Omraje Nimbalkar : आली रे आली, आता तानाजी सावंतांची बारी आली! ओमराजेंना नडलेल्या पालकमंत्र्यांना फुटणार घाम

Dharashiv Lok Sabha Election Omraje Nimbalkar Lead in Tanaji Sawant Constituency : धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या भूम-परंडा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांना तब्बल 81 हजार मतांची आघाडी मिळाली आहे.
Omraje Nimbalkar, Tanaji Sawant
Omraje Nimbalkar, Tanaji Sawant Sarkarnama

Dharashiv Lok Sabha Election 2024 Result : धाराशिवमधील लढतीत उद्धव ठाकरेंचा पठ्ठ्या म्हणजे, ओमराजेंनी 'शक्तीमान' सत्ताधीशांना धुळीला मिळवले आणि तब्बल साडेतीन लाखांचे लीड घेऊन दुसऱ्यांदा खासदार झाले. ओमराजेंची घौडदौड रोखणे कोणालाही शक्य नव्हते.

तरीही, सत्तेची नको तेवढी 'ताकद' वापरणाऱ्या पालकमंत्री तानाजी सावंतांनी ओमराजेंना गारद करण्याचा विडाच उचलला होता. ओमराजेंना रोखणे तर दूरच राहिले, पण त्यांचे लीड कमी करण्यात सावंत आणि त्यांच्या कंपनीला तसूभरही यश आले नाही.

उलट आता सावंत यांना विधानसभेची पायरी चढण्याआधी दहा वेळा ओमराजेंच्या तेही भूम-परंडा मतदारसंघातील लीडचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे ओमराजेंना नडलेल्या सावंतांची आता बारी आली आहे. पुढच्या निवडणुकीत अर्थात, विधानसभेला सावंतांचा वारू रोखण्याचा पक्का इरादा ओमराजेंनी केला आहे.

भूम-परंडा या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार ओमराजे निंबाळकर Omraje Nimbalkar यांना तब्बल 81 हजार मतांची आघाडी देऊन मतदारांनी पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना जोरदार हादरा दिला आहे. लोकसभा निवडणुकीचे जागावाटप, त्यानंतर सावंत यांनी प्रचारात वापरलेली भाषा, याची परतफेड मतदारांकडून झाली आहे. एका मर्यादेच्या पलीकडे मतदार गुर्मी सहन करू शकत नाहीत, हे या निकालाने दाखवून दिले आहे.

जनता मालक असते, त्याच्या दयेवर आपले राजकारण अवलंबून असते, याचा विसर पडलेले पालकमंत्री सावंत आताही भानावर येणार नाहीत, हे निश्चित आहे. आपली संस्कृती ज्येष्ठांना आदर देण्याची, त्यांचा सन्मान करण्याची आहे.

टीका, आरोप-प्रत्यारोप हा राजकारणाचा अपरिहार्य भाग आहे, मात्र त्याला भाषेच्या मर्यादेची जोड हवी असते. भाषेची मर्यादा नाही पाळली तर मतदार सावंतच नव्हे, तर अन्य कोणत्याही बड्या नेत्याला त्याची जागा दाखवून देतात. हे पाहण्यासाठी कुठे लांब जाण्याची गरज नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीची वाताहत का झाली, याच्या कारणांचा शोध घेतला तरी ते लक्षात येईल.

महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चनाताई पाटील यांना ओमराजे निंबाळकर यांच्याकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला. ओमराजे यांचा 3 लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय झाला. महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने ते विजयी झाले आहेत. हे असे का झाले, यावर महायुतीच्या जिल्ह्यातील नेत्यांमध्ये आदळआपट नक्कीच होईल. त्यावेळी सावंतांच्या नावाचीच सर्वाधिक चर्चा होऊ शकते.

Omraje Nimbalkar, Tanaji Sawant
Omraje Nimbalkar : बाप रे! ओमराजेंनी मोदींनाही मागं टाकलं!

ओमराजे निवडून येणार, असेच वातावरण सुरुवातीपासून होते, मात्र लढाई एकतर्फी होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. सावंतांमुळे महायुतीत सुरुवातीलाच खडा पडला. पुतण्याला उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज झाले आणि महायुतीतील बेदिली जाहीर झाली.

नाराजी दूर झाल्यानंतर सावंत Tanaji Sawant प्रचारात सक्रिय झाले. आमदार शहाजीबापू पाटलांच्या भाषेत बोलायचे झाल्यास, सावंतांचे काय ते बोलणे, काय ते हातवारे.. काय ती भाषा...!, असे म्हणता येईल.

2019 च्या निवडणुकीत ओमराजेंनी तिकीट मिळवण्यासाठी मी उद्धव ठाकरेंना अमुक लाख रुपये दिले, बेरोजगाराला खासदार केले, इतके करूनही ओमराजेंनी बाप बदलला... अशी भाषा होती सावंतांची! ओमराजेंनी बाप बदलला म्हणणारे सावंत यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती, हे ते स्वतः विसरले असले तरी ते लोकांच्या स्मरणात होते.

सावंत यांनी ओमराजे यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांना प्रचारात आणले. त्यांचाही उल्लेख त्याचा (ओमराजेंचा) बाप असा केला. त्यांची ही भाषा लोकांना आवडली नाही. कारण हयात नसलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये, असा संस्कार आपल्या समाजात रुजलेला आहे.

खुद्द पालकमंत्री सावंतांसह भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि महायुतीची प्रभावी यंत्रणा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात प्रचारात होती. ओमराजेंची यंत्रणा माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या खांद्यावर होती. सावंत यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी स्वतःच निवडणूक हातात घेतली होती, असे आता वाटत आहे.

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. लोकसभा निवडणुकीतील आपल्या विरोधात झालेला प्रचार ओमराजे विसरतील, हे शक्यच नाही. त्यामुळे पुन्हा विधानसभेची पायरी चढण्यासाठी पालकमंत्री सांवतांना घाम फुटणार आहे, हे निश्चित समजले जात आहे.

(Edited By Roshan More)

Omraje Nimbalkar, Tanaji Sawant
Lok Sabha Election Result : मोठा दणका! 20 खासदारांना बसवलं घरी, भाजपचे 12 जण, शिंदे गटाचे किती?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com