पक्षाची कोंडी आणि नेत्यांची मुस्कटदाबी : काॅंग्रेसच्या तक्रारींवर ठाकरेंनी केले आश्वस्त!

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासह सर्व वरिष्ठ मंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले.
Nana Patole
Nana Patolesarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांना निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही देत तो मिळवून देण्याची जबाबदारी स्वतः घेतली. परिणामी, सरकारमधील कुरबुरी घेऊन गेलेल्या काँग्रेस नेत्यांचे समाधान झाल्याचे तूर्त तरी स्पष्ट आहे. सरकारमध्ये सहभागी असतानाही कामात अडचणी येत असल्याचाही मुद्दाही काँग्रेस नेत्यांनी ठाकरे यांच्यापुढे मांडला. या महाविकास आघाडी सरकारमध्ये काॅंग्रेसची कोंडी आणि काॅंग्रेस नेत्यांचे तोंड दाबणे हे दोन्ही प्रकार मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्यात आले.

राज्यातील काँग्रेसच्या नेते, मंत्र्यांनी वर्षा या निवासस्थानी ठाकरे यांची भेट घेतली. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, (H. K. Patil) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, (Nana Patole) महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, (Balasaheb Thorat) सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, (Ashok Chavan) ऊर्जामंत्री नितीन राऊत, (Nitin Raut) महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या शिष्टमंडळात समावेश होता.

Nana Patole
राऊतांची वाणी आणि सेनेची गर्दी : त्यावर अजित पवारांनी उघडपणे ठणकावले

भाजपविरोधात फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलनाचा तीन दिवसांपूर्वी काॅंग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलनासाठी काॅंग्रेस कार्यकर्ते जात असताना पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना ताब्यात घेताना त्यांचे तोंड पोलिस अधिकाऱ्याने दाबले. मुख्यमंत्र्यांसमोर काॅंग्रेस नेत्यांनी या प्रसंगाविषयी तक्रार केली. तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्याची चौकशीची मागणी केली. महाविकास आघाडी सरकारचा किमान समान कार्यक्रम, काँग्रेसकडील खात्यांसाठी निधी, काही प्रकल्प, त्याची अंमलबजावणी यावर चर्चा करून या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे काही तक्रारी केल्याचे सांगण्यात आले.

Nana Patole
नाना पटोले १० मार्चनंतर दुरूस्त करणार सरकार…

ऊर्जा आणि इतर खात्यांना पुरेसा निधी दिला जात नसल्याची गाऱ्हाणे काँग्रेस याआधी मांडली होती. पटोले म्हणाले, "राज्यात एकत्र काम करताना तिन्ही पक्षांना न्याय मिळाला पाहिजे. मात्र, दोन वर्षे झाल्यानंतरही मंत्र्यांच्या तक्रारी होत्या. त्यात निधी मिळत नसल्याचा महत्त्वाचा मुद्दा होता. त्यावर आमची भूमिका घेऊन घेतल्यानंतर ठाकरे यांनी सकारात्मक निर्णय घेतला आणि निधी देण्याची जबाबदारी स्वत:कडे घेतली आहे. त्यामुळे ही अडचणी येणार नसल्याची आशा आहे. ऊर्जा खात्याला नेमके काय अपेक्षित आहे; हेही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले असून, सर्व मंत्र्यांच्या खात्यांचे प्रश्न मांडले. "

"भाजपने सोमय्या यांच्याकडे केवळ आरोपांचा कार्यक्रम दिला आहे. त्यांचे आरोप खरे ठरत नाहीत. भाजप नेत्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा नसून, केवळ बदनामी करायची आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

Nana Patole
Video : ईडीने मोदी आणि शहांसाठी 300 कोटी गोळा केलेत का? : नाना पटोले

भाजप नेत्यांविरोधात शिवसेनेने उघडलेल्या मोहिमेला पाठिंबा असल्याचे सांगून, खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनुसार भाजपचे नेते किरीट सौमय्या यांच्यासह अन्य नेत्यांच्या गैरव्यवहारांची आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून चौकशी व्हावी, अशी अपेक्षाही काँग्रेसच्या नेत्यांनी ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली. राऊत यांच्या सर्व आरोपांचा तपास झालाच पाहिजे, अशी भूमिकाही या नेत्यांनी घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com