Nashik Politics : खासदार गोडसे कमकुवत होणं जेवढं भाजपच्या फायद्याचं तेवढंच दादा भुसे यांच्याही !

Hemant Godse and Dada Bhuse : दादा भुसे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्यातील शीतयुद्ध अनेक वर्षापासून सुरु आहे.
Hemant Godse and Dada Bhuse
Hemant Godse and Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: पालकमंत्री दादा भुसे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्यातील शीतयुद्ध मूळ शिवसेना कायम असल्यापासून होते. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली सुद्धा या शीतयुद्धाला पूर्णविराम मिळालाच नाही. त्यात नाशिक लोकसभा की मालेगाव-धुळे लोकसभा हा मोठा प्रश्न दोघांसाठी प्रतिष्ठेचा बनला. व्हायरल व्हिडिओ प्रकरणामुळे खासदार गोडसेंना मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. (Shivsena MP Hemant Godse and Dada Bhuse in Nashik Politics)

खासदार गोडसे कमकुवत होणे जेवढे भाजपच्या फायद्याचे तेवढेच ते दादा भुसे यांच्यासाठी सुद्धा, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकचे ठेकेदार आयकर विभागाच्या रडारवर आलेत. त्याची खमंग चर्चा सुरू झाली. ठेकेदार आणि राजकीय पक्षाचे संबंध जोडले गेले. खासदार हेमंत गोडसे यांचे सहकारी असलेल्या ठेकेदाराचा संबंध जोडताना अगदीच पालकमंत्री दादा भुसे यांच्यावरही आरोप झाले. मात्र, आयकर विभागाची चौकशी संपलेली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Hemant Godse and Dada Bhuse
Shiv Sena News : मुख्यमंत्री शिंदेंचा पुण्यातील गुंडासोबतचा फोटो व्हायरल; राऊतांनी टाकलेला बॉम्ब साळींवर फुटणार का?

यात खरे ते काय लवकरच समोर येईल, असा दावा पालकमंत्र्यांनी करीत विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयकर विभागाच्या कारवाईपूर्वीच टेंडर प्रकरणावरून शिवसेनेत वादला सुरूवात झाली होती. हा वाद एवढा टोकला गेला की शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची हिंमत केली. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना डावलून टेंडरची कामे दिली जातात, असा या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे.

या पदाधिकाऱ्याचा सुरूवातीचा रोख महानगर प्रमुख बंटी तिदमे यांच्यासह पालकमंत्री दादा भुसेंवर होता. या प्रकरणी उघड बंड होण्याची चिन्हे असताना खासदार हेमंत गोडसे यांनी युवासेनेला रसद पुरविण्यास सुरूवात केली.

बंडाच्या तयारीत असलेल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हे प्रकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत ‘नियमात’ कसे पोहचवयाचे याचेही मार्गदर्शन केले. ही बाब दादा भुसेंना समजताच त्यांनी आपली यंत्रणा कामाला लावली. दादा भुसेंनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मालेगावला बोलावून ‘समस्या’ समाजावून घेतली. त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन देत युवासेनेचे बंड थंड बस्त्यात पोहचवले.

Hemant Godse and Dada Bhuse
Rohit Pawar: राज ठाकरे महायुतीत आले तर...रोहित पवार म्हणाले...

मूळ शिवसेनेत असल्यापासून दादा भुसे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्यातील शीतयुद्धाला लोकसभेच्या जागेवरून खतपाणी मिळाले. नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेची असून, पक्षफुटीने येथे मोठे त्रांगडे निर्माण केले आहे. पक्ष फुटीनंतर शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक ठाकरे यांच्यासोबत राहिले. अगदी सिन्नर, इगतपुरी सह नाशिक मध्य, पूर्व, पश्चिम आणि देवळालीत ठाकरेंची ताकद आजही कायम आहे. तुलनेत शिंदे गटाला मालेगाव वगळता फारसे मोठे यश मिळालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी खासदार हेमंत गोडसे याचे नाव वगळता आवश्यक ती साधनसामुग्री उपलब्ध नाही. पक्षाने प्रयत्न करूनही अद्याप पक्षाचा विस्तार होत नाही, हीच मोठी शोकांतीका आहे. याउलट मालेगाव धुळे लोकसभा मतदारसंघात चित्र आहे. तिथे दादा भुसे यांच्या रूपाने पक्षाकडे चेहरा आहे. त्यांचे सुपुत्र अविष्कार यांच्या रूपाने लोकसभेचा उमेदवार आहे. सत्तेची ताकद आहे. यापूर्वीच्या निवडणुकींचा अनुभव आणि तशी यंत्रणा उपलब्ध आहे.

मागील वर्षभरात वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम राबवून दादा भुसेंनी लोकसभेच्या मतांची पेरणी सुद्धा केली आहे. मालेगाव धुळे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला तर नाशिक लोकसभा भाजपला जाणे हे दोन्ही पक्षासाठी तसे हिताचे असल्याची चर्चा याच निमित्ताने सुरू करण्यात आली. नाशिकसाठी भाजपचा रस आता पूर्ण उघड झाला आहे. यात सर्वात मोठा अडसर गोडसे यांचाच ठरतो. त्यामुळे आयकर विभागाची छापेमारी असो की व्हायरल झालेला व्हिडिओ यात खासदार हेमंत गोडसे यांचेच पाय खोलात, अन् भाजपसह भुसे यांची सरशी अशी स्थिती आहे.

जिल्ह्यात शिंदे गटाची सर्वच ताकद दादा भुसे यांच्याकडे एकटवली असली तरी पक्षाचा नाशिक शहर आणि जिल्ह्यात पक्षाचा विस्तार कधी होणार हा मुलभूत प्रश्न आहे. नाशिक महापालिका असो, विधानसभा की लोकसभा सर्वच ठिकाणी भाजप आक्रमक असतो. या आक्रमकतेला उत्तर द्यायचे की आपला फोकस मालेगाव धुळे पुरता मर्यादीत ठेवायाचा, याबाबतची रणनीती दादा भुसे आणि शिवसेना कशी आखते, हे पाहणे फारच रंजक ठरणार, एवढं निश्चित!

(Edited By-Ganesh Thombare)

Hemant Godse and Dada Bhuse
NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह अजित पवारांकडे; आता आमदार दिलीप मोहितेंनी केला मोठा दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com