Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राजकीय वाट चुकले की काय?

Maharashtra Politics : मंत्रिमंडळातील एका ज्येष्ठ मंत्र्याला आपले व्यक्तिगत व राजकीय मत मांडण्याचा अधिकार असतो.त्याविषयी सगळे सहमत किंवा असहमत असण्याचे कारण नाही. भुजबळ अनेकदा आपले परखड मत व्यक्त करत असतात. मात्र...
Chhagan Bhujbal News
Chhagan BhujbalSarkarnama

Chhagan Bhujbal News: ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ स्पष्ट भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी नुकतीच मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करू नये अशी मागणी केली होती.या भूमिकेला विरोधकांनी नव्हे मात्र भाजपच्या समर्थकांनीच अप्रत्यक्ष विरोध केला आहे. त्यामुळे या प्रश्नावरून महाराष्ट्रात एक नवा वाद पुढे येऊ शकतो.(Chhagan Bhujbal Political News)

महायुती सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नुकतीच मनुस्मृतीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करू नये,अशी भूमिका घेतली आहे. या भूमिकेला महात्मा फुले अखिल भारतीय समता परिषदेचा पाठिंबा आहे. या भूमिकेला राज्यातील पुरोगामी विचारांचे नेते, विविध राजकीय पदाधिकारी आणि राजकीय पक्षांचा देखील खुला पाठिंबा आहे.मात्र,त्याला विरोध भाजप आणि त्या पक्षाशी संबंधित संघटनांचा आहे.

Chhagan Bhujbal News
Porsche Crash Case: पुणे 'कार'नामा; फडणवीसांची भूमिका संशयास्पद, पटोलेंचा गंभीर आरोप

यासंदर्भात कोणत्याही प्रश्नांवर रोखठोक प्रतिक्रिया देण्यासाठी प्रसिद्ध असलेले भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी छगन भुजबळांच्या विधानांवर थेट भाष्य केले आहे. त्यात त्यांनी भुजबळ हे नेहमीच भारतीय जनता पक्षाला डिवचतात. त्यांच्या वयाचा आदर राखतो. मात्र त्यांना आवरले पाहिजे.

मंत्रिमंडळातील एका ज्येष्ठ मंत्र्याला आपले व्यक्तिगत व राजकीय मत मांडण्याचा अधिकार असतो.त्याविषयी सगळे सहमत किंवा असहमत असण्याचे कारण नाही. भुजबळ अनेकदा आपले परखड मत व्यक्त करत असतात.मात्र, आता त्यावर त्यांच्या पक्षाची युती असलेल्या एका नेत्याने भुजबळांविरोधात असे विधान करावे का?हा राजकीय वादाचा विषय होऊ शकतो.मात्र, राणे यांचे विधान निश्चितच त्यांची व भाजपची राजकीय भूमिका मांडणारी आहे. राणे यांनी ही राजकीय विचारसरणी व्यक्त करतानाच भुजबळ यांच्या समर्थकांना दुखावले असेल, असे म्हणता येईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भुजबळ आणि राणे या दोघांच्याही वक्तव्यावरून गेल्या काही दिवसांतील महाराष्ट्रातील राजकीय आंदोलने आणि भूमिका याकडे मागे वळून पाहिले पाहायला हवं.ओबीसींचे आरक्षण जसे आहे तसेच टिकले पाहिजे. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. मागासवर्गीय आणि ओबीसी यांचे आरक्षण टिकण्यासाठी इम्पेरिकल डाटा महत्त्वाचा असतो. तो डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर करावा अशी सगळ्यांची मागणी होती.मात्र,या मागणीला भाजपचा (BJP) स्पष्ट विरोध होता.

असे अनेक विषय आहेत. त्यावर भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार नकारात्मक आहे. राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी देखील त्याला विरोधच केला आहे. असे असताना भुजबळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करून अजित पवार गटासोबत गेले आहेत. अजित पवार सध्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीत आहेत. ते नेहमीच सत्तेच्या बाजूने राहिलेले आहेत. तुमची विचारसरणी काय व कोणती? हा एक प्रश्नच आहे.अशास्थितीत भुजबळ आपली वैचारिक भूमिका महायुतीमध्ये राहून किती मुक्तपणे मांडू शकतील? त्याला प्रतिसाद किती मिळेल? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

खरे तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत यावर दोन्ही राजकीय आघाडी आणि युतीमधून स्पष्ट भूमिका समोर आली आहे. काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणना, ज्याची जेवढी लोकसंख्या त्याला तेवढा सहभाग अर्थात "हिस्सेदारी" हे आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट केले आहे. काँग्रेसचा सहभाग असलेल्या बिहार सरकारने जातनिहाय जनगणना केली आहे. भुजबळ जी भूमिका राज्यात मांडतात, ती काँग्रेस आणि त्यांचे सहकारी देशभर स्वीकारतात. मग राज्यात ही भूमिका मांडणारे भुजबळ भारतीय जनता पक्षाच्या आघाडीत जाऊन आपली राजकीय वाट चुकले का? अशी चर्चा त्यांचे निकटवर्तीय आणि समर्थकांत सुरू आहे.

Chhagan Bhujbal News
NCP VS BJP : ते जास्त वाटा मागतात मग, आमचे 105 आमदार; भुजबळांच्या दाव्यावर भाजपची नेमकी भूमिका काय?

महात्मा फुले अखिल भारतीय समता परिषदेच्या माध्यमातून भूमिका श्री भुजबळ यांनी घेतली आहे. गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणा या राज्यातील काही नेत्यांची देखील आहे. भुजबळ यांच्याशी वैचारिक सख्यअसलेले उपेंद्र कुशवाहा यांनी हीच भूमिका घेऊन राष्ट्रीय समता पार्टी स्थापन केली आहे. हरियाणा राज्यात राजकुमार सैनी यांनी देखील या विचाराशी बांधिलकी असलेला स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. राष्ट्रीय राजकारणात ही सर्व मंडळी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असतात.

हा सर्व वैचारिक आणि राजकीय भूमिकांचा आढावा पाहता, श्री भुजबळ आज ज्या आघाडीत आणि पक्षात आहेत तेथे त्यांचा राजकीय कोंडमारा होण्याची शक्यताच अधिक आहे. त्यामुळे भुजबळ आपली राजकीय वाट चुकले की काय? हा त्यांच्या समर्थकांपुढे प्रश्न आहे. शिवसेना सोडण्यासाठी मंडल आयोगाच्या निमित्ताने अशीच स्थिती भुजबळ यांच्यापुढे निर्माण झाली होती. भुजबळ यांच्या राजकीय वाटचालीत ते पुन्हा त्याच वळणावर येऊन पोहोचले की काय? असे वाटते.

(Edited By Deepak Kulkarni)

Chhagan Bhujbal News
Eknath Shinde News: शिंदे जाणार? महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा...; शिवसेनेचा नेता म्हणाला, "निवडणुकीपर्यंत..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com