Sharad Pawar Analysis : नाम तो सुनाही होगा...शरद पवार !

Maharashtra Lok Sabha Results : विधानसभेसाठी ठाकरे-पवार आणि जोडीला काँग्रेस राहणार असल्याचे संकेत देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवारांनी आता राष्ट्रवादीतील फुटीर, शिवसेनेतील गद्दारांना बघून घेणार असल्याचे सांगितले.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama

Lok Sabha Election 2024 Results : फोडाफोडी, चौकाशांवर चौकशा लावून ठाकरे-पवारांचे राजकीय संपविण्यासाठी उठलेल्या भाजप नेत्यांना निवडणुकीच्या निकालातून चोख उत्तर मिळाले आहे. लोकसभेचे मैदान मारल्यानंतर आता ठाकरे-पवारांनी पुढच्या विधानसभा निवडणुकीतही शिंदे-फडणवीस आणि अजितदादांना चितपट करण्याचा डाव आखला आहे. विधानसभेसाठी ठाकरे-पवार आणि जोडीला काँग्रेस राहणार असल्याचे संकेत देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवारांनी आता राष्ट्रवादीतील फुटीर, शिवसेनेतील गद्दारांना बघून घेणार असल्याचे सांगितले.

विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही सामूहीक निर्णय घेणार असल्याचे मोजक्याच शब्दांत सांगून पवारांनी महाविकास (MVA) कायम राहील, असेच सूचित केले. लोकसभा निवडणुकीत ठाकरे-पवारांनी धुव्वा उडविला असतानाच पुढच्या निवडणुकीतही आघाडी एकजूट राहणार असल्याचे ऐकून सत्ताधाऱ्यांची झोप उडणार हे नक्की. (Lok Sabha Election 2024 Results)

भाजपच्या एककल्ली राजकीय अजेंडा वैतागलेल्या शिवसेनेचे अर्थात, उद्धव ठाकरेंनी २०१९ च्या निवडणुकीनंतर युती तोडली आणि महाविकास आघाडीची गाठ बांधली. त्यासाठी पवारसाहेबानी पुढाकार घेत, ठाकरेंना 'सीएम' केले. मात्र, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या साथीने. पण, सत्तेच्या खुर्चीची हाव असलेल्या भाजपने ठाकरेंना दातात धरले. त्यानंतर जेमतेम दोन-सव्वादोन वर्षांत त्यांना सत्तेतून बाहेर काढले. त्यासाठी ठाकरेंचे विश्वासून शिंदेंना फोडले, त्यांच्यासोबत ५० आमदार खेचले. ठाकरेंची 'सीएम' पदाची खुर्ची तर गेलीच. यापलकीडे जाऊन ठाकरेंना दिल्लीतही मान ठेवला नाही, त्यासाठी त्यांचे डझनापेक्षा अधिक खासदार फोडले.

एवढे करूही न भागलेल्या शिंदे-फडणवांसीनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) साथीला घेतले. यानिमित्ताने ठाकरेंची मुंबईतील सद्दी संपविण्याचा 'मेगाप्लॅन' आखला गेला. लोकसभा निवडणुकीतही ठाकरेंना छोबीपछाड देण्याचा शिंदे-फडणवीस राज यांचा पवित्रा राहिला. मात्र, लोकसभा निवडणुकीत फडणवीस, शिंदेपेक्षा तगडे उमेदवार देऊन ठाकरेंनी आपण ठाकरे असल्याचे दाखवून दिले.

त्यानंतर ठाकरेंच्या चालीपुढे शिंदे-फडणवीसांची दमछाक झाली. मुंबईतील 6 पैकी 5 जागांवर ठाकरेंनी ताकद दिलेल्या उमेदवारांची विजयी घोडदौड पाहायला मिळाली. मुंबईसह राज्यातील बहुतांश मतदारसंघातही ठाकरेंचा डंका दिसला. ठाकरेंसोबत पवार आणि काँग्रेसला चांगले यश मिळाले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) प्रेस काँग्रेस (Congress) घेतली आणि पुढच्या निवडणुकीची गणिते मांडली.

विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीआधी पवारसाहेब आणि ठाकरेंकडे तगडे उमेदवार नसतानाही ऐनवेळी म्हणजे, अर्ज भरण्याच्या दिवशीपर्यंत डावांवर डाव टाकत पवारसाहेब आणि ठाकरे आपले पत्ते काढले आणि सत्ताधाऱ्यांना टाइट केले. त्यामुळे निकालात पवार-ठाकरे यांनी बाजी जिंकली. त्यामुळे राजकीय खेळात पवार हलक्या घेणे कोणालाही परवडणारे नसते. अगदीच तसेच आताही घटले म्हणून.. नाम तो सुना होगा...शरद पवार इतकेच म्हणावे लागेन.

(Edited By : Sachin Waghmare)

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com