Maharashtra Politics : शिवसेनेतून आलेल्या ज्ञानेश्वर म्हात्रेंनी भाजपला तारलं; अन्यथा...

Election Results : विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीमध्ये भाजपला कोकण शिक्षक मतदारसंघाने...
Dnyaneshwar Mhatre and BJP
Dnyaneshwar Mhatre and BJP Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra MLC Election : विधान परिषदेच्या नाशिक, अमरावती पदवीधर तर नागपूर, औंरगाबाद आणि कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीच्या दरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्याचे पाहायला मिळाले.

यामध्ये कोकण शिक्षक मतदार संघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे हे दणदणीत विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) विद्यमान आमदार बाळाराम पाटील (Balaram Patil) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

तसेच अमरावती पदवीधरमध्ये भाजपचे रणजित पाटील आणि नागपूरमध्ये भाजपने पाठिंबा दिलेले नागो गाणार यांचा पराभव झाला. त्यामुळे विधान परिषदेच्या या पाच जागांच्या निवडणुकीमध्ये भाजपला कोकण शिक्षक मतदारसंघातील ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी तारलं आहे.

ज्ञानेश्वर म्हात्रे हे आयात उमेदवार असून ते आधी शिवसेनेत होते. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपात प्रवेश करत विजय मिळवला. म्हात्रे यांच्या विजयानंतर भाजपने जल्लोष केला. मात्र, राज्यात सत्ता असलेल्या आणि तब्बल १०५ आमदार असलेल्या भाजपला या निवडणुकीत शिवसेनेतून आयात केलेल्या उमेदवारानेच तारले आहे असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

Dnyaneshwar Mhatre and BJP
Amravati Graduate Election : भाजपला नागपूरप्रमाणे अमरावतीतही गटबाजी भोवली !

कोकण शिक्षक मतदारसंघात एकूण ९१.०२ टक्के मतदान झाले. भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांना २० हजार ८०० मते मिळाली. तर बाळाराम पाटील यांना अवघ्या ९ हजार ५०० मतांवर समाधान मानावे लागले. याठिकाणी गेल्या वेळेपेक्षा अधिक मतदान झाले. त्याचा फायदा म्हात्रे यांना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागील निवडणुकीत म्हात्रे यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यामुळे गेल्या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे हे सहा हजारांहून अधिक मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर होते. या सर्व गोष्टी हेरून भाजपने म्हात्रे यांचा भाजप प्रवेश करत या निवडणुकीत त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. त्यानंतर त्यांना शिंदे गटानेही पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांच्या विजयामध्ये या दोन गोष्टी महत्वाच्या ठरल्या.

Dnyaneshwar Mhatre and BJP
Nana Patole Vs Ajit Pawar: तांबेंच्या विजयानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली ; पटोलेंनी अजितदादांना सुनावले..

दुसरीकडे नाशिकमध्ये भाजपने शेवटपर्यंत उमेदवार जाहीर केला नाही. तसेच भाजपने आपला पाठिंबा नेमकी कुणाला? हे ही स्पष्ट केले नाही. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदार संघात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शेवटपर्यंत संभ्रम होता. मात्र, मतदानाच्या दिवशी भाजपने सत्याजीत तांबे यांना छुपा पाठिंबा दिला.

तसेच नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नागोराव गाणार यांचा पराभव झाला. खरं तर नागपूर हे भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नागपूरमधून भाजपचे दिग्गज दोन नेते आहेत. तरी देखील भाजपने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा पराभव होतो ही भाजपसाठी नामुष्की ओढवणारी गोष्ट आहे.

Dnyaneshwar Mhatre and BJP
Amravati : नवीन चेहरा असलेले धीरज लिंगाडे आमदार झाले, त्याची ‘ही’ आहेत कारणे...

अमरावतीमध्येही भाजपला पराभवाचा धक्का बसला. दोन वेळा आमदार राहिलेले डॉ.रणजीत पाटील यांना महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) धीरज लिंगाडे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला.

या सर्व गोष्टी पाहता राज्यात सत्ता असलेल्या भाजपला विधान परिषदेच्या या निवडणुकीत पाच पैकी एका जागेवर विजय मिळवता आला. त्यामुळे शिवसेनेतून आयात केलेले आणि कोकण शिक्षक मतदार संघातून विजय झालेले ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भाजपला तारलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com