

नवी दिल्ली : भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांना सात वर्षांची शिक्षा होईल, असं भाकित वर्तवलं आहे. तसेच शिवसेनेच्या खासदार भावना गवळी याही लवकरच तुरूंगात जातील, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्याविरोधात ईडी, आरबीआयकडे तक्रार केली असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. (Kirit Somaiya complained about Bhavana Gavlis corruption to ED)
सोमय्या यांनी गवळी यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी गुरूवारी थेट गाठत अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड व पंकज चौधरी आणि सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांची भेट घेतली. सोमय्या यांनी ट्विटवरूनही ही माहिती दिली आहे. शिवसेना खासदार भावना गवळी 100 कोटी चा घोटाळा. 18 कोटी रोख रक्कम काढणे, कार्यालयात 7 कोटी रोख ठेवणे, NCDC, SBI ना फसविणे, लवकर कारवाई होणार,' असं ट्विट त्यांनी केलं आहे. या भेटीनंतर सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सोमय्या म्हणाले, भावना गवळींनी 18 कोटी रूपयांचा रोकड काढली आहे. त्यांनी सात कोटी रूपये घरात ठेवले होते. शंभर कोटींचा भ्रष्टाचार त्यांनी केलाय. अर्थ राज्यमंत्री यांना भेटलो असून गवळी यांची तक्रार ईडी आणि आरबीआय कडे दाखल केली आहे. दगडफेक केल्यानं चौकशी थांबेल, असं ठाकरे यांना वाटत असेल. पण तो त्यांचा भ्रम आहे. भावना गवळी लवकरच जेलमध्ये जातील. घोटाळ्यांना पाठीशी घालण्याचे पाप सरकारनं केलंय, अशी टीका सोमय्या यांनी केली.
सोमय्या यांनी छगन भुजबळ यांना सात वर्षांची शिक्षा मिळणार असल्याचं भाकित केलं आहे. भुजबळांची १०० कोटींची बेनामी संपत्ती गोळा करण्यात आली आहे. त्यांच्या कंपनीतून जमिनी खरेदी केल्या आहेत. मालेगांवची गिरणार शुगर मिल विकत घेतली आहे. पनवेल, अंधेरीत जमिनी खरेदी केल्या आहेत. आयकर खात्यानं सगळे पुरावे दिले असल्याचे सोमय्या यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.