Manoj Jarange Maratha Morcha : जरांगेंमुळे एकवटलेल्या 'मराठा व्होट बँके'चा फटका निवडणुकीत कुणाला बसणार?

Manoj Jarange Maratha Morcha : लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर...
Manoj Jarange Maratha Morcha :
Manoj Jarange Maratha Morcha : Sarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी आर-पारची लढाई पुकारलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनात लाखोंचा जनसमुदाय एकवटू लागला आहे. त्याचा प्रत्यय कालच्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मावळ दौऱ्यात आला. या हंगामातील नीचांकी थंडीत लाखो मराठा समाजबांधव या तिन्ही ठिकाणी नियोजित वेळेपेक्षा कितीतरी तास उशीर होऊनसुद्धा जरांगे व त्यांच्या पदयात्रेची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहताना दिसले. (Latest Marathi News)

Manoj Jarange Maratha Morcha :
Maratha Reservation : धक्कादायक! मराठा सर्वेक्षणासाठी चक्क पहिली नापास कर्मचारी...

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काल सकाळी (दि. 24 जाने) दहा वाजता त्यांचे उद्योगनगरीत आगमन होणार होते. पण, ते चक्क बारा तास उशिरा रात्री दहाला आले. तरी, हजारो पिंपरी-चिंचवडकर मराठा समाज त्यांची कुडकुडणाऱ्या थंडीतही वाट पाहत होता. ओबीसीच नाही, तर मुस्लिम बांधवांचीही त्यांना काही ठिकाणी साथ मिळाली. मावळात लोणावळा येथील वाकसईत त्यांच्या काल रात्री नऊच्या सभेला तेवढाच उशीर झाला. ती आज सकाळी झाली. तरी मावळवासीयांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता अन् या सभेची गर्दीही कमी झाली नाही.

जरांगेंमुळे उद्योगनगरीतीलच नव्हे, तर राज्यातील त्यातही मराठवाड्यातील कडवा मराठा समाज पुन्हा एकवटू लागला आहे. त्यात तरुण आघाडीवर आहेत. समाजाचे नेते विविध राजकीय पक्षात असल्याने ते एकत्र येण्यात अडसर आहे. मात्र, व्होट बँक म्हणून हा समाज आता एकत्र येऊ लागला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर त्या निवडणुकीत ही व्होट बँक निर्णायकी भूमिका बजावणार आहे. त्याचा फटका हा स्वाभाविकपणे सत्ताधारी पक्षाला बसणार, यात शंका नाही. त्यामुळे अब की बार, राज्यात 45 पार हे लोकसभेला साकारणे भाजपला जिकीरीचे ठरणार आहे. ती जिंकण्यासाठी मोठा आटापिटा वा घोषणा त्यांच्याकडून होऊ शकते.

Manoj Jarange Maratha Morcha :
MangalPrabhat Lodha : आदित्य ठाकरेंना भाजप घेरणार; मंगलप्रभात लोढा थेट वरळीच्या मैदानात!

जरांगेंचे आंदोलन व त्यातही 20 तारखेपासून त्यांनी सुरू केलेल्या जालना-मुंबई या पदयात्रेमुळे अधिक झालेली एकजूट टिकवून ठेण्याचे आव्हानही आता मराठा समाजासमोर उभे राहिले आहे. पण, ही एकी न राहता आपले इप्सित साध्य करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या षडयंत्राला बळी न पडण्याचे दुसरे मोठे आणि खरे आव्हान मराठा समाजाला आता पेलायचे आहे. त्याची पहिली लिटमस टेस्ट येत्या एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता असलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दिसेल. ही एकी नंतर होणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत टिकली, दिसली, तर आतापर्यंत राजकारणात एकगठ्ठा मतदार म्हणून प्रभाव पाडू न शकलेली मजबूत मराठा व्होट बँक निर्माण होणार असून, त्याचा फायदा समाजालाच होणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com