विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी काँग्रेस आक्रमक : ही तीन नावे चर्चेत!

गेल्या दहा महिन्यांपासून विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त आहे.
Amin Patel-Sangram Thopte-prithviraj chavan
Amin Patel-Sangram Thopte-prithviraj chavan Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही येत्या हिवाळी अधिवेशनाच घेण्यात यावी, यासाठी काँग्रेस पक्ष प्रचंड आग्रही आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तशी मागणीही वारंवार केली आहे. दरम्यान, अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan), संग्राम थोपटे (Sangram Thopte) आणि अमिन पटेल (Amin Patel) यांची नावे चर्चेत आहेत. यातील संग्राम थोपटे हे मंत्रीपदासाठी इच्छूक आहेत, त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात निवडणूक होणार का? आणि कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. (Congress demands to hold elections for the post of Assembly Speaker in the coming session)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यापासून राज्यातील विधानसेचे अध्यक्षपद रिकामे आहे. मधल्या काळात झालेल्या दोन अधिवेशनात हंगामी अध्यक्षांनी काम पाहिले आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी राज्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या खांद्यावर सुमारे दहा महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. तेव्हापासून विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त आहे. मधल्या काळात विधीमंडळाची दोन अधिवेशने झाली, त्यातील एका अधिवेशनात विद्यमान उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी, तर मागील अधिवेशनात शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी काम पाहिले होते.

Amin Patel-Sangram Thopte-prithviraj chavan
ईडीच्या कारवाईनंतर दानवे-खोतकर संघर्ष भडकणार?

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, भोरचे आमदार संग्राम थोपटे, मुंबईचे आमदार अमिन पटेल यांची नावे चर्चेत आहेत. यातील थोपटे यांना मंत्रीपद हवे आहे. त्यासाठी त्यांनी दिल्लीतही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. वेल्हे तालुक्यात नुकत्याच झालेल्या पक्षाच्या शेतकरी मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही तसे संकेत दिले आहेत. थोपटे हे वाघासारखे असून त्यांनी अडकून न राहत कायम मैदानात राहावे, अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच, तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, असे सांगून संग्राम थोपटे यांना लवकरच नवी जबाबदारी मिळणार असल्याचे स्पष्ट केले होते.

Amin Patel-Sangram Thopte-prithviraj chavan
विलासरावांचं 'ते' भाषण आज गाजतंय! अशोक चव्हाणांचा विरोधकांना सूचक इशारा

थोपटे मंत्रीपदासाठी इच्छूक असल्याने काँग्रेस पक्ष ही जबाबदारी कोणाकडे देणार, हे पाहणे महत्वाचे आहे. कारण, पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपण या पदासाठी इच्छूक नसल्याचे मागे सांगितले होते. त्यामुळे अमिन पटेल तरी ही जबाबदारी घेणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक तातडीने घ्यावी, यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही असला तरी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन पक्ष कसा प्रतिसाद देतात, यावरच ही निवडणूक होणार की नाही, हे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com