शिंदे-फडणवीसांनी आदित्य ठाकरेंची कोंडी केली; मात्र, त्यांच्याच दोन नेत्यांचे टेन्शन वाढले

Winter Session News : हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्यात आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) पुढाकार घेतल्याचे दिसले.
Aditya Thackeray, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Aditya Thackeray, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama

Winter Session News : हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्यात आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) पुढाकार घेतल्याचे दिसले. महापुरुषांची बदनामी आणि मुख्यमंत्र्यांवरील आरोपांवर घोषणाबाजी देण्याचे काम आदित्य यांनी केले. याआधी आदित्य स्वतः पुढाकार घेऊन घोषणा देत असल्याचे पाहण्यात आले नव्हते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून आदित्य ठाकरे हे पुढे येताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांना घेरण्याची तयारी शिंदे-फडणवीस सरकारने केली, मात्र, त्यांच्याही दोन नेत्यांचे टेन्शन वाढले.

लोकसभेत बोलत असताना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी देशातील वाढत्या व्यसनाधीनतेचा प्रश्न मांडला. या प्रश्नावेळी बोलत असताना त्यांनी अचानक सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण बाहेर काढले. ''या प्रकरणात सीबीआयचा तपास कुठपर्यंत आला? १० जून २०२० रोजी सुशांतच्या लॅपटॉपशी छेडछाड झाली होती? रिया चक्रवर्ती ही महाराष्ट्रातील एका राजकारणाच्या संपर्कात होती, असे सवाल शेवाळे यांनी उपस्थित केले. तसचे रियाला AU नावाच्या व्यक्तीकडून ४४ फोन आले होते, असा गोप्यस्फोट केला.

Aditya Thackeray, Eknath Shinde, Devendra Fadnavis
भुमरेंचे टेन्शन वाढणार : आदित्य ठाकरेंचा दौरा फलदायी ठरला; दोन मोठी गावे शिवसेनेने हिसकावली!

तसेच बिहार पोलिसांच्या चौकशीत हे नाव आदित्य उद्धव असल्याचे समोर आले होते. मुंबई पोलिसांच्या तपासात हे नाव अनन्या उद्धव असे सांगण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्र आणि बिहार पोलिसांचा निष्कर्ष वेगळा-वेगळा आहे. ही बाबा शेवाळे यांनी लोकसभेत मांडली. त्यानंतर महाराष्ट्रात या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले. त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हा विषय विधीमंडळात उचलून धरला.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव वारंवार का येत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेवाळे हे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटपैकी एक होते. त्यामुळे शेवाळे आरोप करत असतील तर आदित्य यांची दिशा सालियन आणि सुशांत सिंग प्रकरणात नार्को टेस्ट करा, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली. हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातील एनआयटी जमिन वाटप प्रकरण गाजत असताना, आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आरोप केल्यामुळे अधिवेशनाचा सूरच बदलला.

भाजप आमदार अमित साटम यांनी एसआयटी स्थापन करुन चौकशी करण्याची मागणी. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी करणार असल्याची तातडीने घोषणा केली. मात्र, यावर विरोध करताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचीही एसआयटी गठीत केली जावी, अशी मागणी केली. आम्ही सत्तेत असतानाच दिशाचा मृत्यू झाला. त्या वेळी विरोधकांनीच हे प्रकरण सीबीआयकडे जावे, यासाठी आंदोलन केले होते, असे पवार यांनी सांगितले.

आता सीबीआयनेच तिची आत्महत्या झाली होती, असा निष्कर्ष काढल्यानंतर त्यात एसआयटी नेमण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच पूजा चव्हाण प्रकरणात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मग आता या प्रकरणाचीही एसआयटी नेमावी, अशी मागणी पवार यांनी केली. त्यामुळे शिंदे गटातील नेते मंत्री संजय राठोड यांचे टेन्शन वाढले.

Aditya Thackeray, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Danve-Sattar News : दानवेंसोबत जेवणाच्या टेबलावर सत्तारांकडून मुलाच्या आमदारकीसाठी फिल्डिंग ?

विधानसभेत दिशा सालियन मृत्यू प्रकरण गाजत असताना तिकडे विधानपरिषदेत आमदार मनिषा कायंदे यांनी राहूल शेवाळे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप होते, असा आरोप केला. त्यामुळे त्यांचीही एसआयटी नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. या मागणीनंतर सभागृहात बराच गदारोळ झाला. त्यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शेवाळे यांच्या आरोपासंदर्भात एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देशच दिले. त्यामुळे तेही अडतणीत आले. या प्रकरणामुळे शेवाळे यांच्यासह राठोड यांचेही टेन्शन वाढले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com