सातारा : "गेल्या दहा बारा वर्षात मदन भोसले व त्यांच्या संचालकांच्या 'चमको'गिरीमुळे किसन वीर कारखाना आर्थिक अडचणीत आला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी साखर आयुक्तांच्या आदेशानुसार कारखान्याची मालमत्तेची विक्री करून त्यातून येणारे पैसे प्राधान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावेत," अशी मागणी वाईचे आमदार मकरंद पाटील व शेतकरी सभासदांनी निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
किसन वीर कारखान्याच्या सभासदांनी आज आमदार मकरंद पाटील व जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी सभासदांच्या मागण्यांचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यानंतर आमदार मकरंद पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
किसन वीर कारखान्यावर ही वेळ का आली याप्रश्नावर मकरंद पाटील म्हणाले," जी चमकोगिरी गेली दहा पंधरा वर्षे सुरू होती. ही सभासदांच्या आता लक्षात येईल. यापूर्वी आम्ही अनेकदा प्रयत्न केला आहे. त्यांनी शेतकऱ्यांपुढे अभासी प्रतिमा कारखान्याची निर्माण केली होती. या व्यवस्थापनाकडून सभासदांच्या हिताचे कोणतेच धोरण राबविले नाही. उलट नक्षत्रवन, बांबूवन, बाभुळवने मुळात कारखान्याचे उद्दीष्ट सभासदांचा ऊस गाळप करणे आणि त्यांना चांगला दर देणे हे असणे गरजेचे आहे. पण हे चुकीचे व्यवस्थापन असल्याने कारखाना अडचणीत आला आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.