Kolhapur News : महायुतीची 'समझोता एक्स्प्रेस' विधानसभेला खोळंबणार; एकमेकांना चितपट करण्यासाठी शड्डू ठोकणार?

Mahayuti News : कालपर्यंत एकमेकांच्या विरोधात असणारे आज महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र आल्याचे दिसते. पुढील काही महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात राजकीय उद्रेक अटळ आहे
samarjit singh ghatge kp patil prakash ambitkar hasan mushrif
samarjit singh ghatge kp patil prakash ambitkar hasan mushrifsarkarnama

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ( Kolhapur Lok Sabha Election 2024 ) महायुतीचे घटक पक्षातील सर्व नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्यासाठी तात्पुरते एकत्र आलेत. कोल्हापूरच्या पटरीवरून 'समझोता एक्स्प्रेस' धावत असली तरी विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकणार हे जवळपास निश्चित आहे. याचे अनुभव जागोजागी लोकसभा मतदारसंघातील प्रचारादरम्यान येत आहेत.

कागल, चंदगड, कोल्हापूर उत्तर आणि राधानगरी मतदारसंघात हे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील सत्ता बदलानंतर अनेक परिणाम तालुक्यात स्तरावरील राजकारणात झाले आहेत. कालपर्यंत एकमेकांच्या विरोधात असणारे आज महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र आल्याचे दिसते. सध्या एक दिलाने असले, तरी पुढील काही महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात राजकीय उद्रेक अटळ आहे.

कागलच्या राजकीय विद्यापीठात तीन मातब्बर एकत्र आले आहेत. खासदार संजय मंडलिक ( Sanjay Mandlik ), पालकमंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे ( Samarjit Singh Ghatge ) महायुतीतून एकत्र आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नांसाठी तिघांनीही जिवाचे रान करायचे ठरवले असले, तरी विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ आणि घाटगे एकमेकांच्या विरोधातच असणार, असे संकेत प्रचाराच्या निमित्ताने येत आहेत. नुकताच कागल, गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा कागल येथे पार पडला. या मेळाव्यात तो प्रत्यय आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

समरजितसिंह घाटगे भाषणाला उभारताना कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू झाला. पण, कार्यकर्त्यांना थांबवत घाटगे म्हणाले, "जल्लोष करण्याची संधी मी तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आम्ही एकत्र आहोत. मात्र, आपलं मिशन ठरलेलं आहे."

तर राधानगरी भुदरगड मतदारसंघात आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार के. पी. पाटील हे महायुतीत एकत्र आहेत. नुकतीच खासदार संजय मंडलिक यांनी के. पी. पाटील यांची भेट घेत, 'झाले गेले विसरून जाऊया,' असा मैत्रीचा सल्ला दिला. मात्र, के. पी. पाटील बिद्री निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या गोष्टी विसरतील का? हेदेखील प्रश्नचिन्ह आहे. जर विसरलेच तर विधानसभेला मंडलिक यांच्याकडून मदत होईल का? असा सवाल त्यांच्यासमोर आहे. कारण खासदार मंडलिक आणि आमदार प्रकाश आंबेडकर यांचे जिवाभावाचे सख्ख आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत माजी आमदार के. पी. पाटील आणि आमदार प्रकाश आबिटकर यांची लढत अटळ मानली जाते.

चंदगड विधानसभा निवडणुकीत आमदार राजेश पाटील, भाजपचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अशोक चराटी आणि भाजपनेते शिवाजी पाटील हे चंदगडमध्ये मातब्बर संजय मंडलिक यांच्यासोबत आहेत. आमदार राजेश पाटील हे मंडलिक यांचे मेहुणे आहेत. अशातच विधानसभा निवडणुकीत हे तिघेही एकमेकांच्या विरोधात उभे असतात. आगामी विधानसभा निवडणुकीत ही हेच चित्र पाहायला मिळणार यात शंका नाही. खासदार मंडलिक यांच्या उमेदवारीसाठी विरोध करण्यामागे यातीलच एक नाव असल्याची चर्चा आहे. मात्र, झालं गेलं विसरून हे तिघेही मंडलिक यांच्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत. विधानसभेचे गणित डोळ्यांसमोर ठेवून पाटील आणि चराटी मंडलिक यांना मताधिक्य देतील. पण, मंडलिक यांच्यासमोर विधानसभेचे मोठे आव्हान असणार आहे.

samarjit singh ghatge kp patil prakash ambitkar hasan mushrif
Kolhapur Politics : मंडलिकांची सगळी भिस्त 'या' त्रिकुटावर

तर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आहेत. कोल्हापूर पोटनिवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र लढून विजय मिळवला. भाजप स्वतंत्र लढल्याने त्यांचे निर्णय मत या मतदारसंघात तयार झाले आहे. अशातच शिवसेना शिंदे गट भाजपसोबत आल्याने या ठिकाणी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचाही विधानसभेला दावा असणार आहे. मात्र, भाजपने पोटनिवडणूक लढविल्याने आणि मतांची बेरीज डोळ्यांसमोर ठेवून या मतदारसंघावर दावा करण्याची तयारी आहे.


( Edited By : Akshay Sabale )

R

samarjit singh ghatge kp patil prakash ambitkar hasan mushrif
Lok Sabha Election 2024 : 'मशाल हाती घेणे कदापि शक्य नव्हते, म्हणून...' ; ठाकरेंच्या भेटीतली 'अंदर की बात' शेट्टींनी सांगितली!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com