Jitan Ram Manjhi : नेहमी मोदींची स्तुती करणारे जीतनराम मांझी अचानक मंत्रिपद सोडण्याची भाषा का बोलू लागले?

Bihar Politics : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारच्या राजकारणात नेमकं घडतंय तरी काय? ; जाणून घ्या, नेमकं काय आहे मांझी यांचं म्हणणं
Jitan Ram Manjhi
Jitan Ram ManjhiSarkarnama
Published on
Updated on

Jitan Ram Manjhi on NDA : बिहारमध्ये या वर्षात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. याआधीच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. NDA आघाडीचा भाग आणि नेहमीच पंतप्रधान मोदींची स्तुती करणाऱ्या जीतन राम मांझी यांनी बंडखोरीची झलक दर्शवली आहे. अशातच त्यांनी इशारा देत म्हटले आहे की, असं वाटतंय की मंत्रिमंडळ आम्हाला सोडावं लागेल.

एवढंच नाहीतर तर त्यांनी पुढे हेही सांगितले की, आता बिहारमध्ये आम्ही आमची ताकद दाखवू. अशावेळी प्रश्न उपस्थित होतो की, नेहमीच पंतप्रधान मोदींची(PM Modi) स्तुती करणारे जीतनराम मांझी यांना अचानक असं काय झालं, की त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेण्याचा इशारा दर्शवला.

हे पहिल्यांदा नाही जेव्हा जीतनराम मांझी यांनी NDAवर नाराजी जाहीर केली आहे. हे दुसऱ्यांदा घडले आहे की जीतनराम मांझी यांनी एनडीएशी आपली नाराजी सार्वजनिकरित्या बोलून दाखवली. अशातच त्यांनी मुंगेर जिल्ह्यात एका सभेस संबोधित करताना रामायणातील एक श्लोकही म्हटला. ज्याचा अर्थ असा आहे की, बऱ्याचदा भीतीमुळे आदर निर्माण होतो. यानंतर त्यांनी म्हटले की, हिंदुस्तानी आवाम मोर्चाला एनडीएमध्ये योग्य सन्मान मिळत नाही. असं वाटतंय की मंत्रीमंडळ आम्हाला सोडावं लागेल.

Jitan Ram Manjhi
NitishKumar News : नितीशकुमारांचा इंडिया आघाडीबाबत मोठा खुलासा ; म्हणाले, 'हे नाव...'

केंद्रीयमंत्री आणि हिंदुस्तानी अवामी मोर्चाचे(HAM) संस्थापक मांझी झारखंड आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीला घेवून NDAवर नाराज आहे. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांचा पक्षाला बाजूला सारलं गेलं. मांझी यांनी आपले दु:ख सांगत म्हटले की, झारखंड आणि दिल्लीत आम्हाला काहीच मिळाले नाही. असं म्हटलं जाऊ शकतं की मी कोणतीही मागणी केली नाही, परंतु हा न्याय आहे का? मला दुर्लक्षित केलं गेलं कारण या राज्यांमध्ये माझे काहीच अस्तित्व नव्हते. त्यामुळेच आता बिहारमध्ये आम्हाला आमची योग्यता सिद्ध करावी लागेल.

याशिवाय त्यांच्या नाराजीचे कारण बिहार विधानसभा(Bihar) निवडणुकीसाठी पक्षासाठी वातारवण तयार करणे आहे. म्हणजेच ते आधीच आपल्या पक्षासाठी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी वातावरण निर्मिती करत आहेत. 2020मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मांझी यांच्या पक्षाला NDAने 243 पैकी सात जागा दिल्या होत्या आणि त्यांनी चार जागांवर विजय मिळवला होता.

Jitan Ram Manjhi
PM Modi News : एक नव्हे तीन राज्यांचा स्थापना दिवस आहे एकाच दिवशी; मोदींनी दिल्या खास शुभेच्छा म्हणाले....

तर 2025मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मांझी यांचा पक्ष आता 40 जागांची मागणी करत आहे. तसेच याचदरम्यान त्यांनी हेही म्हटले की, मला वाटतं की किमान 20 जागा तरी नक्कीच मिळाव्यात. तर त्यांच्या पक्षाची 40 जागांची मागणी आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com