Baramati Politics : बारामतीत 'काकांची' पॉवर दिसणार की 'पुतण्या' बाजी मारणार?

Current News About Baramati Politics : बारामती लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक ही नणंद विरुद्ध भावजय म्हणजेच विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या लढतीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.
Ajit Pawar, Sunetra Pawar, Sharad Pawar, supriya Sule
Ajit Pawar, Sunetra Pawar, Sharad Pawar, supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune Loksabha Election updates : आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून महत्त्वाच्या नेत्यांना बरोबर घेत अजित पवार सत्तेत सहभागी झाले. अजितदादांनी शिंदे - फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर करत उपमुख्यमंत्री पद स्वीकारले, त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अभेद्य असलेल्या पवार कुटुंबात फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकेकाळचे सर्वेसर्वा असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला अशी ओळख बारामतीची आहे.

पवार यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव करण्याचे अनेक प्रयत्न त्या- त्या वेळच्या विरोधकांनी अनेकदा केला होता. मात्र, पवार कुटुंबात असलेल्या एकीमुळे हे कधीही शक्य झाले नाही. मात्र, आता शरद पवार (Sharad Pawar) आणि अजितदादा (Ajit Pawar) यांच्यामध्ये पडलेल्या फुटीमुळे बारामतीचा गड जिंकण्याचे स्वप्न भारतीय जनता पक्षाने बघितले आहे. यासाठी अजित पवार यांची मदत घेऊन त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी देऊन बारामतीला सुरुंग लावण्याचा निर्धार महायुतीने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बारामतीमध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Current News About Baramati Politics

पवार कुटुंबात कधी फूट पडेल असे काही वर्षांपूर्वी कोणाला सांगितले असते, तर त्यावर कोणीही विश्वास ठेवला नसता. या कुटुंबात फूट पडल्यानंतर 'पवार विरुद्ध पवार' असा सामना रंगेल यावरही कोणाचा विश्वास बसला नसता. मात्र, यंदा होणाऱ्या लोकसभेच्या निमित्ताने ही अशक्य गोष्ट शक्य होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha constituency) यंदाची निवडणूक ही नणंद विरुद्ध भावजय अशी होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी ही लढत रंगणार आहे. या लढतीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आत्तापर्यंत कोणत्याही निवडणुकीत बारामतीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप-शिवसेना युती अशी लढत झाली आहे. यामध्ये भाजप, सेनेच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला आहे. या मतदारसंघातून शरद पवार यांनी प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवला आहे. शरद पवार दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर राज्यात त्यांचे पुतणे अजित पवार तर गेल्या पंधरा वर्षांपासून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) येथून खासदारकीची निवडणूक लढवीत आहेत. केंद्रात सुप्रिया सुळे तर राज्यात अजित पवार यांनाच मतदान करायचे हे येथील मतदारांनी ठरवून घेतल्याचे गेल्या काही निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट दिसते. latest News Maharashtra Politics

दहा वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने या मतदारसंघात विजय मिळवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. कांचन कुल (Kanchan Kool) या अजित पवारच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नातेवाईक आहेत. त्यामुळे मोदी लाटेमध्ये मतांचे विभाजन होऊन बारामतीचा गड ढासळेल असे केंद्रातील भाजपच्या नेत्यांना वाटत होते. मात्र, राज्यात अजितदादांचा दबदबा असल्याने आणि सुळे यांच्या प्रचारार्थ दादांनी आपली ताकद लावल्याने भाजप नेत्यांचे स्वप्न अर्धवटच राहिले होते.Loksabha Election updates

Ajit Pawar, Sunetra Pawar, Sharad Pawar, supriya Sule
Sharad Pawar News: मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांची टोलेबाजी; म्हणाले, माझं बोट धरून राजकारणात आले असते तर...

लोकसभा निवडणुकीला आठ ते दहा महिने अवकाश असतानाच भाजप पवार कुटुंबीयांमध्ये फूट पाडण्यात यशस्वी झाले. राज्यात भाजपबरोबर सत्तेत सहभागी झालेल्या आणि उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या अजित पवार यांना बारामती लोकसभेची जागा जिंकून आणा, अशी अटच भाजपने (BJP) घातली. ही अट मान्य करत अजितदादांनी आपले काका शरद पवार यांच्या विरोधात उभे राहत निवडणुकीचा शंख फुंकला आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघात भाजपने चांगली मते मिळविली आहेत. त्यातच आता अजित पवार भाजपसोबत गेल्याने भाजपचे बळ वाढले असून, ही लढत यंदा रंगतदार होणार हे निश्चित आहे. Loksabha Election Baramati updates

बारामती मतदारसंघात Baramati loksabha constituency अजित पवार यांची ताकद असली तरी शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग येथे आहे. गेल्या पंधरा वर्षांत खासदार म्हणून सुप्रिया सुळे Supriya Sule यांनीदेखील या मतदारसंघात आपले वर्चस्व चांगले निर्माण केले आहे. वेगवेगळ्या प्रश्नांवर तसेच विकास कामांसाठी सुळे या नेहमी आग्रही असतात. मतदारसंघातील तसेच अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांवर संसदेत आवाज उठून त्यांनी संसद रत्न आणि संसद महारत्न हे पुरस्कारदेखील मिळवले आहेत.

Ajit Pawar, Sunetra Pawar, Sharad Pawar, supriya Sule
Dharashiv Loksabha Political News: खासदारांवर तिखट हल्ला चढवत भाजप जिल्हाध्यक्षाने ठोकले शड्डू

अजित पवार यांनी भाजपच्या पाठिंब्यावर पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची जोरदार तयारी केली आहे. महायुतीच्या माध्यमातून ते निवडणूक लढणार असले तरी महायुतीमध्येदेखील सारे काही आलबेल नाही. इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshawardhan Patil) यांनी आपले राजकीय भविष्य डोळ्यांसमोर ठेवून भूमिका घेतली आहे, तर शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी तर पवार यांचा पराभव करण्याचा संकल्प सोडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच लक्ष्य करून लोकसभा निवडणूक लढविण्याचा पवित्रा शिवतारे यांनी घेतला आहे. प्रसंगी अपक्ष लढण्याची तयारी असल्याचेदेखील त्यांनी बोलून दाखवली आहे. पवारांनी केलेल्या अन्यायाच्या विरोधात भोरचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांचीदेखील शिवतारे यांनी भेट घेत ' जुन्या गोष्टी विसरू नका,' असे आवाहन केले आहे.

पुरंदरमध्ये शिवतारे यांची ताकद आहे, तर भोरमध्ये थोपटे यांचा शब्द चालतो. या लोकसभा निवडणुकीत हे दोघे कोणाच्या बाजूने उभे राहतात आणि कोणाच्या विरोधात प्रचार करतात यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. आगामी लोकसभा निवडणूक जशी सुनेत्रा पवार यांना अवघड आहे, तशी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनादेखील सोपी राहिलेली नाही. ही बाब ओळखूनच गेल्या आठवड्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांच्यासह काही जुन्या लोकांची भेट घेत आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे बारामतीमध्ये ठाण मांडून बसले असून, ही निवडणूक कशी काढता येईल यासाठीची रणनीती ते आखत आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर, भोर-वेल्हा- मुळशी आणि खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी भोर-वेल्हा-मुळशी आणि पुरंदरमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. दौंड, खडकवासला भाजपकडे आहे. तर बारामती, इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत खडकवासला आणि दौंड मतदारसंघातून सुळे यांना मताधिक्य मिळाले नव्हते. त्यावेळी भाजपने तेथे आपला उमेदवार दिला होता. मात्र, या निवडणुकीत अजितदादांचा उमेदवार रिंगणात असल्याने बारामती, इंदापूरमधील मतांचे विभाजन होणार आहे. खडकवासला, दौंडमध्ये भाजपने गेल्या निवडणुकीत आघाडी घेतली असली तरी आणि सध्या अजितदादा भाजपच्या मदतीने निवडणूक लढवत आहेत. अजितदादांचा उमेदवार विजयी झाल्यास भविष्यकाळात निर्माण होणारे धोक्याचा विचार करता या मतांमध्ये काही प्रमाणात घटदेखील होऊ शकते. सध्याची बदललेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता लोकसभा निवडणुकीत पुरंदरसह भोर - वेल्हा - मुळशीतील मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो यावरदेखील अनेक गणिते अवलंबून आहेत.

राजकारणाचे बाळकडू ज्यांच्याकडून घेतले, त्यांच्याविरोधातच आज शिष्याने निवडणुकीचे दंड थोपटले आहेत. ज्यांच्या विरोधात लढाई आहे. ती व्यक्ती राजकारणातील वस्ताद आहे. कुस्तीचे डाव शिकवताना पैलवानाला वस्ताद सर्व डाव शिकवत नाही. एक डाव हा स्वतःकडे राखून ठेवत असतो. तसाच काही डाव राजकारणातील वस्ताद असलेल्या शरद पवार यांनी आपल्याकडे ठेवला आहे की नाही, याचा उलगडा या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच होणार आहे.

R

Ajit Pawar, Sunetra Pawar, Sharad Pawar, supriya Sule
Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ लोकसभेच्या आखाड्यात बंटी -मुन्नाचीच कुस्ती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com