काँग्रेसला धक्का! एका आमदाराच्या चुकीमुळं राज्यसभेची हातातली जागा गेली

एका आमदाराच्या चुकीमुळे काँग्रेसला राज्यसभेच्या जागेवर पाणी सोडावे लागले आहे.
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

गुवाहाटी : एका आमदाराच्या चुकीमुळे काँग्रेसला राज्यसभेच्या जागेवर पाणी सोडावे लागले आहे. आमदाराने केलेल्या तांत्रिक चुकीमुळे भाजपचा उमेदवार राज्यसभेवर निवडून गेला आहे. काँग्रेस आमदाराने मत वाया घालवल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आसाममधून भाजपचे दोन खासदार आता राज्यसभेवर गेले आहेत.

आसाममध्ये (Assam) राज्यसभेच्या (Rajys Sabha) दोन जागांसाठी निवडणूक झाली. यातील एक जागा बिनविरोध झाली तर एका जागेसाठी मतदान झाले. या निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) आमदार सिद्दीकी अहमद यांनी हा प्रकार केला आहे. काँग्रेसचे उमेदवार रिपुन बोरा यांच्या पराभवास अहमद कारणीभूत ठरले. मतपत्रिकेवर अहमद यांना 1 हा आकडा लिहायचा होता. त्याऐवजी अहमद यांनी ‘one’ असे लिहिले. त्यामुळे त्यांचे मत बाद झाले आणि काँग्रेसच्या बोरा यांचा पराभव झाला.

Congress
वाद पेटला! विधानसभेतून निलंबित होताच विरोधी पक्षनेते म्हणाले...

भाजपचे (BJP) पवित्र मार्गरिटा हे बिनविरोध निवडून आले. दुसऱ्या जागेसाठी भाजप आघाडीकडून युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल पक्षाचे राँग्वरा नार्झरे हे मैदानात उतरले होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसने बोरा यांना उतरवले होते. आसाम विधानसभेतील एकूण 126 मतांपैकी 83 मते भाजप आणि सहकारी पक्षांकडे होती. ही मते मार्गरिटा यांना निवडून आणण्यास पुरेशी होती. दुसऱ्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी 43 मते आवश्यक होती. काँग्रेससह विरोधी पक्षांकडे 44 मते होती. परंतु, अहमद यांनी त्यांचे मत वाया घालवले. यामुळे अखेर बोरा यांचा पराभव झाला आणि भाजपने दुसरी जागाही जिंकली.

Congress
इंधन दरवाढीचा वाहनचालकांना शॉक; पेट्रोल, डिझेल तब्बल 7.20 रुपयांनी महागलं

भाजपचं संख्याबळ शंभरवर

राज्यसभा निवडणुकीतील दमदार कामगिरीमुळे भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ आता शंभरवर पोचले आहे. देशात 1988 पासून पहिल्यांदाच असे घडले आहे. काँग्रेसचे राज्यसभेतील संख्याबळ दिवसेंदिवस घटत आहे. यामुळे काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. आगामी गुजरात आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी न केल्यास पक्षाचे विरोधी पक्षनेतेपद जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com