Solapur City Central Assembly : काँग्रेसकडील मतदारसंघासाठी राष्ट्रवादी नेत्यांमध्ये स्पर्धा; कोठेंनंतर तौफिक शेख यांनीही ठोकला शड्डू

NCP Leader Meets Sharad Pawar : तौफिक शेख यांनी तर थेट शरद पवारांकडेच ‘सोलापूर शहर मध्य मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेऊन त्याठिकाणी मुस्लिम उमेदवार द्यावा,’ अशी मागणी केली आहे.
Mahavikas Aghadi Leader
Mahavikas Aghadi LeaderSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 08 July : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी झाल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून विधानसभेसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. प्रणिती शिंदे तीन वेळा निवडून आलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर आता माकप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दावा करण्यात येत आहे.

महिनाभरापूर्वी माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kothe) यांनीही ‘शहर मध्य’मधून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर तौफिक शेख यांनी तर थेट शरद पवारांकडेच सोलापूर शहर मध्य मतदारसंघ (Solapur City Central) राष्ट्रवादीकडे घेऊन त्याठिकाणी मुस्लिम उमेदवार द्यावा,’ अशी मागणी केली आहे, त्यामुळे काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघासाठी राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा लागली आहे.

सोलापुरातील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या उपस्थितीत बारामती येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी या शिष्टमंडळाने सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची मागणी थेट पवारांकडेच केली आहे.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनीही मागणी केली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ नेमका कोणाकडे जाणार, याबाबत उत्सुकता आहे.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून तौफिक शेख यांनी 2014 मध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी घेतलेल्या मताचीही पवारांच्या भेटीत चर्चा झाली. तुम्ही 2014 मध्ये चांगली लढत दिली होती. त्या निवडणुकीकडे माझे लक्ष होते, तुमचे कामही चांगले आहे.

आपण जेव्हा उमेदवार देतो, तेव्हा त्यांची निवडून येण्याचे जबाबदारी आपल्यावरच असते, असे सांगून माझ्याकडून प्रयत्न राहतील, असे आश्वासन शरद पवार यांनी शिष्टमंडळाला दिल्याचे सांगण्यात आले.

वास्तविक सोलापूर शहर मध्य मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. सोलापूर शहर उत्तर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला गेला आहे, त्या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते महेश कोठे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांनी गेल्या दीड वर्षांपासून तयारीही चालवली आहे.

Mahavikas Aghadi Leader
Eknath Shinde Group : सोलापूरच्या डॉ. ज्योती वाघमारेंवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोपवली मोठी जबाबदारी...

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या घडामोडीत सोलापूर शहर मतदारसंघावर काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. त्यानंतर महेश कोठे यांनीही सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे, असे विधान केले होते.

कोठे यांच्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील मुस्लिम समाजाचे नेते तौफिक शेख यांनीही सोलापूर शहर मध्य मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्यावा. मतदारसंघातील मुस्लिम समाजाची संख्या लक्षात घेऊन मुस्लिम उमेदवार द्यावा, अशी मागणी केली आहे.

महाविकास आघाडीमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी तर लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून हा मतदारसंघ माकपला मिळावा, अशी मागणी केलेली आहे. लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ माकपला मिळाल्याचा दावाही त्यांनी केला होता. आडम यांनी आपली उमेदवारी जाहीर करत प्रचाराला सुरुवात केली आहे.

माजी आमदार नरसय्या आडम यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही भेट घेतली आहे. त्यातून त्यांना सोलापूर शहर मध्य मतदारसंघ मिळेल, असा आशावाद आहे. मात्र, तीन वेळा जिंकलेला सोलापर शहर मध्य मतदारसंघ काँग्रेस पक्ष सहजासहजी सोडेल का, हा खरा प्रश्न आहे.

Mahavikas Aghadi Leader
Ahbijeet Patil : अभिजीत पाटलांची मोठी घोषणा; ‘मी केवळ लोकसभेपुरता महायुतीसोबत, विधानसभेला मला सर्व पर्याय खुले!’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com