Dindori Lok Sabha : कुटुंबियांचे मनोमिलन भारती पवारांच्या पथ्यावर पडणार?

Dr. Bharati Pawar : भाजपच्या महाराष्ट्रातील 'ऑपरेशन लोटस' चा भाग म्हणून निर्माण झालेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या गटांचे दिंडोरी मतदारसंघात अस्तित्व आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकणे पवार आणि भाजप दोघांसाठीही अत्यंत प्रतिष्ठेची आहे.
Bharati Pawar
Bharati PawarSarkarnama
Published on
Updated on

Dr Bharti Pawar News : कळवण विधानसभा मतदारसंघात दिवंगत ए. टी. पवार यांचा विशेष राजकीय प्रभाव आहे. या मतदारसंघात प्रदीर्घकाळ ए. टी. पवार कुटुंबातील आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत या कुटुंबाच्या भूमिकेला महत्त्वाचे स्थान असते.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातून (Dindori Constituency) भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार डॉ भारती पवार उमेदवार आहेत. या निवडणुकीची दोन वैशिष्ट्य आहे डॉ पवार (Dr. Bharati pawar ) या केंद्रीय राज्यमंत्री आहेत. दुसरे म्हणजे भाजपच्या महाराष्ट्रातील 'ऑपरेशन लोटस' चा भाग म्हणून निर्माण झालेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या गटांचे दिंडोरी मतदारसंघात अस्तित्व आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकणे पवार आणि भाजप दोघांसाठीही अत्यंत प्रतिष्ठेची आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) (येवला), दिलीप बनकर (Dilip Bankar) (निफाड), नरहरी झिरवळ (Narhari Zirval) (दिंडोरी), नितीन पवार (Nitin Pawar) (कळवण) आणि सुहास कांदे (नांदगाव) हे पाच आमदार अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटाचे आहेत. चांदवड येथे भाजपचे डॉ राहुल आहेर (Rahul Aher) आमदार आहेत. त्यामुळे संबंध मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचा राजकीय प्रभाव असल्याचे चित्र कागदावर आहे. प्रत्यक्षात भाजपला या निवडणुकीत खूप परिश्रम घ्यावे लागतील असे चित्र आहे.

राज्यमंत्री भारती पवार या कळवण विधानसभा मतदारसंघाच्या प्रतिनिधी आहेत. या मतदारसंघात सध्या त्यांचे दीर आणि अजित पवार गटाचे नितीन पवार (Nitin Pawar) हे आमदार आहेत. मात्र पवार कुटुंबात टोकाचे राजकीय वैर होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळू नये म्हणून पडद्यामागून विरोध करण्यात आमदार नितीन पवार आघाडीवर होते. त्यामुळेच डॉक्टर पवार यांना राष्ट्रवादीला रामराम करून भाजपची उमेदवारी घ्यावी लागली होती. कळवणमध्ये डॉक्टर पवार आणि नितीन पवार यांचे कार्यकर्ते देखील परस्परांचे राजकीय विरोधक आहेत. या स्थितीत कळवणमध्ये भारती पवार यांना निवडणूक सोपी नव्हती.

Bharati Pawar
Dindori Constituency : पवार घराण्यातील जावा तपानंतर भेटल्या, गळ्यात पडल्या अन् गहिवरल्या

भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांच्या पुढाकाराने डॉ पवार यांनी आपला मार्ग सुरळीत करण्यासाठी एक मोठा डाव टाकला त्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. पवार कुटुंबिय त्यांच्यातील राजकीय वैर विसरून आता एकत्र आले आहेत. कळवणमध्ये डॉक्टर पवार यांच्या प्रचारासाठी आमदार नितीन पवार पुढाकार घेणार आहेत. या निर्णयाने कळवण मतदार संघातील राजकीय चित्र बदलणार आहे. उमेदवार डॉ पवार यांना त्याचा मोठा राजकीय लाभ होईल. या मतदारसंघातून 2019 मध्ये डॉक्टर पवार यांना अवघ्या 5000 मतांची आघाडी होती. अन्य मतदारसंघाच्या तुलनेत ती अत्यंत अल्प म्हणावी लागेल.

यंदाच्या निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर राजकीय मुद्दा आहे. विरोधकांकडून भारतीय जनता पक्षाला (BJP) अडचणीत आणण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मांडले जात आहेत. या राजकीय प्रचारात भाजपला आघाडी घेण्यासाठी सहकारी पक्षांच्या राजकीय समन्वयाची निकड होती. महायुतीतील अजित पवार गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट सक्रिय झाल्यास भाजपला निवडणूक सोपी होणार आहे. त्या दृष्टीने ए. टी. पवार कुटुंबाचे मनोमिलन एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या माध्यमातून भाजपची प्रचार यंत्रणा अधिक सक्षम व सक्रिय होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे भारती पवार यांना आता अन्य मतदारसंघांमध्ये अधिक लक्ष घालता येईल. महाविकास आघाडीच्या उमेदवारालाही या मनोमिलनाने राजकीय अडचणी उभ्या राहतील प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू होणार असल्याने दिंडोरी मतदारसंघाच्या राजकारणात डॉ भारती पवार यांचा तो मास्टर स्ट्रोक ठरू शकतो.

Bharati Pawar
Dindori Constituency 2024 : छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात डॉ. भारती पवार किती आघाडी घेणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com