Manohar Joshi : ठाकरे कुटुंबातील चार पिढ्यांसोबत काम करणारा कडवट शिवसैनिक!

Former Maharashtra Chief Minister Manohar Joshi passed away : मनोहर जोशी यांनी प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उध्दवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे.
Manohr Joshi, Uddhav thackeray, Balasaheb Thackeray
Manohr Joshi, Uddhav thackeray, Balasaheb Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : शिवसेनेच्या इतिहासात बाळासाहेब ठाकरे प्रमाणेच मनोहर जोशी यांचे स्वतंत्र स्थान आहे. नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते केंद्रात मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. प्रचंड गरिबीतूनही त्यांनी केलेला प्रवास, त्यासाठी घेतलेले कष्ट आणि त्यांना मिळालेले यश थक्क करणारे आहे.

राजकारणाप्रमाणेच व्यवसायातही यश मिळवून त्यांनी कोहिनूरची उंची गाठली. विशेष म्हणजे ठाकरे कुटुंबाच्या चार पिढ्यांसोबत काम करण्याची त्यांना संधी मिळाली आहे. मनोहर जोशी यांनी प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उध्दवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. 

मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रायगड जिल्ह्यातील नांदवी या छोट्याशा गावात झाला. त्याचं शिक्षण चौथीपर्यंत नांदवीला झाले. त्यानंतर पनवेलला मामांकडे राहिले. मामांची बदली झाल्यामुळे गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करून मित्राच्या खोलीत भाड्याने राहिले. समाजकारणाच्या उद्देशाने व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या प्रभावामुळे मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनी 1967 साली शिवसेनेत प्रवेश करत राजकारणात सक्रीय सहभागी झाले. (Manohar Joshi Dead)

Manohr Joshi, Uddhav thackeray, Balasaheb Thackeray
Manohar Joshi Passed Away:माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

त्यानंतर महानगरपालिकेत नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास पाहायला मिळाला. विशेष म्हणजे ते 2002-2004 या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष होते. मनोहर जोशी हे शिवसेनेकडून 2 वेळा नगरसेवक, 3 वेळा विधानपरिषद सदस्य, 1976 -77 मध्ये मुंबईचे महापौर, 2 वेळा विधानसभा सदस्य, 1990- 91 विधानसभेचे विरोधी पक्षनेता होते.

त्यानंतर 1995-99 मध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यानंतर ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ते लोकसभेत निवडून गेले. अवजड आणि सार्वजनिक उद्योग खाते त्यांनी काही काळ सांभाळले होते. 2002-2004 या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणेच शिवसेना वाढवण्यात मनोहर जोशी यांचा देखील मोठा वाटा आहे. आपलं संपूर्ण राजकीय आयुष्य त्यांनी एकाच शिवसेना पक्षासाठी वाहून दिले होते. विशेष म्हणजे ठाकरे कुटुंबाच्या चार पिढ्यांसोबत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत मनोहर जोशी यांनी काम केले आहे. 

मनोहर जोशी सुरुवातीच्या काळापासून शिवसेनेत असल्यामुळे त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षाचा स्वभाव परिचित होता. 1995 साली राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी मनोहर जोशी यांची निवड केली. जोशी यांनी ही जबाबदारी निष्ठेने सांभाळली.

मुख्यमंत्री झाल्यावरही ते अनेकदा पक्षप्रमुखांना भेटत. त्यांनी पर्यायी किंवा समांतर सत्ताकेंद्र तयार होण्यासाठी कधीही प्रयत्न केले नाहीत. फक्त घटनात्मक पदावर नेमणूक झाल्यावर त्या पदाचा सन्मान राखला जावा, अशी त्यांची अपेक्षा निश्चित होती.

मनोहर जोशी पक्षाची शिस्तही पाळायचे आणि मुख्यमंत्री म्हणून आपल्या निर्णयावर ठामही असायचे. जोशी यांचे बाळासाहेब ठाकरेसोबत स्नेहपूर्ण संबंध होते. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही त्यांना केंद्रात मंत्रिपद व लोकसभेचे अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांना दिली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाळासाहेबांच्या निकट राहण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांच्यामुळे त्यांना अनेक पदेही मिळाली. सेनेच्या वाटचालीत अनेकदा बाळासाहेब ठाकरे त्यांच्याशी सल्लामसलत करत होते. 2004 नंतर शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे आली. बाळासाहेब व उद्धव यांच्या कार्यपद्धतीत फरक होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या सोबतही जोशी यांचे संबंध चांगले राहिले.

मनोहर जोशी यांना 2006 नंतरही राज्यसभेवर संधी देण्यात आली. बाळासाहेबांच्या निधनानंतर ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचा सल्ला नेहमीच उद्धव ठाकरे हे घेत होते. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे कुटुंबाची चौथी पिढी राजकारणात उतरली. आदित्यची ही काम करण्याची पद्धत मनोहर जोशी यांनी जवळून अनुभवली आहे. विशेषतः जून 2022 साली शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या फुटीनंतर मनोहर जोशी हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटासोबतच राहिले. शेवटच्या श्वासापर्यंत ते ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ राहिले.

Manohr Joshi, Uddhav thackeray, Balasaheb Thackeray
Manohar Joshi Passes Away: मनोहर जोशींकडे मुख्यमंत्रिपद, पण रिमोट कंट्रोल बाळासाहेब ठाकरे…!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com