
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सुक्ष्म नियोजन करत मास्टर प्लॅन तयार केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर दिल्लीची निवडणूक लढवण्याचा निर्धार भाजपने केला आहे. दिल्लीतील मतदानासाठी अजून दोन आठवड्यांचा कालावधी आहे. त्यामध्ये भाजपने प्रचाराचा धडाका लावला आहे.
प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन ते चार प्रचार रॅली घेणार आहेत. यामध्ये एक रॅली उत्तर पश्चिम दिल्ली, दुसरी रॅली उत्तर पूर्व दिल्ली आणि तिसरी रॅली दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम दिल्लीत होईल.
मोदींनी दिल्ली काबीज करण्यासाठी भाजपच्या (BJP) दिग्गज नेत्यांचा प्रचारक म्हणून समावेश केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल, धर्मेंद्र प्रधान, हरदीप सिंह पुरी, गिरीराज सिंह हे दिल्लीत भाजप उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत.
तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि इतर भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही दिल्लीत प्रचारासाठी येतील.
27 आणि 30 जानेवारी तसेच 2 किंवा 3 फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांच्या रॅलीचे आयोजन करण्याची सुरू आहे. योगी आदित्यनाथ यांच्या दिल्लीत 14 निवडणूक रॅली होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एक रॅली आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. भाजप आपल्या स्टार प्रचारकांच्या माध्यमातून दिल्लीतील समाजातील विविध घटकांना लक्ष केद्रींत करत आहे.
पंतप्रधान मोदींनी (PM Modi) मागील काही दिवसांपूर्वी दिल्लीत रोहिणीत एका सभेत बोलतांना, निवडणूक प्रचाराचा बिगुल फुंकला होता. दिल्लीच्या मुद्द्यांवर केजरीवाल यांना घेरणारे माजी मंत्री स्मृती इराणी आणि अनुराग सिंग ठाकूर, खासदार हेमा मालिनी हे देखील स्टार प्रचारक आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.