Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ लोकसभेच्या आखाड्यात बंटी -मुन्नाचीच कुस्ती

आगामी लोकसभा निवडणुकीत Lok Sabha Election 2024 महाविकास आणि महायुतीचा उमेदवार कोणीही असला तरी कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे आमदार सतेज पाटील विरुद्ध भाजपचे खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक असा संघर्ष निश्‍चित आहे
Lok Sabha Election 2024 कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक सतेज पाटील धनंजय महाडिक
Lok Sabha Election 2024 कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक सतेज पाटील धनंजय महाडिकSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात नेहमीच बंटी-मुन्नाचा संघर्ष राहिला आहे. राज्यातील सर्वात जास्त लक्षवेधी लढत म्हणून कोल्हापूर दक्षिणच्या निवडणुकीकडे Election पाहिले जाते. राजकारणातील कट्टर विरोधक राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील या दोन गटांत होणारी लढत अत्यंत तुल्यबळ आणि राजकीय दर्शनी पार पडत असते.

आगामी लोकसभा निवडणुकीत Lok Sabha Election 2024 महाविकास आणि महायुतीचा उमेदवार कोणीही असला तरी कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे आमदार सतेज पाटील विरुद्ध भाजपचे खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक असा संघर्ष निश्‍चित आहे. Lok Sabha Election Analysis Western Maharashtra Kolhapur South Constituency

कोल्हापूर दक्षिणचे राजकारण का आले केंद्रस्थानी

काँग्रेसचे ऋतुराज पाटील Ruturaj Patil हे कोल्हापूर दक्षिणचे आमदार आहेत. माजी आमदार अमल महाडिक यांचा पराभव करत त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. वास्तविक पाहता 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचे Congress नेते सतेज पाटील यांचा पराभव अमल महाडिक यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात कोल्हापूर दक्षिणचे राजकारण केंद्रस्थानी आले. २००९ मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आला.

त्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक Dhananjay Mahadik असा सामना या मतदारसंघात झाला. त्यात पाटील यांनी बाजी मारली. पण २०१४ मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्याचा बदला म्हणून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी आघाडी धर्म फाट्यावर मारत धनंजय महाडिक यांना पराभूत केले.

सध्या या मतदारसंघात दोन्ही गटांची ताकद तुल्यबळ आहे. आमदार सतेज पाटील गटाने या मतदारसंघात संघटनात्मक बांधणी केली आहे. शहरातील दक्षिणेतील उपनगरांवर दोन्ही गटाचे असलेले वर्चस्व आणि ग्रामीण भागात सतेज पाटील गटाची असलेली ताकद यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या Maha Vikas Aghadi पारड्यात अधिक मते टाकेल, असा अंदाज आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत त्याची झलक मिळाली आहे.

वाचा - कोल्हापूर उत्तरचे विश्लेषण

Lok Sabha Election 2024 कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक सतेज पाटील धनंजय महाडिक
Lok Sabha 2024 Kolhapur North: भाजप-सेनेची मतं निर्णायक, पण 'या' कारणामुळे राहील राजकीय बेरजेचे आव्हान

कोल्हापूर दक्षिणमध्ये गटातटाची ताकदच महत्त्वाची

या मतदारसंघात पक्षीय तातडीपेक्षा गटातटाची ताकदच अधिक महत्त्वाची आहे. मात्र, अलीकडच्या काळात भाजपने काही ठिकाणी संघटनात्मक बांधणी करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचा अल्पमताधिक्याचा टक्का कोणाच्या पारड्यात पडणार हे आत्ताच सांगणे कठीण आहे. मात्र, निष्ठावंत महाविकास आघाडीचे साथ देतील यात शंका नाही.

गेल्या सहा महिन्यांपासून माजी आमदार अमल महाडिक यांनी भाजपला Bharatiya Janata Party सोबत घेऊन विधानसभेची तयारी ठेवली आहे. शेवटच्या टप्प्यात निधीची बरसात केली आहे. या मतदारसंघात भाजपचा पारंपरिक मतदारही लक्षणीय आहे. शिवाय शाहू कारखान्याच्या निमित्ताने ग्रामीण भागात समरजित घाटगे यांच्याशी नाळ जोडलेला सभासद या ठिकाणी लक्षणीय आहे. शहरी भागात हा मतदार तुलनेत अधिक आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये काटाजोड लढत होईल, असा अंदाज आहे.

वाचा - काय निघणार कोल्हापूरच्या सहा मतदारसंघांच्या मंथनातून

Lok Sabha Election 2024 कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक सतेज पाटील धनंजय महाडिक
Kolhapur Politics : लोकसभेतील एकी विधानसभेत ठरणार डोकेदुखी; कोल्हापूरच्या 6 मतदारसंघाचे 'असे' आहे राजकीय गणित

मागील लोकसभा निवडणुकीत 'आमचं ठरलंय' हा फॅक्टर कोल्हापूरच्या राजकारणाला दिशा दाखवणारा ठरला. मात्र, यंदा हा फॅक्टर पूर्ण क्षमतेने चालेल याची शक्यता कमी आहे. शहरी भागात भाजपचा मतदार लक्षणीय आहे, तर मतदारसंघातील प्रत्येक गावात काँग्रेसचा मजबूत गट आणि प्रचार यंत्रणा कार्यान्वित आहे. त्यामुळे तळागाळात काँग्रेसची यंत्रणा पोहोचण्यास उशीर लागणार नाही.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गटातटाला महत्त्व अधिक आले असले तरी या मतदारसंघात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास भाजपची यंत्रणा काही अंशी यशस्वी झाली आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा काही अंशी अधिक लोकसभा निवडणुकीत भाजपकडे कल असल्याचा अंदाज आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com