कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन अन् स्पुटनिकच्या डोसमधील अंतर कमी? सरकारचा मोठा खुलासा

सरकारने कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या लशींच्या दोन डोसमधील अंतराबाबत मोठा खुलासा केला आहे.
how much gap between two doses of covishield covaxin sputnik
how much gap between two doses of covishield covaxin sputnik
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली :  देशात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर (Covid vaccination) भर दिला आहे. केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड (Covishield) लशीच्या दोन डोसमधील (Dose) अंतर वाढवले होते. हे अंतर हे पुन्हा कमी करण्याची चर्चा सुरू झाली होती. यावर सरकारने कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या लशींच्या दोन डोसमधील अंतराबाबत मोठा खुलासा केला आहे.  

यावर अखेर लसीकरणविषयक राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. एन.के.अरोरा म्हणाले की, कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही. सध्या या लशीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे असून, तेच कायम राहणार आहे. लशीच्या परिणाकारकतेच्या संशोधनातून समोर आलेली माहिती पडताळून पाहण्यात आली आहे. आमची समितीही नियमितपणे या आकडेवारीचा अभ्यास करीत आहे. यामुळे कोव्हिशिल्डच नव्हे तर कोव्हॅक्सिन, स्पुटनिक लशीच्या दोन डोसमधील अंतर सध्या तरी कमी करणार नाही.  

कोरोना लसीकरण जानेवारीत सुरू झाले त्यावेळी कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर सुरवातीला 4 ते 6 आठवडे होते. नंतर हे अंतर 6 ते 8 आठवडे करण्यात आले होते. केंद्र सरकारने मे महिन्यात हे अंतर 12 ते 16 आठवडे केले. सरकारने हे अंतर वाढवल्याचा संबंध लशीच्या टंचाईशी जोडला जात होता. अंतर वाढवण्यामागील शास्त्रीय कारणांची विचारणाही केली जात होती. लसीकरणविषयक राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीतील काही सदस्यांनीही सरकारने याबाबत विश्वासात घेतले नव्हते, अशी टीका केली होती. यामुळे कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सरकारकडून कमी केले जाईल, अशी चर्चा होती. 

जॉन्सन अँड जॉन्सनच्या या सिंगल डोस कोरोना लशीच्या तातडीच्या वापरास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. देशात सध्या 5 कोरोना लशी उपलब्ध आहेत. देशातील लस उत्पादक कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या माध्यमातून या लशीचा पुरवठा होणार आहे.  आधी देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या चार लशींचा वापर लसीकरणासाठी होत होता. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. कोव्हॅक्सिन लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com