Trump India, Pak deal violation: उतावीळ ट्रम्प यांच्यामुळे भारत-पाकमधील 'त्या' कराराचे उल्लंघन; मोदी फटकारणार का?

Modi reaction to Trump News : सिमला करारानुसार काश्मीर प्रश्नात तिसऱ्या देशाला हस्तक्षेप करता येत नाही, मात्र हे करीत असताना ट्रम्प यांनी उतावीळपणा करीत ट्विट करून शस्त्रसंधीची केलीली घोषणा अंगलट येण्याची शक्यता आहे.
Narendra Modi And Donald Trump
Narendra Modi And Donald TrumpSarkarnama
Published on
Updated on

पहलगाम येथील दशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जेरीस आणले. पाकिस्तानमधील दहशतवाद्याचे नऊ स्थळे उध्वस्त करीत भारताने मोठी कारवाई केली. अमेरिकेने भारत- पाकिस्तान संघर्षात तडजोड करण्यास सुरुवातीला नकार दिला होता. मात्र, अवघ्या 24 तासाच्या आताच अमेरिकेने यु टर्न घेतला. भारत-पाक दरम्यानच्या या संघर्षात हस्तक्षेप करीत अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली.

या शस्त्रसंधीची घोषणा ट्रम्प यांनी केल्याने सिमला कराराचे उल्लंघन झाल्याची टीका आता विरोधी पक्षाकडून केली जात आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. सिमला करारानुसार काश्मीर प्रश्नात तिसऱ्या देशाला हस्तक्षेप करता येत नाही, मात्र हे करीत असताना ट्रम्प यांनी उतावीळपणा करीत ट्विट करून शस्त्रसंधीची केलीली घोषणा अंगलट येण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्यामळे चर्चेत आलेल्या या सिमला कराराच्या अटी व शर्तीबाबत सर्वानाच उत्सुकता लागली आहे. दुसरीकडे यावर पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

1971 साली भारत-पाकिस्तान युद्ध झाले. या युद्धात भारताने विजय मिळवला होता. त्यांनतर बांगलादेशची निर्मिती झाली होती. त्यामुळे 1971 साली भारत-पाकिस्तान युद्ध हे वेगवेगळया घटना व घडामोडीमुळे गाजले होते. या युद्धानंतर भारताच्या ताब्यात आलेल्या ९०,००० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांच्या शरणागतीनंतर या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारत-पाक युद्धानंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा सामान्य करण्याच्या दृष्टीने भारताचे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष झुल्फिकार अली भुट्टो यांनी या सिमला करारावर स्वाक्षरी केली होती.

Narendra Modi And Donald Trump
India–Pakistan War Live : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा पाकिस्तानला कडक इशारा

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये 2 जुलै 1972 रोजी सिमला करार (Simla Agreement) झाला. हा एक ऐतिहासिक करार आहे. हा करार दोन्ही देशाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित सिमला (हिमाचल प्रदेश) येथे झाला. त्यामुळेच या कराराचे नाव सिमला करार असे पडले.

Narendra Modi And Donald Trump
India–Pakistan War Live : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा पाकिस्तानला कडक इशारा

या करारातील मुख्य तरतुदी काय होत्या

हा करार करताना भारत आणि पाकिस्तान यांनी ठरवले होते की, दोन्ही देशांतील सर्व वाद आणि समस्या शांततापूर्ण मार्गाने, द्विपक्षीय चर्चेद्वारे सोडवण्यात येतील. कोणत्याही तिसऱ्या पक्षाला किंवा आंतरराष्ट्रीय संस्थेला हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली जाणार नाही. काश्मीर व इतर प्रश्न संयुक्त राष्ट्र किंवा तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाविना, केवळ द्विपक्षीय पातळीवरच सोडवण्याची अट मान्य करण्यात आली.

Narendra Modi And Donald Trump
India Pakistan War : बलोच आणि पाकिस्तानच्या युद्धाचा भारताला असाही फायदा!

भारत आणि पाकिस्तान यांनी कोणत्याही प्रकारच्या समस्यांचे निराकरण शांततापूर्ण मार्गाने आणि परस्पर चर्चेतून करण्याचे मान्य केले होते. 17 डिसेंबर 1971 रोजी लागू झालेली शस्त्रसंधी दोन्ही देशांनी मान्य केली. पुढे हीच रेषा "नियंत्रण रेषा" म्हणून ओळखली जाऊ लागली. दोन्ही देशांनी एकमेकांशी राजनैतिक संबंध पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. युद्धात पकडलेले युद्धकैदी परत पाठवण्यावर सहमती झाली. भारताने पाकिस्तानचे 90,000 पेक्षा अधिक सैनिक युद्धबंदी म्हणून पकडले होते. दोन्ही देशांनी एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणे मान्य केले.

Narendra Modi And Donald Trump
DGMO India Pakistan : DGMO म्हणजे कोण? हे अधिकारी भारत-पाक युद्धांचं भवितव्य ठरवणार!

त्यासोबतच यावेळी लाइन ऑफ कंट्रोल १९७१ च्या युद्धानंतर दोन्ही देशांच्या सैन्यांनी ज्या ठिकाणी आपली स्थिती ठेवली होती, ती रेषा "लाइन ऑफ कंट्रोल" म्हणून ओळखली जाईल आणि कोणतीही बाजू या रेषेत बदल किंवा उल्लंघन करण्याचा प्रयत्न करणार नाही, असे ठरले होते.

पहलगाम हल्ल्यानंतर परिस्थिती बदलली :

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना प्राण गमवावा लागला होता. त्यानंतर परिस्थीती पूर्ण बदलली आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर उपाययोजना केल्या. सिंधू पाणीवाटप कराराच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, वाघा-अटारी सीमेचे बंद करणे आणि पाकिस्तानशी व्यापार थांबवणे यांचा समावेश आहे. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने ऑपरेशन सिंधूतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी स्थळावर हल्ला चढविला. त्यामुळे पाकिस्तानसमोरील अडचणी वाढल्या होत्या.

Narendra Modi And Donald Trump
India-Pak border tension : पाकिस्तान अविश्वासू, तब्बल चार वेळा केले होते शस्त्रसंधी समझोत्याचे उल्लंघन; आता काय होणार?

त्यानंतर पाकिस्तनाने 24 एप्रिल 2025 रोजी सिमला करार स्थगित करण्याची घोषणा केली आणि भारताच्या विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. या निर्णयामुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढला आणि काश्मीरमधील स्थैर्य धोक्यात आले आहे. सिमला करार हा भारत-पाकिस्तान संबंधांसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये शांतता आणि सहकार्याची शक्यता निर्माण झाली होती. पण सध्याच्या घडामोडींमुळे या कराराचे भविष्य अनिश्चित झाले आहे.

Narendra Modi And Donald Trump
India-Pak border tension : पाकिस्तान अविश्वासू, तब्बल चार वेळा केले होते शस्त्रसंधी समझोत्याचे उल्लंघन; आता काय होणार?

या शस्त्रसंधीची घोषणा करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सिमला कराराचे उल्लंघन केल्याने विरोधी पक्षाकडून टीका होत आहे. या बाबत पीएम मोदी यांनी अद्याप कोणतीच भूमिका घेतल्ली नाही. त्यामुळे ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीबाबत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Narendra Modi And Donald Trump
India-Pakistan Ceasefire : पाकिस्तानने साजरा केला 'यौम-ए-तशक्कूर', शस्त्रसंधीसोबत आहे कनेक्शन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com