Bhai Uddhavarao dada Patil : भाई उद्धरावदादा पाटलांसारखी पक्षनिष्ठा आता कुठून आणायची?

Maharashtra Politics : पक्षांतरे नित्याचीच झाल्याच्या काळात पक्ष, विचारनिष्ठेसाठी मुख्यमंत्रिपद नाकारणाऱ्या भाई उद्धवरावदादा पाटील यांची कोणालाही आठवण येणे साहजिक आहे.
Bhai Uddhavarao dada Patil
Bhai Uddhavarao dada PatilSarkarnama

Loksabha Election 2024 : गेल्या पाच वर्षांत पक्ष फोडाफोडी आणि नेत्यांच्या पक्षांतराला ऊत आला आहे. आज या पक्षात असलेला नेता उद्या तेथे राहील की नाही, याबाबत शंका असते, अशी चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागली आहे. पदाच्या आमिषाने अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षांतरे केल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. खुद्द विरोधी पक्षनेतेच फुटून दुसऱ्या पक्षात गेल्याचेही महाराष्ट्राने पाहिले आहे. मात्र, राज्यात असेही एक विरोधी पक्षनेते होते, ज्यांना पक्षांतर करून मुख्यमंत्रिपदाची ऑफर होती. त्यांनी मुख्यमंत्रिपद नाकारले, मात्र त्यांनी आपला पक्ष सोडला नव्हता.

हे वाचताना लोकांच्या मनात एकच नाव येईल, ते म्हणजे, भाई उद्धवरादादा पाटील(Bhai Uddhavarao dada Patil) यांचे! शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक, हैदराबाद मुक्तिसंग्रामातील सेनानी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू... अशी एक ना अनेक विशेषणे त्यांच्या नावासमोर लावता येतील इतकी मोठी कामे उद्धरावदादा मागे सोडून गेले आहेत.

एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या उद्धरावदादा यांना आपल्या विचारसरणीपेक्षा कोणतेही पद, अगदी मुख्यमंत्रिपदही मोठे वाटले नव्हते. त्यांनी अखेरपर्यंत पक्ष सोडला नाही. कष्टकरी, शेतकऱ्यांसाठी त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. त्यांनी डाव्या विचारसरणीचे राजकारण केले आणि आपल्या विचारांवर ते अखेरपर्यंत ठाम राहिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhai Uddhavarao dada Patil
Losabha Election 2024 : मराठवाड्यात 3 आणि विदर्भातील 5 मतदारसंघांत मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा ठरणार ?

उद्धरावदादा यांची आता आठवण येण्याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांचे नाव येऊ लागले आहे. उद्धरावदादा हे मूळचे धाराशिव (आधीचा उस्मानाबाद) जिल्ह्यातील रहिवासी. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर(Omprakash Rajenimbalkar) आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चनाताई पाटील यांच्यात लढत होत आहे.

उमेदवारी मिळायच्या आधी अर्चनाताई या भाजपमध्ये होत्या. उमेदवारीसाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेत फूट पडली आणि खासदार राजेनिंबाळकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. या अनुषंगाने उद्धरावदादा यांचे नाव चर्चेत आले आहे. राजेनिंबाळकर यांच्या प्रचारासाठी नितीन बानगुडे पाटील यांची मंगळवारी रात्री लोहारा तालुक्यात सभा झाली. त्या सभेत त्यांनी उद्धरावदादा यांचा दाखला दिला.

यशंवतरावांचा प्रस्ताव मी स्वीकारू शकत नाही, कारण... -

उद्धवरावदादा हे 1958 मध्ये विरोधी पक्षनेते बनले. विरोधी पक्षनेते असताना उद्धरावदादांनी सभागृहात केलेली भाषणे खूप गाजली होती. ते अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करायचे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवरही त्यांचा प्रभाव पडत असे. यशवंतराव चव्हाण(Yashwantrao Chavhan) त्याकाळात मुख्यमंत्री होते. त्यामुळे अर्थातच त्यांनी उद्धवरावदादांची सभागृहातील सर्व भाषणे ऐकली होती. नोव्हेंबर 1962 मध्ये यशवंतराव चव्हाण हे केंद्रात संरक्षणंत्री बनले. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू केला होता.

काँग्रेस पक्षात अनेक ज्येष्ठ नेते होते, मात्र उद्धवरावदादा पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून मुख्यमंत्री बनावे, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यांनी तसा निरोप उद्धवरावदादा यांच्याकडे पाठवला होता. मात्र उद्धरावदादांनी तो प्रस्ताव नम्रपणे नाकाराला. यशवंतरांवाचा प्रस्ताव मी स्वीकारू शकत नाही, कारण कोणत्याही पदासाठी मी माझ्या पक्षाशी, माझ्या विचारसरणीशी प्रतारणा करणार नाही, असे ते म्हणाले होते.

राजकीय नेत्यांसाठी सत्ता, पद आणि पैशांच्या समोर पक्ष, विचारसरणीला कोणतेही महत्त्व नसल्याच्या काळात आपण जगत आहोत. अशा या काळात मुख्यमंत्रिपद नाकारणाऱ्या मात्र आपल्या पक्षाशी, विचारसरणीशी प्रतारणा न करणाऱ्या नेत्याचे अप्रूप वाटणे साहजिक आहे. इर्ले (ता. परंडा, जि. धाराशिव) हे उद्धवरावदादांचे मूळ गाव. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1920 रोजी आजोळी माणकेश्वर (ता. परंडा, जि. धाराशिव) येथे झाला. 1937 मध्ये उस्मानाबादेतून (आता धाराशिव) मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात प्रवेश घेतला.

निझामाच्या राजवटीत बिगरमुस्लिम विद्यार्थ्यांसोबत होणारा भेदभाव त्यांच्या नजरेतून सुटला नाही. तेथे आसिफजाही घराण्याशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा दिली जायची. हे त्यांना आवडले नव्हते. या प्रतिज्ञेऐवजी वंदे मातरम गायिले जावे, यासाठी विद्यार्थ्यांनी 1938 मध्ये वंदे मातरम चळवळ सुरू केली. दसऱ्याला त्याचा प्रारंभ झाला. उद्धवरावदादाही त्यात आघाडीवर होते. ही चळवळ पूर्ण संस्थानात पसरली. सरकारने या गीतावर बंदी घातली.

Bhai Uddhavarao dada Patil
Dharashiv Lok Sabha : शिवाजीबापू कांबळेंची ठाकरेंना पुन्हा भेट, महायुतीचे काय राहणार उत्तर?

यातूनच ते पुढे हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा हा मुस्लिमांच्या विरोधात नव्हता, हे त्यांनी लोकांना पटवून दिले होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते आघाडीवर होते. त्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मागण्यांसाठी विधानसभेवर काढलेल्या विशाल बैलगाडी मोर्चाची इतिहासात नोंद झालेली आहे. आताच्या काळात दादांची आठवण येणे साहजिक आहे, कारण पक्षांतर हे आता नित्याचेच झाले आहे.

राजेनिंबाळकर यांच्या प्रचार सभेत उद्धरावदादांची आठवण काढून नितीन बानगुडे पाटील यांनी अर्चनाताई पाटील आणि त्यांचे पती, भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधला, मात्र राजेनिंबाळकर यांनीही एकदा पक्ष बदलला आहे, याची त्यांना कल्पना नसावी, राजेनिंबाळकर हे काँग्रेसमधून शिवसेनेत आले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com