Sambhaji Raje : संभाजीराजेंची पावले काँग्रेससोबत? आगामी लोकसभेसाठी जोडण्या वाढल्या

Congress : संभाजीराजे छत्रपती यांनी 2009 मध्ये राष्ट्रवादीतून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. केवळ 11 महिने त्यांनी राष्ट्रवादीसोबत काम केले.
Chhatrapati Sambhajiraje
Chhatrapati SambhajirajeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून कोणता चेहरा असणार, याबद्दल उत्सुकता आहे. अशातच स्वराज्य संघटनेचे संस्थापक आणि राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची लोकसभेचे उमेदवार म्हणून चर्चा सुरू आहे. नुकतेच संभाजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसची माझ्यासोबत चर्चा सुरू आहे, असा खुलासा केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांची स्वराज्य संघटनेची काँग्रेससोबत वाटचाल सुरू होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. राजे काँग्रेसच्या चिन्हावर की स्वराज्य संघटनेच्या चिन्हावर लढणार, याचीदेखील उत्सुकता आहे.

राष्ट्रपती कोट्यातून भाजपकडून (BJP) संभाजीराजे छत्रपती यांना मिळालेल्या खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना करीत स्वतंत्र वाटचाल सुरू ठेवली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत छत्रपती संभाजीराजे (SambhajiRaje) यांचे मैत्रीपूर्ण संबंध असले तरी त्यांची सध्याची मानसिकता काँग्रेससोबत प्रवास करण्याची आहे. आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून स्वराज्य संघटनेला राजकीय बळ मिळवून देण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणूक लढवावी, असा कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांचा आग्रह आहे. त्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, अशी चर्चाही संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत सुरू आहे.

Chhatrapati Sambhajiraje
Lok Sabha Election 2024 : लोकसभा आढावा बैठकीत सतेज पाटलांचा फोटो गायब; पदाधिकारी संतापले

संभाजीराजे छत्रपती यांनी 2009 मध्ये राष्ट्रवादीतून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. केवळ 11 महिने त्यांनी राष्ट्रवादीसोबत काम केले. त्यानंतर राजकारणापासून त्यांनी अलिप्त राहत मराठा समाजासाठी आणि किल्लेसंवर्धनासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यातूनच 2014 नंतर भाजपने संभाजीराजे छत्रपती यांना बळ देत राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेचे सदस्यत्व दिले. त्यातूनच त्यांच्या राजकीय क्षेत्राला बहार आली. कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी भाजपशी फारकत घेऊन स्वतंत्र वाटचाल केली. मागे झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत त्यांची चर्चा सुरू झाली. त्यांच्या नावासाठी हिरवा कंदील दाखवला होता. मात्र, शिवसेनेने शिवसेना पुरस्कृत उमेदवारी घ्यावी, असा आग्रह केल्याने त्यांनी माघार घेतली. त्यामुळे अजूनही शिवसेनेबाबत संभाजीराजे छत्रपती यांची भूमिका सध्या तरी नाराजीची दिसते.

सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडून गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडूनही त्यांनी प्रयत्न केले. काँग्रेसकडे त्यांचा आग्रह दिसत नाही. त्यावेळी ही जागा काँग्रेसकडे घेऊन कोल्हापूरमधून संभाजीराजे छत्रपती यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी केंद्रीयस्तरावर जोडण्या सुरू आहेत, तर संभाजीराजे छत्रपती हेदेखील काँग्रेससोबत जाण्यासाठी अनुकूल भूमिकेत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाज मागे उभा राहणार

सध्याच्या घडीला मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. जो मराठा समाजाच्या बाजूने उभा राहील, त्याच्या पारड्यात आगामी लोकसभा निवडणुकीचे कल राहतील, असा अंदाज आहे. गेल्या पंधरा वर्षांत संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाबाबत सातत्याने भूमिका मांडली आहे, तर मनोज जरांगे-पाटील यांची दोन वेळा उपोषणस्थळी भेट घेऊन राज्य सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे साहजिकच संभाजीराजे छत्रपती यांच्यामागे मराठा समाज असणार, हे ग्राह्य धरूनच काँग्रेसची सावध पावले टाकणे सुरू आहे.

विजयाचा काँग्रेसला विश्वास

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिल्यास, काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची मदत घेऊन ते विजयी होण्याचा विश्वास काँग्रेसला आहे. त्याचबरोबर मराठावाडा आणि नाशिकमध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेची ताकद काँग्रेसच्यामागे उभी राहू शकते, असे गणित काँग्रेसच्या नेत्यांचे आहे. संभाजीराजेंचे रायगड संवर्धनातून सुरू असलेले काम, हे सर्व शिवप्रेमींना ज्ञात असल्याने राज्यातील अनेक तरुण त्यांच्या मागे उभे राहू शकतात. सारथी संस्थेसाठी दिलेला लढा यामुळेदेखील मराठा उच्चशिक्षित तरुणवर्ग संभाजीराजे छत्रपती यांच्या मागे उभा राहील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

शाहू महाराज यांची पुरोगामी विचारसरणी काँग्रेसच्या विचारांशी मिळतीजुळती आहे. यापूर्वी शाहू महाराज यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती, तर पुन्हा संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यामागे काँग्रेस आपल्या पडत्या बाजूचा विचार करीत त्यांना सोबत घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आगामी काळात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Edited By Roshan More)

R...

Chhatrapati Sambhajiraje
Omraje Nimbalkar : सोलापुरातील नाट्य संमेलनाच्या उद्घाट्नापूर्वीच रंगले राजकीय नाट्य, ओमराजे निंबाळकरांचे नाव वगळले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com