Loksabha Elections : मुंबईसाठी I.N.D.I.A आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला?

I.N.D.I. A Alliance: ठाकरेंची शिवसेना अन् काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात तर पवारांची राष्ट्रवादी मात्र....
Maha Vikas Aghadi
Maha Vikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

संजय परब -

Mumbai News : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी सुरू असताना 'इंडिया' आघाडी सुद्धा एक एक पाऊल पुढे टाकत आहे. महाराष्ट्रातील 48 पैकी 44 जागांवर कोणी लढायचे हे निश्चित झाले असून 4 जागांवर अजून एकमत होताना दिसत नाही.

राज्याच्या राजधानी मुंबईत मात्र 6 जागांचे वाटप ठरले असून 2019 मध्ये 3 जागा जिंकणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 4 जागा आल्या असून काँग्रेस 2 जागांवर लढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. मुंबईत शरद पवार(Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद मर्यादित असल्याने त्यांनी पश्चिम महाराष्ट्रासह आपल्या बालेकिल्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेना फुटली नव्हती तेंव्हा ते पाच वर्षांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीकडून लढले होते आणि त्यावेळी मुंबईत त्यांनी 3, तर भाजपने 3 जागा जिंकत शंभर टक्के यश संपादन केले होते. शिवसेनेचे अरविंद सावंत, राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तिकर हे निवडून आले होते. याचवेळी भाजपच्या पूनम महाजन, गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांनी बाजी मारली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maha Vikas Aghadi
Nitin Gadkari : शरद पवारांनी कृषिमंत्री असताना केलेल्या कामांचे नितीन गडकरींकडून कौतुक, म्हणाले...

पाच वर्षांत पूलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर आता दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस झाल्या आहेत. 'मातोश्री'साठी मुंबई हा बालेकिल्ला असून हा गड राखण्यासाठी ते जीवाचे रान करतील. कारण नंतर उबाठा शिवसेनेचा जीव असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी हे यश खूप महत्वाचे ठरणार आहे.

'उबाठा' शिवसेनेत असलेले अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईतून आपली जागा राखण्याचा प्रयत्न करतील. तर गजानन कीर्तिकरांच्या उत्तर पश्चिम मतदारसंघात उबाठा सेना गजाननभाऊ यांचा मुलगा अमोल कीर्तिकरला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची दाट शक्यता आहे. अमोल कीर्तिकर यांनी आपला मतदारसंघ बांधायला सुरुवात केली आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेने पुन्हा एकदा गजानन कीर्तिकर यांना लढण्यासाठी आग्रह धरल्यास पिता-पुत्राची ही लढाई खूप रंगतदार होऊ शकते. मध्यंतरी रामदास कदम(Ramdas Kadam) यांनी या जागेवर आपल्या मुलाचे नाव पुढे करत वाद निर्माण केला होता. तो वाद मिटवताना मुख्यमंत्र्यांची दमछाक झाली होती.

Maha Vikas Aghadi
Sanjay Raut News : ब्रिटिशांना मदत करणारे सत्तेत; राऊत कडाडले, भाजपचा इतिहास 2014 नंतरचा...

उत्तर मध्यमधून मागील दोनवेळा निवडून आलेल्या पूनम महाजन यांना तिसऱ्यांदा ही जागा मिळेल की नाही, याविषयी शंका वाटत असून त्यांच्या जागी कदाचित बॉलिवूडची प्रसिद्ध सिनेअभिनेत्री माधुरी दीक्षित हिला संधी दिली जाईल, असे बोलले जाते. पंकजा मुंडे यांच्याप्रमाणे पूनम महाजन यांना सुद्धा भाजपने फार महत्व दिलेले नाही. जिथे लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना भाजप बाजूला करू शकते तिथे महाजन, मुंडे यांच्या मुलींना ते कितपत महत्त्व देतील, ही शंका आहेच.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मुलाला सुद्धा भाजपने तिकीट नाकारले होते. काँग्रेस या जागी पुन्हा एकदा प्रिया दत्त यांचा विचार करणार का नवीन उमेदवार देणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

भाजप नवा चेहरा देण्याच्या तयारीत -

उत्तर मुंबईत सुद्धा भाजप नवा चेहरा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना डावलून नवा चेहरा देण्याचा भाजप विचार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गोपाळ शेट्टी यांचे संबंध फारसे चांगले नसल्याचे बोलले जाते. या जागी आमदार सुनील राणे यांचा विचार केला जाऊ शकतो.

मागच्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांना डावलून राणे यांना बोरिवली पश्चिममधून उमेदवारी दिली होती. या ठिकाणी काँग्रेस पुन्हा एकदा संजय निरुपम यांना जागा देणार का, याकडे लक्ष लागलेले असेल. 2019ला लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला जागा देत काँग्रेसने जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला होता, पण तो यशस्वी झाला नव्हता.

मध्य मुंबईत राहुल शेवाळे यांनी मातोश्रीला रामराम केल्याने शिवसेनेची अडचण झाली असून शेवाळे यांच्यासमोर तितकाच तगडा उमेदवार उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना द्यावा लागेल. धारावी पुनर्विकास योजना वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने लोकांचा सत्ताधाऱ्यांविरोधात मोठा राग असून त्याचा फटका शेवाळे यांना यावेळी बसू शकतो.

ईशान्य मुंबईत उद्धव ठाकरे माजी खासदार संजय पाटील यांना उमेदवारी देण्याची तयारीत असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून शिवसेनेत आलेल्या संजय पाटील यांना या मतदारसंघाची चांगली जाण असून काँग्रेस, राष्ट्रवादी त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहिल्यास ते बाजी मारू शकतात.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com