शरद पवार हे प्रभारी मुख्यमंत्री झालेत का? : त्यांनीच दिले या प्रश्नावर उत्तर

मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पवार (Sharad Pawar) निर्णय घेत असल्याची भाजपची टीका
Uddhav Thackeray-Sharad Pawar
Uddhav Thackeray-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आजारी असल्यामुळे राज्य सरकारचा कारभार अजून पूर्ण क्षमतेने पाहत नाहीत. त्यात दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या प्रश्नावर परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यासोबत बैठका घेत असल्याचे चित्र दिसून आले. त्यात पवार आणि परब या दोघांनीही एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत काही आश्वासने देत संप मागे घेण्याचे आवाहन केले.

पवार यांची ही बैठक सह्याद्री या शासकीय अतिथीगृहात सोमवारी झाली होती. त्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली. पवार हेच आता कार्यकारी मुख्यमंत्री झाले आहेत, अशी टीका भाजपचे नेते अतुल भातखळकर आणि राम कदम यांनी उपस्थित केला.

Uddhav Thackeray-Sharad Pawar
ST Strike : वकिलपत्र काढल्यानंतर सदावर्ते यांची पवार व परब यांच्यावरच टीका

``माननीय शरद पवाराना मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा चार्ज दिला आहे का ? आणी जर नाही तर ते घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणी अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात ? आणी शरद पवारांना बैठका घ्यायचाच असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत ? केवळ एकच निदान माफक अपेक्षा. आदरणीय डॉ बाबासाहेबांच्या संविधानाच्या नियमांचे तरी पालन करा. स्वतः च्या मनमर्जी प्रमाणे संविधान आणी घटनेचा ह्या सरकारला अपमान करता येणार नाही,``अशी टीका राम कदम यांनी केली होती.

पवार यांना या टिकेवर आज प्रश्न विचारण्यात आले. यावर त्यांनी टिकाकारांच्या ज्ञानाचे कौतुक करतो, असा टोला लगावला. एसटी संघटनांनीे मला चर्चेसाठी बोलावलं होते. लोकशाहीत चर्चा करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्त्यात गैर काही नाही. परिवहन मंत्री यांनीही मला आपण दोघांनी जायला हवं, असे सांगितले. छोटी गोष्ट आहे. पण काहींनी ती मोठी केली, असे प्रत्युत्तर दिले. सारे निर्णय हे मुख्यमंत्री घेतात. एसटी संपासंदर्भात काल जी चर्चा झाली तिचा तपशील परिवहन मंत्र्यांनी अनिल परब यांना दिलाच असेल, अशीही माहिती त्यांनी दिली.

Uddhav Thackeray-Sharad Pawar
ST आंदोलन पेटविणाऱ्या सदावर्तेंना संघटनांचा `बाय, बाय` : तुमची गरज नाही..

पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत तीन राज्यांत राष्ट्रवादी काॅंग्रेस निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. गोव्यात शिवसेनेशी युती होणार असल्याच्या चर्चेवर त्यांनी शिक्कामोर्तब केले. तसेच उत्तर प्रदेश आणि गोव्यात भाजपची सत्ता जाणार असल्याचे भाकित त्यांनी केले. गोव्यात काॅंग्रेसशी युती करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com