Maharashtra Political News : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवडकर अमित गोरखे हे भाजपकडून निवडून आले. त्यांना ही संधी मिळण्यात भाजपचे चाणक्य देवेंद्र फडणवीस कनेक्शन आहे. आगामी विधानसभेला हिंदू-मातंग मते खेचण्याचे गणितही त्यामागे आहे. मात्र आता भाजपला त्यांचा विधानसभा की महापालिका निवडणुकीत फायदा होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत देशातील सत्तेची भाजपने हॅटट्रिक केली. मात्र त्यांनी महाराष्ट्रात सपाटून मार खाल्ला. त्याचे डॅमेज कंट्रोल सुरू झाले आहे. विधान परिषदेसाठी गोरखेंसह पाचजणांना दिलेली उमेदवारी हा त्याचा एक भाग आहे. गोरखेंच्या उमेदवारीमागे त्यांच्या हिंदू-मातंग समाजाची एकगठ्ठा मते खेचण्याचा भाजप आणि फडणवीसांचा डाव आहे.
दरम्यान, या समाजाला विधानपरिषदच नाही, तर राज्यसभेतही अद्याप संधी देण्यात आली नव्हती. आता गोरखे यांच्या रुपाने विधान परिषदेला संधी देवून भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित साधण्याचा प्लॅन आखल्याची चर्चा आहे. तर लोकसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे Pankaja Munde यांनाही विधान परिषेदवर संधी देऊन ओबीसी मतांची बेगमी करण्याचा आणि वंजारी मतदारांतील नाराजी दूर करण्याची खेळी फडणवीसांची खेळली आहे.
गोरखे हे फडणवीसांच्या Devendra Fadnavis अत्यंत निकटचे आणि कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ते पंकजा मुंडेंसारखे 'मास लीडर' नाहीत. त्यांचा पिंपरी-चिंचवडमध्येही उल्लेखनीय असा करिष्मा नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत उद्योगनगरीत आमदार झालेल्या गोरखे यांचा अपेक्षित फायदा पक्षाला होणार नाही. मात्र भाजपला त्याची चिंताही नाही. भाजपकडे पालिका निवडणूक जिंकून देणारे दादा नेते आहेत.
गोरखेंच्या आमदारकीचा फायदा विधानसभा निवडणुकीत करून घेण्याचा डाव भाजपचा आहे. तेथे लोकसभेसारखे पानिपत होऊ न देण्यासाठी त्यांची ही चाल आहे. त्यामागे मातंग समाजाची मते विधानसभेला खेचण्याचीही खेळी आहे. त्यासाठीच विधान परिषदेची उमेदवार जाहीर करताना त्यांनी `यूपी`तील `बसप`प्रमाणे सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला आहे.
गोरखेंच्या आमदारकीमागं विधानसभेचं गणित
गोरखेंना विधान परिषदेवर संधी दिल्याचा फायदा भाजपला पक्ष संघटनेतही तेवढा होणार नाही. तसेच पिंपरी वगळता शहरातील चिंचवड आणि भोसरी या मतदारसंघात म्हणजे उर्वरीत शहरात त्यांची तेवढी ताकद दिसत नाही. त्यातूनच ते पिंपरी राखीव मतदारसंघातून विधानसभेला इच्छुक होते. मात्र, तेथे युतीतील राष्ट्रवादीचे आमदार असल्याने त्यांना तिकिट मिळण्याची शक्यता कमीच होती. त्यामुळे विधान परिषद ही त्यांना लॉटरीच लागली आहे. तशीच ती पिंपरी-चिंचवड शहरालाही लागली आहे. दोन वर्षापूर्वीच शहरातील उमा खापरेंना विधान परिषदेवर घेण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.