Lok Sabha Election 2024 : नवं राज्य नवा खेळ; भाजप-काँग्रेसला बसेना सत्तेचा मेळ!

Telangana News : 2014 मध्ये आंध्र प्रदेशचं विभाजन होऊन तेलंगणा राज्याची निर्मिती झाली आणि आंध्र प्रदेश लोकसभेच्या एकूण 42 जागांची वाटणी झाली.
rahul gandhi Vs Narendra Modi
rahul gandhi Vs Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

Congress Vs Bjp, 25 May : 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही ( Lok Sabha Election 2024 ) भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी मित्रपक्षांच्या मदतीनं दक्षिण दरवाजा उघडण्याचा पुन्हा एकदा घाट घातलाय. दक्षिणेकडील सर्व राज्यांतील मतदानाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. आता निकाल येणं तेवढं बाकी आहे. 'दक्षिणेचं द्वार कुणासाठी खुलं होणार?' या मालिकेच्या शेवटच्या भागात पाहूयात तेलंगणात काय होणार?

2014 मध्ये आंध्र प्रदेशचं ( Andhra Pradesh ) विभाजन होऊन तेलंगणा राज्याची निर्मिती झाली आणि आंध्र प्रदेश लोकसभेच्या एकूण 42 जागांची वाटणी झाली. आंध्र प्रदेशच्या वाट्याला 25 तर तेलंगणाच्या वाट्याला 17 जागा आल्या. 2014 मध्ये नव्या तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून के. सी. चंद्रशेखर राव ( के.सी.आर ) यांची वर्णी लागली. तेव्हापासून आजवर भाजप ( bjp ) आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना तेव्हाचा तेलंगणा राष्ट्र समिती ( टीआरएस ) आणि आता भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) बनलेल्या के. सी. आर यांच्या पक्षाशी संघर्ष करावा लागतोय शिवाय 'एमआयएम'ची डोकेदुखी मागे आहेच.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप-काँग्रेसमध्ये जास्त जागा जिंकण्यासाठी रस्सीखेच!

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अवघी एक तर काँग्रेसला केवळ 02 जागा जिंकता आल्या. 2019 मध्ये भाजपनं सर्वच्या सर्व जागा लढवल्या पण हाताशी आल्या अवघ्या 04. काँग्रेसनंही ( Congress ) सर्व जागा लढल्या, मात्र पदरात पडल्या केवळ 03. 'एमआयएम'च्या असदुद्दीन ओवैसी यांनी मात्र आपला हैदराबादचा गड राखण्यात यश मिळवलं. 2024 मध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस, अशी सरळ सरळ लढत पाहायला मिळाली. दोन्ही पक्ष सर्वच्या सर्व म्हणजे 17 जागा लढवण्यासाठी मैदानात उतरले. त्यामुळं तेलंगणा लोकसभेतील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भाजप-काँग्रेसमध्ये आजही रस्सीखेच सुरू आहे.

rahul gandhi Vs Narendra Modi
Kerala Lok Sabha 2024: डावे डोके वर काढू देईना, 'कमळ' फुलेना, 'हात' हलेना!

'बीआरएस'ची राज्यातली सत्ता तर गेली आता लोकसभेचं काय?

तेलंगणात एकहाती सत्ता असताना 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये के. सी. राव यांच्या तेव्हाच्या तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) चे अनुक्रमे 11 आणि 09 इतके खासदार निवडून आले होते. मात्र, आताची परिस्थिती वेगळी आहे. आता राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. के. सी. आर यांच्या विषयीची 'अ‍ॅंटी इनकमबन्सी' त्यांच्या पक्षाला 88 जागांवरून थेट 39 जागांवर घेऊन आली. त्यामुळं बॅकफूटवर गेलेल्या आपल्या पक्षाला 2028 च्या विधानसभेत पुन्हा एकदा सत्तेत आणायचं असेल तर के. सी. आर यांना 2024 च्या लोकसभेत आपल्या गुलाबी रंगाची ताकद दाखवावी लागेल.

एकूणच काय तर तेलंगणात 'बीआरएस' कमबॅक करण्यासाठी तडफडतोय, तर तिकडं नव्या राज्यातील नवनवीन खेळ खेळता खेळता भाजप किंवा काँग्रेस पक्ष सत्तेचा मेळ बसवण्यासाठी धडपडतोय.


( Edited By : Akshay Sabale )

rahul gandhi Vs Narendra Modi
Lok Sabha Election 2024: दक्षिणेचं द्वार कुणासाठी खुलं होणार? YSRC चा फिरता पंखा पाहून भाजप-काँग्रेसला गिरकी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com