Maharashtra Politics : कोणाच्याही अध्यात-मध्यात नसलेला जैन समाज 'त्या' तीन घटनांनी दुखावला; भाजपला राजकीय परिणाम भोगावे लागणार?

Jain Community Upset BJP : मागील तीन महिन्यांपासून तीन प्रकरणांमुळे जैन समाज अस्वस्थ आहे. याचे परिणाम आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत दिसून येतील.
Jain community expresses anger over multiple controversies including Mahadevi Hatheen, Kabutarkhana ban, and land scam, sparking political concerns for BJP.
Jain community expresses anger over multiple controversies including Mahadevi Hatheen, Kabutarkhana ban, and land scam, sparking political concerns for BJP.sarkarnama
Published on
Updated on

Jain Community Upset : मागील तीन महिन्यांपासून जैन समाजामध्ये अस्वस्था असल्याचे चित्र आहे. व्यापार आणि उद्योगात असलेला हा समाज हा भाजपचा कट्टर पाठीराखा समजाला जातो. मात्र, मागील तीन महिन्यांपासून तीन अशा घटना घडल्या त्यामुळे जैन समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

हे तीन विषयातील दोन विषय तर थेट त्यांच्या धार्मिक अस्मितेशी जोडले गेले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत याचे राजकीय परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. हे तीन विषय म्हणजे महादेवी हत्तीण प्रकरण, कबुतरखाना बंदी आणि पुण्यातील जैन हाॅस्टेल जमीन घोटाळा प्रकरण.

कोल्हापूरमधील नांदणी मठातील हत्तीणीला या मठातून काढून गुजरातमधील वनतारा येथे हलवण्यात आले. हत्तीणीची काळजी मठामकडून घेतली जात असताना कोर्टाच्या या निर्णयाने जैन समुदायासह नांदणीमधील ग्रामस्थांच्या भावना दुखाल्या गेल्या. मोठा मोर्चा काढून त्यांनी आपला विरोध देखील दर्शवला. त्यानंतर 'वनतारा'चे अधिकारी कोल्हापूरमध्ये आले आणि महादेवीला नांदणी मठात परत पाठवू असे जाहीर केले. या संदर्भात कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. मात्र, अजून त्यावर निर्णय न झाल्याने महादेवी परत कधी येणार याची प्रतिक्षा जैन बांधवांसह कोल्हापूरकरांना आहे.

दादरमधील कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला. या निर्णयाची अंमलबजावणी महायुती सरकारने केली. मात्र, जैन बांधवांनी मोर्चा काढून या कबुतरखान्यावरील ताडपत्री फाडली. या मोर्चात जैन साधू देखील सहभागी झाले होते. सरकारने हा कबुतरखाना बंद केला मात्र, जैन मुनी आक्रमक झाले असून याची राजकीय किंमत सरकारला मोजावी लागेल असा इशारा दिला आहे. जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती.

Jain community expresses anger over multiple controversies including Mahadevi Hatheen, Kabutarkhana ban, and land scam, sparking political concerns for BJP.
MNS Politics : मनसे कार्यकर्त्यांना बोगस मतदार शोधून काढण्याचे आदेश, निवडणुकांपूर्वी घोळ बाहेर काढणार

जैन बोर्डिंग प्रकरण

पुण्यातील जैन बोर्डिंगची जागा तेथील संचालकांनी बिल्डरला विकली. मुळात ही जागा देताना तिचा व्यवहार करता येणार नाही, अशी अट घालण्यात आली होती. या बोर्डिंगच्या परिसरात एक जैन मंदिर देखील आहे. मात्र, या सगळ्याकडे कानाडोळा करत व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला. हे प्रकरण समोर आल्यानंतर जैन बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली. राजकीय हस्तक्षेपामुळे हा व्यवहार झाल्याचा आरोप देखील करण्यात आला. या व्यवहाराला आता स्टे देण्यात आला आहे. मात्र, हा व्यवहार पूर्ण रद्द करण्यात यावा, अशी मागणी जैन समाज बांधवांकडून करण्यात येणार आहे.

'स्थानिक'मध्ये फटका

जैन समाजाचीमध्ये काही पुणे आणि मुंबई महापालिकेतील काही प्रभागामध्ये निर्णायक आहेत. हा समाज मोठ्या प्रमाणात भाजपच्या मागे राहिला आहे. मात्र, तीन महिन्यातील तीन मोठ्या घटनानंतर या समाजामध्ये चलबिचल सुरू आहे. भाजपने देखील डॅमेज कंट्रोल सुरू केले असून या तीनही घटनांमध्ये सौम्य भूमिका घेतल्याचे दिसून येते. जैन बोर्डिंग प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट देखील घेतली.

Jain community expresses anger over multiple controversies including Mahadevi Hatheen, Kabutarkhana ban, and land scam, sparking political concerns for BJP.
Raosaheb Danve : 'अशी झाली संजना आमदार', रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यासमोर उलगडले रहस्य!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com