Nanded Loksabha Election News : भाजपला चिखलीकरांचीच गॅरंटी, आता अशोक चव्हाणांची परीक्षा...

Prataprao Chikhalikar Politics : नांदेडच्या जागेसाठी भाजपमध्ये चार उमेदवार इच्छूक होते. चिखलीकर यांच्यासह आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे व डॉ. मीनल पाटील खतगावकर यांचा त्यात समावेश होता.
Nanded BJP Politics News
Nanded BJP Politics NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded News : पक्षातील काही आमदारांचा विरोध, नांदेडची जागा डेंजर झोनमध्ये असल्याची चर्चा असताना पक्षातील विरोधकांवर मात करून खासदार चिखलीकरांनी उमेदवारी मिळवलीच. भाजपलाही चिखलीकरांचीच गॅरंटी असल्याने त्यांनी कुठलाही प्रयोग करण्याची जोखीम पत्करली नाही. त्यामुळे आता नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची जबाबदारी वाढली आहे. याशिवाय जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांना जुने हेवेदावे विसरून प्रताप पाटील चिखलीकरांच्या विजयाची गॅरंटी पक्षाला द्यावी लागणार आहे.

गेल्या पाच वर्षांत अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याशी दोन हात करून जिल्ह्याचे नेतृत्व करत पक्षाला बळकटी देणाऱ्या चिखलीकरांवर भाजपने विश्वास दाखवल्याने चव्हाणांच्या पक्ष प्रवेशाने धास्तावलेल्या निष्ठावंतांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली. यात नांदेडमधून विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उमेदवाराची सस्पेंसही या निमिताने संपला आहे.

Nanded BJP Politics News
Congress News: काँग्रेसचा बालेकिल्ला मराठवाडा भाजप अन् शिवसेनेकडे कसा झुकला?

नांदेडच्या जागेसाठी भाजपमध्ये चार उमेदवार इच्छूक होते. चिखलीकर यांच्यासह आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे व डॉ. मीनल पाटील खतगावकर यांचा त्यात समावेश होता. या इच्छुकांनी आपापल्या परीने उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. परंतु अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रेवशानंतर जिल्ह्यातील निष्ठावंत भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, अशी भावना हळूहळू निर्माण होऊ लगाली होती. त्याला छेद देत भाजपने निष्ठावंतांना पहिला मान हेच चिखलीकरांच्या उमेदवारीतून पुन्हा एकदा दाखवून दिले.

चिखली गावाचे सरपंच, दोन वेळा आमदार अन् गेल्या निवडणुकीत खासदार असा चिखलीकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे. ते दोन वेळा कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातुन‌ निवडुन आले आहे‌त. गेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते.

नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या मतदारसंघातून चार वेळचा अपवाद वगळता काँग्रेसचेच उमेदवार निवडून यायचे. 2014 मध्ये देशात मोदी लाट असतांना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा (Congress) गड राखला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पण गेल्या निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकरांनी तो खेचून आणला. ज्या अशोक चव्हाणांना चिखलीकरांनी गेल्या निवडणुकीत धूळ चारली तेच चव्हाण आता भाजपमध्ये महत्वाचे नेते झाले आहेत. त्यांच्या सोबत काँग्रेसचे माजी आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भलीमोठी रसद चिखलीकरांच्या विजयासाठी आता राबणार आहे. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची साथही चिखलीकरांना महत्वाची ठरणार आहे.

नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षातील गटबाजी गेल्या काही महिन्यापासून उघडपणे समोर आली होती. नांदेड लोकसभा मतदारसंघातून येणाऱ्या नायगाव व मुखेड या दोन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तसेच विधानसभा परिषद सदस्य राम पाटील रातोळीकर देगलूर बिलोली विभागात काम करत आहेत. या सर्वांच्या मदतीने चिखलीकरांना रणनीती आखावी लागणार आहे.

नवनिर्वाचित खासदार डॉ. अजित गोपछडे (Ajit Gopchade) यांनाही विश्वासात घेऊन चिखलीकरांना पुढे जावे लागणार आहे. चिखलीकरांची प्रतिमा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क, सहज उपलब्ध होणारा नेता, गेल्या निवडणुकीत मिळवलेला विजय या सगळ्या बाबी चिखलीकरांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी जमेच्या ठरल्या.

(Edited By Deepak Kulkarni)

Nanded BJP Politics News
Murlidhar Mohol News: भाजपाचं पुण्यात धक्कातंत्र! मुळीक, देवधरांचा पत्ता कट, मोहोळांच्या गळ्यात उमेदवारीची माळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com