कर्नाटकच्या आधी गोव्यात काॅंग्रेसला जोराचा झटका; 15 पैकी 10 आमदार भाजपमध्ये जाणार

कर्नाटकच्या आधी गोव्यात काॅंग्रेसला जोराचा झटका; 15 पैकी 10 आमदार भाजपमध्ये जाणार

पणजी : गोवा विधानसभेच्या सोमवारपासून सुरु होणाऱ्या विधानसभा अधिवेशनापूर्वी कॉंग्रेसचे 15 पैकी 10 आमदार फुटले आहेत. रात्री ते भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यानंतर त्यापैकी काहींचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.

गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा सध्या दिल्लीत असून त्या तातडीने गोव्यात येण्यास निघाल्या आहेत. त्या मध्यरात्री गोव्यात पोचतील त्यानंतर किंवा सकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो.

कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही फूट पडली असून त्यांच्यासोबत आतानासिओ मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, फांसिस सिल्वेरा, इजिदोर फर्नांडिस, आतोनिओ फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, नीळकंठ हळर्णकर, क्लाफासिओ डायस आणि विल्फेड डिसा हे आमदार आहेत.

त्यामुळे कॉंगेसकडे प्रतापसिंह राणे, रवी नाईक, लुईझिन फालेरो, दिगंबर कामत आणि आलेक्स रेजिनाल्ड हेच आमदार राहणार आहेत. त्यापैकी रेजिनाल्ड वगळल्यास इतर सर्व माजी मुख्यमंत्री आहेत.

सभापती राजेश पाटणेकर हे डिचोलीहून पर्वरी विधानसभा संकुलात येण्यास निघाले आहेत. ते पोचल्यावर हा गट भाजपमध्ये विलीन केला जाणार आहे. याआधी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या मनोहर आजगावकर आणि दीपक पाऊसकर यांनाही भाजपने याच पद्धतीने प्रवेश दिला होता.

कर्नाटकातील काॅंग्रेस आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्याआधीच गोव्यात मोठी उलथापालाथ झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com