Eknath Shinde : 'त्या' वादग्रस्त विधानांना CM शिंदेंचा पाठिंबा? महायुतीतील संघर्ष आणखी उफाळून येणार

Eknath Shinde NCP ajit pawar Tanaji Sawant : राष्ट्रवादीच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य आरोग्यमंत्री सावंत यांनी केले नुकतेच केले. आता उमरगा येथील कार्यक्रम रद्द करून सावंतांच्या परंड्यात आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे उपस्थिती लावणार आहेत.
Eknath Shinde  NCP ajit pawar Tanaji Sawant
Eknath Shinde ajit pawar Tanaji Sawantsarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde : आरोग्यमंत्री, धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी अलीकडेच महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसबाबत वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यामुळे मोठे वादंग निर्माण झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सांवत यांच्यावर चौफेर टीका झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सावंत यांची कानउघाडणी केली होती, असे वृत्त समोर आले होते. मात्र त्यावर विश्वास ठेवावा की नाही, अशी घडामोड आता समोर येत आहे. महायुतीतील अंतर्गत संघर्ष उफाळून येणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येत्या 14 तारखेला हा कार्यक्रम पंरडा येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंडा हा आरोग्यमंत्री सावंत यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. हा कार्यक्रम पूर्वी उमरगा येथे होणार असल्याची चर्चा होती. मात्र उमरगा हे स्थळ बदलून कार्यक्रम परंडा येथे आयोजित करण्यात आला आहे. यामागे जशी दृश्य कारणे आहेत, तशी काही अदृश्य कारणेही आहेत.

यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल. लोकसभा निवडणुकीत सावंत हे आपल्या पुतण्याला उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही होते, मात्र जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली. भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी मिळाली. त्यावर सावंत नाराज असल्याचे त्यावेळीही दिसत होते. नंतर अलीकडेच व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे ते नाराज होते, हे उघड झाले आहे. आपल्याला ते पटलेच नव्हते, म्हणजे अर्चनाताई यांना मिळालेली उमेदवारी, त्यामुळे मी तुमच्याकडे मते मागायला आलो नाही, असे ते काही लोकांशी बोलत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

लोकसभा निवडणुकीत भूम-परंडा मतदारसंघातील मतदारांनी सावंत यांना जबर धक्का दिला. महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील या भूम-परंडा मतदारसंघातून 81 हजार मतांनी पिछाडीवर राहिल्या. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात अन्य बरेच मुद्दे होते, त्यात भर पडली ती सावंत यांच्या वक्तव्यांची. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना सहानुभूती मिळेल, अशीच विधाने सावंत यांच्या तोंडून बाहेर पडली. त्यामुळे राजेनिंबाळकर यांना सावंत यांच्या मतदारसंघातून 82 हजार मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे सावंत यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

Eknath Shinde  NCP ajit pawar Tanaji Sawant
Manoj Jarange Patil : शिंदेंचे बळकट झालेले स्थान, भाजपविषयी नाराजी अन् मनोज जरांगे पाटलांविरुद्ध आरपारची लढाई

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बैठकीत मांडीला माडी लावून बसल्यानंतर बाहेर आले की उलटी होते, असे सरंजामी थाटाचे वादग्रस्त वक्तव्य सावंत यांनी नुकतेच केले आहे. त्यामुळे महायुतीत शिवसेना शिंदे गट आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेला संघर्ष उघड झाला. महायुतीत किती अंतर्विरोध निर्माण झाले आहेत, याचे उघड प्रदर्शन झाले. सावंत यांच्यावर चौफेर टीका झाली. मुख्यमंत्री शिंदे यांनीही त्यांना बोलावून घेऊन सुनावले, अशा बातम्या समोर आल्या.

सावंत यांना मुख्यमंत्र्यांचा पाठींबा?

मुख्यमंत्र्यांनी सांवत यांना सुनावले असेल का, की सावंत राष्ट्रवादीबद्दल जे बोलले त्याला मुख्यमंत्री शिंदे यांचा पाठिंबा होता, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. उमरगा येथील कार्यक्रम रद्द करून तो परंडा येथे घेतला जात असल्याने उमरगेकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. यानिमित्ताने तरी पालकमंत्री सावंत यांचे पाय उमरग्याला लागतील, असे लोकांना वाटत होते. ज्ञानराज चौगुले हे उमरग्याचे आमदार आहेत आणि ते सलग तीनवेळा निवडून आले आहेत. शिवसेना फुटली त्यावेळी ते शिंदे यांच्यासोबत गेले. सलग तीनवेळा विजयी झाल्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली.

उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यामुळे आमदार चौगुले यांच्याविषयी मतदारसंघामध्ये नाराजी आहे, हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले होते. सलग तीनवेळा विजयी होऊनही आमदार चौगुले यांनी मंत्रिपदासाठी हट्ट धरला नाही. त्यांनी तशी मागणीही कधी केलेली नाही. असे असतानाही कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार चौगुले यांचा उमरगा मतदारसंघ टाळून पालकमंत्री सावंत यांच्या परंडा मतदारसंघाची निवड केली आहे. हा विषय आमदार चौगुले यांच्यापुरता मर्यादित नाही. उमरग्यात मुख्यमंत्री नंतरही येऊ शकतात, येतीलही.

मुख्यमंत्र्यांनी टायमिंग साधले

मुख्यमंत्र्यांनी जी टायमिंग साधली आहे ती महत्वाची आहे. सावंत यांनी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या काही दिवसांनंतर मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या मतदारसंघात जात आहेत. आपण सावंत यांच्या पाठिशी आहोत, असा संदेश मुख्यमंत्री शिंदे यांना द्यायचा आहे. शिंदे गट आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष आणखी उफाळून येईल, याचे हे संकेत आहेत. महायुती सरकारमध्ये अजितदादांची एन्ट्री झाल्यानंतरच त्यांच्या पक्षात आणि शिवसेना शिंदे गटात छुपा संघर्ष सुरू झाला होता. सावंत यांची आक्षेपार्ह वक्तव्ये, त्यापाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे यांचा त्यांच्या मतदारसंघातील दौरा, त्यातून जाणारा संदेश हा महायुतीसाठी हानिकारक ठरणारा आहे.

(Edited By Roshan More)

Eknath Shinde  NCP ajit pawar Tanaji Sawant
Eknath Shinde On Rahul Gandhi : आरक्षणावर राहुल गांधींचं मोठं विधान; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'पोटातलं खरं त्यांच्या ओठावर आलं'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com