काँग्रेसचे सरकार संकटात; मुख्यमंत्रिपदावरुन पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर!

काँग्रेससची सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये आता मुख्यमंत्रिपदावरून संघर्ष पेटला आहे.
chhatttisgarh cm bhupesh baghel and t s singh deo meet rahul gandhi
chhatttisgarh cm bhupesh baghel and t s singh deo meet rahul gandhi
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : काँग्रेससची (Congress) सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) आता मुख्यमंत्रिपदावरून (Chief Minister) संघर्ष पेटला आहे. विद्यमान सरकारमधील आरोग्यमंत्री असलेले टी. एस. सिंहदेव (T.S.Singh Deo) यांनी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी सांगितली आहे. सिंहदेव आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) हे दोघेही दिल्लीत दाखल झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे दोघांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.  

राज्यातील बघेल सरकारने अडीच वर्षांचा कालावधी जून महिन्यात पूर्ण केला. यानंतर सिंहदेव आणि त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्रिपदासाठी दबाव आणण्यास सुरवात केली. राज्यात काँग्रेसची सत्ता डिसेंबर 2018 मध्ये आल्यानंतर अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द देण्यात आला होता, असा दावा ते करीत आहेत. यावर बघेल यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. अडीच वर्षांसाठी पदाचे वाटप आघाडी सरकारमध्ये असते. छत्तीसगडमध्ये मात्र काँग्रेसला दोन तृतीयांश बहुमत मिळाले असल्याचा युक्तिवाद बघेल यांनी केला आहे. सोबतच मुख्यमंत्रिपदाबाबत पक्ष नेतृत्वाचा निर्णय अंतिम असेल, असे सांगून त्यांनी या वादाचा चेंडू पक्ष नेतृत्वाच्या दरबारी टोलावला. 

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सचिन पायलट यांच्यातील संघर्षावर काँग्रेस नेतृत्वाला समाधानकारक तोडगा काढता आलेला नाही. विधानसभा निवडणूक तोंडावर असलेल्या पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात नवज्योतसिंग सिद्धू आक्रमक झाले होते. प्रदेशाध्यक्ष पदावरून या दोन्हीही नेत्यांमध्ये सुरू असलेला वाद टोकाला पोचला होता. त्यात आता छत्तीसगडचीही भर पडली आहे. तर, मुख्यमंत्री भुपेश बघेल हे गांधी कुटुंबियांच्या खास विश्वासातले मानले जातात. मात्र, या राज्यातही मुख्यमंत्रिपदावरून सरकारमधील भांडणे चव्हाट्यावर आली आहेत. आरोग्यमंत्री टी. एस. सिंहदेव यांनी आता उर्वरित अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदावर हक्क सांगितला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सरकार बनविताना सुरवातीचे अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद बघेल यांच्याकडे तर उर्वरित कालावधीसाठी सिंहदेव यांना देण्याचा फॉर्म्युला ठरला होता, असे सिंहदेव समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र, बघेल यांनी असा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचा पवित्रा घेतल्याने सिंहदेव यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडून नाराजी दाखविणे सुरू केले होती. त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिल्लीत धाव घेऊन पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे गाऱ्हाणे मांडण्याचा प्रयत्न केला होती. मात्र, त्यावेळी बघेल यांची सोनिया किंवा राहुल गांधी यांच्याशी भेट होऊ शकली नव्हती. सरचिटणीस प्रियांका गांधी यांची त्यांनी भेट घेतली होती. तसेच काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि छत्तीसगडचे प्रभारी पी. एल. पुनिया यांची भेट घेऊन ते रायपूरला रवाना झाले होते. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com