Mahadev Jankar : महादेव जानकरांचा काँग्रेसकडे ओढा! महायुतीच्या गणितांवर पाणी?

Mahadev Jankar political shift News : महादेव जानकरांचा ओढा काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षाकडे दिसत आहे. जानकर यांची काँग्रेसशी ही वाढती जवळीक ही महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजप 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच राज्यात स्वबळावर सत्तेत आला होता. त्यावेळी भाजपला राज्यभरात महादेव जानकर यांच्या रासपने मोठी साथ दिली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीकडून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये अल्पशा मताने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर 2014 साली देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते पाच वर्ष कॅबिनेट मंत्री देखील होते.

त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघात महायुतीकडून निवडणूक लढवताना पराभव झाल्यापासून ते महायुतीवर नाराज होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र भूमिका घेत महायुतीपासून अलिप्त झाले होते. आता त्यांनी 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे महादेव जानकरांचा ओढा काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षाकडे दिसत आहे. जानकर यांची काँग्रेसशी ही वाढती जवळीक ही महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. जानकार हे स्थानिक स्तरावर प्रभावशाली नेते मानले जातात, विशेषतः धनगर समाजात त्यांचा प्रभाव लक्षणीय आहे.

लोकसभा निवडणुकीपासूनच जानकर यांची पावले महाविकास आघाडीकडे वळताना दिसत आहेत. त्यांच्या या हालचालींमुळेच महायुतीतील नेतृत्वामध्ये अस्वस्थता जाणवत होती. लोकसभेवेळी ते माढा मतदारसंघातून शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी त्यांना महायुतीने परभणीतून उमेदवारी देत त्यांना रोखून धरले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी वेगळी चूल मांडली.

जानकर यांचे पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघात वर्चस्व आहे. बारामती व आसपासच्या मतदारसंघांमध्ये महायुतीच्या संभाव्य मते फोडू शकतात, विशेषतः राष्ट्रवादीच्या गटांमध्ये मतविभाजन रोखण्याच्या दृष्टीने काँग्रेसला बळकटी मिळू शकते. या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाला स्थानिक स्तरावर नव्याने समिकरण तयार करावे लागतील. अन्यथा महादेव जानकर यांच्या काँग्रेसप्रवेशामुळे निवडणुकीचे चित्र पूर्णपणे पालटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Mahadev Jankar
Vaishnavi Hagawane Death: वैष्णवी हगवणेची आत्महत्या नसून हत्या, वडिलांच्या भेटीनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात रासपचे नेते महादेव जानकर कॅबिनेट मंत्री होते. मंत्री पंकजा मुंडे यांना ते बहीण मानतात. मात्र, गेल्या काही महिन्यापासून जानकर भाजपपासून दुरावले आहेत. 'गुलामीच्या बंगल्यात राहण्यापेक्षा स्वाभिमानाच्या झोपडीत राहू.' असा इशाराच त्यांनी दिला आहे. 31 मे रोजी दिल्लीत त्यांनी मेळावा आयोजित केला आहे. यामेळाव्यास राहुल गांधी, शरद पवार ही मंडळी उपस्थित राहणार असल्याने त्यांचा ओढा काँग्रेसकडे दिसून येत आहे. अडचणीत असलेल्या काँग्रेससोबत जानकर जवळीक साधत आहेत. त्यामुळे एवढे मात्र नक्की की भाजपपासूनही नेते दुरावत असल्याचे दिसत आहे. यापूर्वीच महायुतीमधील माजी मंत्री बच्चू कडू हे देखील दुरावलेले आहेत. त्यामुळे महायुतीला येत्या काळात कोण साथ सोडणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

जानकर यांची काँग्रेसशी जवळीकता वाढत असली तरी आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भांत अजून त्यांनी काहीही निर्णय घेतलेला नाही. राष्ट्रीय समाज पक्षाची स्वतंत्र निवडणूक लढविण्याची तयारी आहे. अहिल्यादेवी जयंती सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी राहुल गांधी आणि शरद पवार यांना निमंत्रण दिले आहे. राजकीय चर्चा अजून काहीही झाली नसल्याचे जानकर (Mahadev Jankar) यांनी स्पष्ट केले आहे.

Mahadev Jankar
Vaishnavi Hagawane: CM फडणवीसांकडून वैष्णवीच्या कुटुंबियांची मोठी मागणी मान्य; 'या' खतरनाक सरकारी वकिलाची एन्ट्री; हगवणे कुटुंबाची झोप उडणार

सध्या मी महायुती, एनडीएसोबत नाही. विधानसभा निवडणुकीपासूनच मी एनडीएला सोडले आहे. एनडीएला सोडले म्हणण्यापेक्षा त्यांनी आम्हाला सोडले आहे. आम्ही आता एनडीएसोबत नसल्याने आघाडीबाबत कोणताही प्रॉब्लेम नाही. मी आता नवीन घरोबा करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचा पुढून किती प्रतिसाद येतोय, त्यावर पुढील गोष्टी ठरवल्या जातील.

Mahadev Jankar
Mahayuti alliance: इनकमिंगचा स्फोट! स्थानिकसाठी महायुतीतच पेटणार रणधुमाळी; मित्रपक्षच आमने-सामने आल्याने मतांचे गणित बिघडणार!

राष्ट्रीय समाज पक्षाला सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच आम्ही इंडिया आघाडीसोबत जाण्यास तयार आहोत. ज्या ठिकाणी विजयाची खात्री आहे, त्याच जागा मागण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. लवकरच त्याबाबतची चर्चा सुरू होईल. राष्ट्रीय समाज पक्षानेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आता सध्या आम्ही एनडीएमध्ये नाही, हे मात्र फायनल असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले.

जानकर यांनी घेतलेला हा निर्णय पाहता महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. जानकर यांची मोठी व्होट बँक आहे. गेल्या तीन निवडणुकीत ही मते त्यांनी भाजप व मित्रपक्षाच्या पारड्यात टाकली आहेत. त्यामुळे आता येत्या काळात भाजपपुढे या मतांची भरपाई करण्याचे आव्हान असणार आहे.

Mahadev Jankar
BJP Friendly Contest : 'जिथे जुळणार नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढत', या बावनकुळेंच्या वक्तव्याने महायुतीमध्ये संभ्रम ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com