
Donald Trump and Elon Musk Disagree Over Legislative Policy : टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू सल्लागारांपैकी एक आहेत. शिवाय, त्यांची मैत्रीही जगजाहीर आहे. परंतु आता दोन मित्र दुरावल्याचे दिसत आहे. मस्क आणि ट्रम्प यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. कारण, मस्क यांनी ट्रम्प सरकारमधील डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशिन्सी अर्थात DOGE टीममधून बाहेर पडणे पसंत केले आहे. त्यांनी आपलं पद सोडलं आहे.
आता यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत. ज्यातून ट्रम्प आणि मस्क यांच्यात दुरावा निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे. याचे मुख्य कारण एक विधेयक मानले जात आहे, जे DOGEची काम करण्याची क्षमता बिघडवू शकते. यावरून मस्क यांनी नाराजी व्यक्त करत, यावर टीकाही केली होती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आर्थिक विधेयक वन बिग ब्यूटीफुल बिल अॅक्ट आणण्याची घोषणा केली आहे. ज्याअंतर्गत मल्टी ट्रिलियन डॉलरच्या कर सवलती, संरक्षण खर्चात भारी वाढ आणि इमिग्रेशन नियंत्रण उपायांशी संबंधित खर्च समाविष्ट करण्यात आला होता. हे सरकारी खर्च वाढवणारे विधेयक आहे. या विधेयकाबाबत इलॉन मस्क यांनी म्हटले होते की, हे विधेयक सरकारी तूट कमी करणार नाही, तर आणखी वाढवेल. यामुळे DOGEचे काम कमकुवत होईल.
याशिवाय मस्क यांनी म्हटले आहे की, मला वाटते हे एक विधेयक मोठे किंवा सुंदर असू शकते, परंतु दोन्ही नाही. यावर ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत ओवल ऑफिसमध्ये म्हटले होते की, मी याच्या काही भागांवर खूश नाही, परंतु आम्ही पाहू पुढे काय होते.
‘वन बिग ब्यूटीफुल बिल अॅक्ट’मध्ये अनेकप्रकारच्या बाबींचा समावेश होतो. ज्यात, २०१७च्या कर कपातीस पुढील दहा वर्षांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. सीमा सुरक्षेच्या खर्चात वाढ, आरोग्य सहाय्यावर कडक नियम लागू केले जातील. स्वच्छ उर्जा कर सरवलती कमी केल्या जातील. सामाजिक सुरक्षा कार्यक्रमात संभाव्य कपात केली जाईल. हे विधेयक ट्रम्प यांच्या घोषित योजनांचा एक भाग आहे. ज्यास ते सुवर्णयुगाची सुरूवात मानतात.
अनेक तज्ञांचा विश्वास आहे की, वन बिग ब्युटीफुल बिलामुळे देशाची तूट वाढू शकते. एका अंदाजानुसार, आगामी दहा वर्षांत हे विधेयक तूट चार ट्रिलियन डॉलर्सने वाढवू शकते. तथापि, व्हाईट हाऊसचा असा विश्वास आहे की, या विधेयकामुळे १.६ ट्रिलियन डॉलर्सची बचत होईल. यामुळे आर्थिक विकासाला ५.२ टक्के वाढ मिळेल.
हे विधेयक २१५-२१४ मतांनी पारित झाले, जे की अतिशय कमी बहुमताने पारित झाले होते. रिपब्लिकन पार्टीतही मतभेद दिसून आले, खासकरून fiscal hawksने याचा विरोध केला. सिनेटमध्ये आता यावर चर्चा होईल, जिथे यावर संशोधन केले जावू शकते किंवा पूर्णपणे फेटाळले देखील जावू शकते.
DOGE (Department of Government Efficiency) इलॉन मस्क यांच्या नेतृत्वातील सरकारी खर्चास नियंत्रित करणारा विभाग होता. याचा उद्देश अप्रभावी योजनांमध्ये कपात, परदेशी कमी करणे, सार्वजनिक प्रसारण निधी संतुलित करणे होते. मस्क यांचे मत आहे की, ट्रम्प यांचे वन बिग ब्यूटीफुल बिल DOGEच्या निर्देशांच्या विरुद्ध आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.