Chhatrapati Sambhajinagar : खान-बाण गेला उडत, आता दारू अन् टक्केवारीवर चालला प्रचार..

loksabha Election 2024 : ...कारण घासून-पुसून बोथट झालेल्या त्याच त्या मुद्द्यावर कितीकाळ मतं मागायची याची लाज राजकारण्यांनाच वाटली.
Chhatrapati Sambhajinagar Constituency
Chhatrapati Sambhajinagar ConstituencySarkarnama

Chhatrapati Sambhajinagar Constituency : निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या राड्याने राजकारणाने किती खालची पातळी गाठली आहे, याचे दर्शनही खान-बाण, औरंगाबाद-संभाजीनगरच्या मुद्यावर मतदान करणाऱ्या शहवासियांना झाले.

मराठवाड्याची व पर्यटनाची राजधानी म्हणून बिरुद मिरवणाऱ्या संभाजीनगरच्या नागरिकांना पिण्याची पाण्यासाठी आठ ते दहा दिवस वाट पहावी लागते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे हर घर नल अन् जल 2700 कोटींची पाणीपुरवठा योजना तसेच विरोधकांचे समांतरचे टुमणे व्यर्थ आहे हे स्पष्ट होते. गेली पंचवीस तीस वर्ष ज्या औरंगाबाद की संभाजीनगर, खान पाहिजे की बाण या मुद्यावर निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या जात होत्या, तो मुद्दा आलटून पालटून सत्तेवर आलेल्या महायुती-महाविकास आघाडीच्या सरकारने निकाली काढला.(Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhatrapati Sambhajinagar Constituency
Udayanraje Bhosale : उदयनराजे भावूक, 'मी राजीनामा देतो पंकजाला निवडून आणतो'

कारण घासून-पुसून बोथट झालेल्या त्याच त्या मुद्द्यावर कितीकाळ मतं मागायची याची लाज राजकारण्यांनाच वाटली. त्यामुळे निवडणुकीत नवीन मुद्दा तर पाहिजे, पण तो जनतेच्या जिव्हाळ्याचा असयाला हवा, पण तसे झाले तर मग राजकीय दुकान कशी चालणार? त्यामुळे पाण्यासाठी घशाला कोरड लागलेल्या संभाजीनगरकरांसाठी आता सत्ताधारी आणि विरोधकांनी दारूचा मुद्दा उकरून काढला आहे.

महायुतीचे उमेदवार जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा दारू विक्रीचा व्यवसाय त्यांच्यासाठी डोकेदुखीचा ठरत आहेत. अर्थात सुज्ञ मतदार या एकाच मुद्यावर आपले मत देतील असे मुळीच नाही. पण ज्या शहरात लोकांना पिण्याचे पाणी आठ-दहा दिवसांत एकदा दिले जाते, त्याठिकाणी दारुच्या दुकानाचा मुद्दा प्रचाराचा कसा होऊ शकतो? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. राजकीय कुरघोडीसाठी कुठल्या टोकाला जायचं हे ज्याने त्याने ठरवलं पाहिजे.

Chhatrapati Sambhajinagar Constituency
Imtiaz jaleel News : नवनीत राणांवर टीका करताना इम्तियाज जलील यांची जीभ घसरली!

पण या मतदारसंघातील राजकीय जमिनीचा पोतच असा काही आहे की? इथे विकासाच्या मुद्यावर मत दिली जात नाहीत, हे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे निर्ढावलेले सत्ताधारी आणि विरोधक आपापला स्वतःचा अजेंडा राबवत असतात. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही पाण्याच्या प्रश्नाचा अक्षरशः फुटबाॅल करून टाकला आहे. प्रत्येकजण पाण्याच्या योजनेसाठी आम्ही मंजुरी दिली, आम्ही निधी आणला म्हणत श्रेय घेण्यासाठी स्पर्धा करतांना दिसतो.

प्रत्यक्षात मात्र या योनजेतून शहरवासियांना एक थेंबही पाणी वाढवून मिळालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नावर धारेवर धरून त्यांची सोडवणूक करण्याची जबाबदारी असलेले विरोधी पक्षनेते हातात दारूच्या बाटल्या घेऊन विरोधकांवर हल्ला चढवत असतील तर ते कितपत योग्य आहे? याचाही विचार कुठे तरी व्हायला हवा. राजकारणात चारित्र जपलं पाहिजे, असं सांगणाऱ्या नेत्यांकडूनच त्यांचे धिंदवडे रोजेरोसपणे काढले जात आहेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील प्रचार दारू या मुद्यावर व्हावा, ही निश्चितच भुषणावह बाब नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com