Hasan Mushrif political strategy : मुश्रीफ मुरब्बी नेता; राजीनाम्याच्या घोषणेने सहानुभूती मिळवत केली राजकारणाची नाळ घट्ट !

resignation sympathy politics News : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेचा अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. पण या राजीनाम्या मागची खेळी पुढील पंधरा वर्षाची राजकारणाची नाळ घट्ट करून गेली.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : एकाच घरात सर्व पक्ष आणि एकाच घरात सर्व पदे असा प्रचाराचा अजेंडा ठेवत महाडिक गटाच्या विरोधकांनी जिल्ह्यावर वर्चस्व मिळवले. एक-एक सत्तास्थान खालसा करत कोल्हापूर जिल्ह्यात सतेज-हसन या जोडीची जादू सर्वांना पाहायला मिळाली. पण हेच आपल्या वाट्याला येऊ नये, म्हणून काळाच्या पुढची पावले ओळखून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेचा अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. पण या राजीनाम्या मागची खेळी पुढील पंधरा वर्षाची राजकारणाची नाळ घट्ट करून गेली.

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघ वगळता सर्वच प्रमुख सहकारी संस्थेतील पदे ही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरात आणि हातात आहेत. त्यावर माजी आमदार के. पी. पाटील यांनी सगळीच पदे कागलला का? असा घरचा आहेर दिल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेचा राजीनामा देण्याबाबतचे संकेत दिले.

Hasan Mushrif
Sharad Pawar : 'दोघे भेटले, 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली...', शरद पवारांचा गोप्यस्फोट

महाडिक (Dhananjay Mahadik) गटांसोबत घडले ते आपल्या सोबत घडायला नको याचीच चिंता ओळखून मंत्री मुश्रीफ यांनी राजीनामा देण्याचे संकेत दिले की काय? अशी चर्चा जिल्ह्यात सुरू होते. मात्र, याच संकेताने पुढील दहा ते पंधरा वर्षातील सहकारी संस्था आणि विधानसभेतील राजकारणातील नाळ आणखीन घट्ट करून घेतली आहे.

Hasan Mushrif
Vilas Shinde : हकालपट्टीचा बदला घेतला, शिंदेंनी शिंदेंना दिला मोठा मान ; नाशिकची मोठी जबाबदारी सोपवली

केडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवल्यानंतर बँकेतील मुश्रीफ समर्थकांकडून त्यांनी राजीनामा देऊ नये, यासाठीची मोहीम सुरू झाली. मुश्रीफ यांची एकहाती सत्ता असलेल्या केडीसीसी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीतही मुश्रीफ यांनी राजीनामा देऊ नये, असा ठराव करण्यात आला व या विषयावर पडदा टाकला. पण गोकुळ निवडणुकीच्या तोंडावर मुश्रीफ यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवण्यात यश आले. आगामी गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेतील आर्थिक सुत्रे देखील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हातात राहिली आहेत.

Hasan Mushrif
Valmik Karad News : वाल्मीक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला, आता जामीनासाठी धडपड!

ज्याच्या हातात गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या आर्थिक नाड्या आहेत. त्याच्या हातात जिल्ह्यातील राजकीय नाड्या असतात. हेच समीकरण आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच या संस्थांच्या वर्चस्वासाठी नेत्यांमध्ये निकराची लढाई होते. या संस्थांचा कारभारच जिल्ह्यावर नियंत्रण मिळवून देतो. सगळा टीकेचा रोख गोकुळ आणि केडीसीसीच्या कारभारावर असतो, यामागे हेच कारण आहे. याशिवाय जिल्ह्यात या घोषणेने सहानुभूती मिळवल्याची देखील चर्चा सुरू आहे.

Hasan Mushrif
BJP ची खरी स्ट्रॅटजी उघड ? Rahul Gandhi यांचे पुराव्यासह BJP आणि Election Commission वर गंभीर आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com