MLC Election : 'अप्पा फॅक्टर' गेमचेंजर! शिवसेनेचा आमदार करण्यासाठी एकनाथ शिंदेंची भाजपशी टक्कर? 'स्थानिक'च्या आकडेवारीमुळे धाकधूक वाढली!

Hitendra Thakur Eknath Shinde vs BJP : ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणूक शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांतील संख्याबळामुळे चर्चेत आली आहे. त्यामुळे बविआचे प्रमुख हिंतेंद्र ठाकूर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
Devendra Fadnavis, Hitendra Thakur, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Hitendra Thakur, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Hitendra Thakur News : ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. महायुतीलमधील मित्रपक्षांमध्येच ही निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. ठाणे जिल्ह्यात महापालिका आणि नगरपालिका निवडणूकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये चुरस दिसली होती. तीच चुरस पुन्हा ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत दिसून येईल. त्यामुळेच या निवडणुकीत 'आप्पा फॅक्टर' महत्त्वाचा ठरणार आहे.

शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांतील संख्याबळाची लढत पुन्हा चर्चेत आली आहे. या मतदारसंघात भाजपकडे तब्बल ४४४ मतांचे संख्याबळ असून, शिवसेना आणि निलेश सांबरे गटाची मिळून ३४६ मते आहेत. त्यामुळे आकड्यांच्या गणितात भाजप स्पष्टपणे वरचढ ठरत आहे. भाजपला मागे टाकून इथे विजय मिळवायचा असल्यास शिवसेनेसाठी राजकीय समीकरणे जुळविण्याचे मोठे आव्हान असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

या निवडणुकीत भाजपचे पारडे जाड असले तरी एकनाथ शिंदेची शिवसेना आपली जागा गमावणार नसल्याने ते आपला नवा मित्र पक्ष शोधत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी भर सभागृहंत वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांना 'आप्पा शिकायत का मोका नाही मिलेगा', असे सांगितले होते. त्यामुळे पालघर जिल्ह्यात एक नवे समीकरण आकाराला येईल का याची चाचपणी सुरु आहे. दरम्यान, हितेंद्र ठाकूर यांनी मात्र आपला पाठिंबा कोणाला ही भूमिका गुलदस्त्याच्या ठेवल्याने अनेक तर्क वितर्क लढविण्यात येत आहेत.

Devendra Fadnavis, Hitendra Thakur, Eknath Shinde
MLC Election News : विधानपरिषदेचा धुराळा : जळगावमध्ये गुलाबराव पाटील मुलासाठी उमेदवारी खेचून आणणार की, भाजप बाजी मारणार?

नवे समीकरण जुळणार?

मतांची जुळवा जुळव करताना शिंदेंच्या शिवसेनेला आपली पारंपरिक जागा गमवायची नसल्याने ते नवा मित्रपक्ष शोधत आहेत. त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी बहुजन विकास आघाडीला वेळोवेळी केलेली मदत लक्षात घेता ते पाठिंब्यासाठी बहुजन विकास आघाडीला सोबत घेऊ शकतात. बहुजन विकास आघाडी बरोबर आल्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ही या युतीत सहभागी होऊ शकतो, असे मत राजकीय निरीक्षकांचे आहे.

हे समीकरण आकारास आल्यास पालघर जिल्ह्यात नवे समीकरण आकाराला येऊ शकते. हे समीकरण जमल्यास भाजपला पालघर जिल्ह्यात भाजपला मोठे आव्हान उभे राहणार असल्याची चर्चा सुरु आहे.

देवेंद्र फडणवीस मैदानात

एका बाजूला असे चित्र असले तरी दुसऱ्या बाजुला भाजप ही बहुजन विकास आघाडीला आपल्याकडे वळविण्याची शक्यता आहे. यासाठी स्व:ता देवेंद्र फडणवीस पुढाकार घेतील असे संकेत मिळत आहेत.

या पूर्वी विधान परिषद,शिक्षक आमदार,पदवीधर आमदार या निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षाचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्याकडे गेली ३० वर्षे येत होते. आता हितेंद्र ठाकूर यांच्याकडे एकही आमदार नसला तरी महापालिकेतील निर्णायक ७० मते मात्र असल्याने या निर्णायक निवडणुकीत त्यांचे महत्त्व पुन्हा वाढले आहे. त्यामुळे ने काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहेत.

पक्षीय बलाबल (स्थानिक स्वराज संस्था)

भाजप - ४४४,

शिवसेना (शिंदे गट) - ३४६

बहुजन विकास आघाडी-७१

काँग्रेस -४७

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष - ३८

राष्ट्रवादी काँग्रेसकडे - २९

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष- १८

मनसे, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट प्रत्येकी ६, एमआयएम ५, कोनार्क विकास आघाडी ४, भिवंडी विकास आघाडी ३, वंचित बहुजन आघाडी २, साई पक्ष १, अपक्ष ९ मते असून ही मतेही निर्णायक ठरू शकतात.

Devendra Fadnavis, Hitendra Thakur, Eknath Shinde
VidhanParishd Election: विधानपरिषदेचा धुराळा : परभणी-हिंगोलीतील 'स्थानिक'च्या गणितात राष्ट्रवादी वरचढ; एकनाथ शिंदेंपुढे जागा टिकवण्याचे आव्हान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com