाद : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस इच्छुकांच्या आज मुलाखती घेण्यात आल्या. माजी मंत्री आमदार मधुकरराव चव्हाण यांनी 85 व्या वर्षी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छूक म्हणून मुलाखत दिली आहे. कॉंग्रेस त्यांच्या वाढत्या वयाचा विचार न करता त्यांच्यातील उत्साह आणि उर्जा पाहून पुन्हा त्यांना संधी देणार का ? याकडे पक्षातील अनेकांचे लक्ष लागले आहे. चव्हाण यांच्यासह एकूण 18 जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. 

कॉंग्रेसचे निरीक्षक माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, डॉ. जफर खान यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. आज झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीला समिश्र प्रतिसाद मिळाला. चार मतदारसंघातून एकूण 18 जणांनी मुलाखती दिल्या. सर्वाधिक दहा इच्छूक अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उमरगा मतदारसंघात आहेत. जालिंदर कोकणे, दत्तू भालेराव, विजय वाघमारे, संजय सर्वदे, अमर कोथंबिरे, राजेंद्र शेरखाने, अशोक सर्वदे, पांडुरंग पोळे, मत्सेंद्र सरपे, शालिनी सरपे आदींनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. 

उस्मानाबादेतून माजी जिल्हाध्यक्ष विश्‍वास शिंदे, भाऊसाहेब उंबरे, राजेंद्र शेरखाने आणि विश्‍वजित शिंदे या चौघांनी मुलाखत दिली. तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार मधुकर चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ऍड. कुलदीप पाटील यांच्यासह अन्य एका उमेदवाराने तर परंडा मतदारसंघातून एकमेव जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे इच्छूक आहेत. 

दोन मतदारसंघ राष्ट्रवादीचे 
राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील आघाडी निश्‍चित मानली जात आहे. यामध्ये तुळजापूर, उमरगा हे दोनच मतदारसंघ कॉंग्रेसच्या वाट्याला आले आहेत. उस्मानाबाद, परंडा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटतात. त्यामुळे इच्छुकांची संख्या तुलनेत कमीच होती. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com