Uddhav Thackeray strategy : महाविकास आघाडीचे भवितव्य धोक्यात! उद्धव ठाकरेंची रणनीती गेम फिरवणार, भाजप देणार टक्कर!

Maha Vikas Aghadi future News : हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची जवळीकता वाढली असल्याने स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका एकत्र लढण्याची शक्यता आहे.
Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने राजकीय घडामोडीना वेग आला आहे. दिवाळी झाल्यानंतर निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून राज व उद्धव ठाकरे या बंधूंच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे यांच्या मनसेची युती होण्याची शक्यता आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची जवळीकता वाढली असल्याने स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? याची उत्सुकता लागली आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडीत एकत्र लढल्या होत्या. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मोठे यश मिळाले होते तर विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळेच आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर गेल्या काही दिवसापासून राज व उद्धव ठाकरे या बंधूंच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
BJP Politics in Kokan : कोकणात राजकीय भूकंप! राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनाही मोठा धक्का?, शिवसेनेचा युवा नेता महायुतीच्या वाटेवर

एकीकडे आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. त्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी स्वबळावर निवडणुका लढणार की एकत्रित निवडणूक लढणार याविषयी उत्सुकता लागली आहे. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज व उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येणार का ? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासोबतच हे दोघे एकत्र आले तर महाविकास आघाडीचे काय होणार याची उत्सुकता लागली आहे. तर दुसरीकडे मनसेची महाविकास आघाडीत एंट्री करणार का? याची चर्चा रंगली आहे.

Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Shivsene : ठाकरे-शिंदे एकत्र येणार; संजय शिरसाट काय बोलून गेले?

त्यातच येत्या काळात उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होऊ शकतात. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. येत्या काळात शिवसेना-मनसेची युती झाली, तर राज्याच्या राजकारणाचे संपूर्ण समीकरण बदलणार आहे. यामुळे शिवसेनची पारंपरिक मतपेढी पुन्हा एकत्र आल्यास, निवडणुकीतील त्यांचे आव्हान अधिक मजबूत होणार आहे. त्यामुळे महायुतीपुढे आव्हान उभे राहणार आहे.

Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
NCP Sharad Pawar: छगन भुजबळांच्या मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादीचे नेते म्हणावे, ‘आमचा पराभव ईव्हीएम मुळेच’

स्वबळावर लढण्याचा निर्धार:

महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर शिवसेना मनसेसोबत जाणार आहे. या परिस्थितीत, त्यांना एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांची शिवसेना आणि भाजप यांच्या विरोधात त्यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. यामुळे, येत्या काळात मतांची विभागणी झाली तर कोणाला फटका बसणार याची चर्चा रंगली आहे.

Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Manoj Jarange ultimatum : मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा 'अल्टीमेटम'; थेट 1994च्या जीआर हात घालण्याची तयारी

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची

उद्धव ठाकरे बाहेर पडल्यास, महाविकास आघाडीचे भवितव्य धोक्यात येईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नवे मार्ग शोधावे लागतील. ते एकत्र राहून निवडणूक लढवतील की वेगवेगळे, हे पाहणे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Shivsena Politics : भाजपला धक्का, 8 नगरसेवकांनी केला शिवसेनेत प्रवेश!

या सर्व शक्यतांमध्ये, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. हा निर्णय केवळ शिवसेनेचेच नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचे भविष्य ठरवणारा आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांना राज ठाकरे व मनसेची साथ कितपत लाभणार यावर भवितव्य अवलंबुन असणार आहे.

Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Governor appointment: उत्सुकता संपली; सी. पी. राधाकृष्णन यांच्यानंतर राज्यपाल पदाचा चेहरा ठरला? या व्यक्तीकडे असणार अतिरिक्त जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com