NitishKumar News : नितीशकुमारांचा इंडिया आघाडीबाबत मोठा खुलासा ; म्हणाले, 'हे नाव...'

Lalu Prasad Yadav offered friendship again : राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादवांनी दिली पुन्हा मैत्रीची ऑफर.
NitishKumar
NitishKumar Sarkarnama
Published on
Updated on

Bihar News : बिहारचे राजकारण वेळोवेळी बदलत असते. तेथील मुख्यमंत्री नितीशकुमार हे सोयीचे राजकरण करण्यात पटाईत आहेत. त्यांच्या या राजकारणामुळे अनेकदा बिहारमध्ये राजकीय भूकंप झाल्याचे जनतेला पहावयास मिळाले आहे.

आता राजकीय उलथापालथीनंतर राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादवांनी मुख्यमंत्री नितीशकुमारांना पुन्हा मैत्रीची ऑफर दिली आहे. यावर नितीश कुमारांनी त्यांची बाजू स्पष्ट करत एनडीएमध्ये आमचे व्यवस्थित चालू असल्याचे त्यांनी सांगितले. तर मला इंडिया आघाडी नाव द्यायचे नव्हते, दुसरे देणार होतो असा खुलासा इंडिया आघाडीबाबत बोलताना नितीशकुमार यांनी केला आहे.

बिहारच्या राजकारणात पलटीबाज मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमारांना ओळखले जात. त्यांना इंडिया आघाडीत घेण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र त्यांनी ऐनवेळी नकार दिला. ते एनडीएमध्ये सामील झाले आणि मुख्यमंत्री झाले. लालू प्रसाद यादवांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांना पुन्हा मैत्रीची ऑफर दिली. त्यावर नितीशकुमार यांनी म्हटले की, कोण काय बोलतो त्याच्या भानगडीत पडू नका. आम्ही आता एकत्र आलो आहोत, जसे पहिले होतो. जो घोटाळा झालाय त्याची चौकशी होईल. गोष्टी ठीक सुरु नव्हत्या. यामुळे मी राष्ट्रीय जनता दलला सोडले, असे नितीशकुमार म्हणाले.

NitishKumar
Congress : काँग्रेसला मोठा धक्का बसणार; आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर ?

लालू प्रसाद यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना नमस्कार केला होता. त्यावर त्यांना विचारले असता ते म्हणाले, आता मला असे कोणी भेटले, मग तो माझ्या विरोधात असो वा विरोधी पक्षात, आम्ही नमस्कार करतो. ही माझी सवय आहे. आम्ही इथे होतो तेव्हा लालू समोरून येत होते, म्हणून नमस्कार केला, असा खुलासा नितीश कुमार यांनी केला.

इंडिया आघाडीबद्दल बोलताना ते म्हणाले, मी खूप प्रयत्न केला होता. मी इंडिया आघाडी हे नावही दिले नव्हते, मला दुसरे नाव द्यायचे होते. त्या लोकांनीच इंडिया आघाडी हे नाव दिले. हे लोक सुरुवातीला नाराज होत होते म्हणून मी म्हटले की सोडून द्या तुम्हाला जे नाव द्यायचे ते द्या. मी जेव्हा वेगळा झालो तेव्हाच मी सगळे सांगितले होते. बिहारच्या हिताचे काम करणे हे माझे काम आहे, असे नितीशकुमार म्हणाले. तर आता इंडिया आघाडीच संपली आहे, असे त्यांनी सांगितले.

NitishKumar
Shivsena Politics : राऊत गरजल्यावर म्हस्केही बरसले; याला चाटुगिरी म्हणायचं काय? म्हस्केंचा सवाल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com