Maharashtra Assembly Election 2024 : महाविकास आघाडीत 'त्या' 32 जागांसाठी होणार चढाओढ

Mahavikas Aghadi Vidhansabha Election 2024 : जागावाटपासाठी महाविकास आघाडीत चुरशीची लढत! आता विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरे जाताना जागावाटपाचे आव्हान या पक्षांसमोर आहे.
Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi Sarkarnama
Published on
Updated on

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीची तयारी आता सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अनेक वर्षांपासून एकत्रित नांदत असल्याने या दोन्ही पक्षांना परस्परांसमवेत निवडणूक लढविण्याची सवय आहे. मात्र, राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचा जन्म झाला. ज्यांनी आयुष्यभर एकमेकांना पाण्यात पाहिले त्या काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले. आता विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरे जाताना जागावाटपाचे आव्हान या पक्षांसमोर आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या १७ आमदारांच्या विरोधात शिवसेनेने दुसऱ्या क्रमाकांची मते घेतली आहेत. शिवसेनेच्या १५ आमदारांच्या विरोधात काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांच्या वादात अडकलेल्या या ३२ जागांबाबत काय तोडगा निघणार, यावर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे गणित अवलंबून आहे.

काँग्रेस-शिवसेनेत कसरत

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, के. सी. पाडवी, झिशान सिद्दिकी, प्रतिभा धानोरकर, संग्राम थोपटे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करून विजय मिळविला होता. त्यामुळे या जागांसाठी काँग्रेस व ठाकरेंची शिवसेना यांच्यात मोठी कसरत होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसे, रवींद्र वायकर, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, राजन साळवी यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत करून विजय मिळविला होता. यापैकी बहुतांश जण सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. ज्या जागांवर विजय मिळवला त्या जागांवरील दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडणार का? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

Mahavikas Aghadi
Maharashtra Politics : काही नेत्यांनी स्वीकारलीय मतदारांच्या करमणुकीची जबाबदारी...

शिवसेना पिछाडीवर, ‘नोटा’ आघाडीवर

राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे विश्वजित कदम व धीरज देशमुख यांच्या विरोधात युतीमधून शिवसेनेने उमेदवार दिले होते. या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात शिवसेना पिछाडीवर व ‘नोटा’ (नॉन ऑफ द अबॉव्ह) आघाडीवर असल्याचे निकालातून समोर आले. सांगली जिल्ह्यातील पलुस कडेगावमधून काँग्रेस उमेदवार विश्वजित कदम यांना एक लाख ७१ हजार ४९७, ‘नोटा’ला २० हजार ६३१ तर शिवसेना उमेदवार संजय विभुते यांना आठ हजार ९७६ मते मिळाली. लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांना एक लाख ३५ हजार ६, ‘नोटा’ला २७ हजार ५०० तर शिवसेना उमेदवार सचिन देशमुख यांना १३ हजार ५२४ मते मिळाली. कदम-देशमुख यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवारांनी तयारी केली होती. या दोन्ही जागा युतीमध्ये शिवसेनेला गेल्याने भाजप कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता.

Mahavikas Aghadi
Aam Adami Party : 11 वर्षांत 'आप' सरकारचा 'स्ट्राइक'रेट कसा राहिला; आतिशी यांच्या टीममध्ये किती बदल होणार?

पोटनिवडणुकीत जुळले सूत्र

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असताना काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव व रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाले. या दोन्ही ठिकाणी काँग्रेस (Congress) विजयी झाले. देगलूरमधून जितेश अंतापूरकर व कोल्हापूर उत्तरमधून जयश्री जाधव यांना विजयी करण्यात तेथील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केलेली मेहनत महत्वाची ठरली. पंढरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीप्रमाणे या दोन्ही ठिकाणी भाजपने बेरजेच्या राजकारणाचे प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही.

सुरुवातीला सत्तेसाठी महाविकास आघाडीच्या प्रयोग झाला. नंतर महायुतीचा प्रयोग सुरू झाला. राज्यातील जनतेला ‘महायुती’पेक्षा ‘महाविकास’चा प्रयोग योग्य वाटल्याचे लोकसभा निवडणूक निकालाने दाखवून दिले. २०१९ मध्ये परस्परांच्या विरोधात लढलेल्या काँग्रेस व शिवसेनेला आता २०२४ च्या जागा वाटपासाठी सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

या ३२ जागा ठरणार महत्त्वाच्या

  • अक्कलकुवा (जि. नंदुरबार) काँग्रेस : के. सी. पाडवी : ८२७७० वि. शिवसेना : आमशा पाडवी : ८०६७४

  • मेहकर (जि. बुलडाणा) शिवसेना : संजय रायमुलकर : ११२०३८ वि. काँग्रेस : अनंत वानखेडे : ४९८३६

  • तिवसा (जि.अमरावती) काँग्रेस : यशोमती ठाकूर : ७६२१८ वि. शिवसेना : राजेश वानखेडे : ६५८५७

  • ब्रह्मपुरी (जि.चंद्रपूर) काँग्रेस : विजय वडेट्टीवार : ९६२७६ वि. शिवसेना : संदिप गड्डमवार : ७८१७७

  • वरोरा (जि.चंद्रपूर) काँग्रेस : प्रतिभा धानोरकर : ६३८६२ वि. शिवसेना संजय देवतळे : ५३६६५

  • नांदेड उत्तर (जि.नांदेड) शिवसेना : बालाजी कल्याणकर : ६२८८४ वि. काँग्रेस : डी. पी. सावंत : ५०७७८

  • देगलूर (जि.नांदेड) काँग्रेस : रावसाहेब अंतापूरकर : ८९४०७ वि. शिवसेना : सुभाष साबणे : ६६९७४

  • जालना (जि. जालना) काँग्रेस : कैलास गोरंट्याल : ९१८३५ वि. शिवसेना : अर्जून खोतकर : ६६४९७

  • मालेगाव बाह्य (जि. नाशिक) शिवसेना : दादाजी भुसे : १२१२५२ वि. काँग्रेस : डॉ. तुषार शेवाळे : ७३५६८

Mahavikas Aghadi
Assembly Election 2024 : लय बिघडलेलीच; विधानसभेलाही मोदी महाविकास आघाडीसाठी 'लकी' ठरणार?
  • इगतपूर (जि. नाशिक) काँग्रेस : हिरामण खोसकर : ८६५६१ वि. शिवसेना : निर्मला गावित : ५५००६

  • पालघर (जि. पालघर) शिवसेना : श्रीनिवास वनगा : ६८०४० वि. काँग्रेस : योगेश नम : २७७३५

  • अंबरनाथ (जि. ठाणे) शिवसेना : बालाजी किणीकर : ६००८३ वि. काँग्रेस : रोहित साळवे : ३०७८९

  • ओवळा, माजीवडा (जि. ठाणे) शिवसेना : प्रताप सरनाईक : ११७५९३ वि. काँग्रेस : विक्रांत चव्हाण : ३३५८५

  • कोपरी, पाचपाखडी (जि. ठाणे) शिवसेना : एकनाथ शिंदे : ११३४९७ वि. काँग्रेस : संजय घाडीगावकर : २४१९७

  • जोगेश्वरी पूर्व, मुंबई उपनगर शिवसेना : रविंद्र वायकर : ९०६५४ वि. काँग्रेस : सुनील कुमरे : ३१८६७

  • चांदिवली, मुंबई उपनगर शिवसेना : दिलीप लांडे : ८५८७९ वि. काँग्रेस : नसीम खान : ८५४७०

  • चेंबूर, मुंबई उपनगर शिवसेना : प्रकाश फाटर्पेकर : ५२२६४ वि. काँग्रेस : चंद्रकांत हांडोरे : ३४२४६

  • कलिना, मुंबई उपनगर शिवसेना : संजय पोतनिस : ४३३१९ वि. काँग्रेस : जॉर्ज अब्राहम : ३८३८८

Mahavikas Aghadi
Maharashtra Assembly Election : भाजप चुका सुधारणार की पुन्हा मोदींवरच विसंबून राहणार?
  • वांद्रे पूर्व, मुंबई उपनगर काँग्रेस : झिशान सिद्दिकी : ३८३३७ वि. शिवसेना : विश्वनाथ महाडेश्वर : ३२५४७

  • धारावी, मुंबई काँग्रेस : वर्षा गायकवाड : ५३९५४ वि. शिवसेना : अशिष मोरे : ४२१३०

  • मुंबादेवी, मुंबई काँग्रेस : अमीन पटेल : ५८५९२ वि. शिवसेना : पांडुरंग सपकाळ : ३५२९७

  • महाड (जि. रायगड) शिवसेना : भरत गोगावले : १०२२७३ वि. काँग्रेस : माणिक जगताप : ८०६९८

  • पुरंदर (जि. पुणे) काँग्रेस : संजय जगताप : १३०७१० वि. शिवसेना : विजय शिवतारे : ९९३०६

  • भोर (जि. पुणे) काँग्रेस : संग्राम थोपटे : १०८९२५ वि. शिवसेना : कुलदीप कोंडे : ९९३०६

  • संगमनेर (जि. नगर) काँग्रेस : बाळासाहेब थोरात : १२५३८० वि. शिवसेना : साहेबराव नवले : ६३१२८

Mahavikas Aghadi
Maharashtra Assembly Election : भाजप चुका सुधारणार की पुन्हा मोदींवरच विसंबून राहणार?
  • श्रीरामपूर (जि. नगर) काँग्रेस : लहु कानडे : ९३९०६ वि. शिवसेना : भाऊसाहेब कांबळे : ७४९१२

  • उमरगा (जि. धाराशिव) शिवसेना : ज्ञानराज चौगुले : ८६७७३ वि. काँग्रेस : दत्तू भालेराव : ६११८७

  • धाराशिव (जि. धाराशिव) शिवसेना : कैलास पाटील : ८७४८८ वि. राष्ट्रवादी : संजय निंबाळकर : ७४०२१

  • राजापूर (जि. रत्नागिरी) शिवसेना : राजन साळवी : ६५४३३ वि. काँग्रेस : अविनाश लाड : ५३५५७

  • करवीर (जि. कोल्हापूर) काँग्रेस : पी. एन. पाटील : १३५६७५ वि. शिवसेना : चंद्रदीप नरके : ११३०१४

  • कोल्हापूर उत्तर (जि. कोल्हापूर) काँग्रेस : चंद्रकांत जाधव : ९१०५३ वि. शिवसेना : राजेश क्षीरसागर : ७५८५४

  • हातकणंगले (जि. कोल्हापूर) काँग्रेस : राजू आवळे : ७३७२० वि. शिवसेना : डॉ. सुजित मिणचेकर : ६६९५०

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com