मंत्रालयात सतर्क पोलिसांनी आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीस रोखले

लासलगावच्या गुलाब शिंगारीयांनीनैराश्यातून अंगावर राँकेल ओतून आत्महत्याचा प्रयत्न केला. पोलीसांच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला. पोलीसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे गुलाब शिंगारी यांचा प्राण वाचला. परंतू झालेल्या प्रकारामुळे मंत्रालय पुन्हा थरारले.
मंत्रालयात सतर्क पोलिसांनी आत्महत्या  करणाऱ्या व्यक्तीस  रोखले

लासलगावच्या गुलाब शिंगारी यांनी  नैराश्यातून अंगावर राँकेल ओतून आत्महत्याचा प्रयत्न केला. पोलीसांच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला. पोलीसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे गुलाब शिंगारी यांचा प्राण वाचला. परंतू झालेल्या प्रकारामुळे मंत्रालय पुन्हा थरारले.

आत्मदहनाचा प्रयत्न करणारे गुलाब शिंगारी हे  मूळचे  लासलगावचे  आहे. पोलीस पाटील आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर अवैधरित्या कब्जा केल्याचा आरोप गुलाब शिंगारी यांनी केली आहे. याबाबत न्याय मिळावा या मागणीसाठी ते  मंत्रालयात आले होते . 

 मात्र,  त्यानी नैराश्यातून अंगावर राँकेल ओतून आत्महत्याचा प्रयत्न केला. पोलीसांच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला. पोलीसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे गुलाब शिंगारी यांचा प्राण वाचला. परंतू झालेल्या प्रकारामुळे मंत्रालय पुन्हा थरारले.

मंत्रालयात येत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने मंत्रालयीन  कर्मचाऱ्यांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. मंत्रालय सुरक्षा कर्मचाऱ्यांवरही या प्रकारांमुळे कामाचा ताण  वाढत असल्याचे दिसून येते.

मंत्रालयात येत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने मंत्रालयीन  कर्मचाऱ्यांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. मंत्रालय सुरक्षा कर्मचाऱ्यांवरही या प्रकारांमुळे कामाचा ताण  वाढत असल्याचे दिसून येते. १० नोव्हेंबर २०१७ रोजी तुळजापूर येथिल ज्ञानेश्वर साळवे या तरुण शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील छतावर चढला होता. त्यानंतर २२ जानेवारी २०१८ रोजी धुले येथिल धर्मा पाटील या ८४ वर्षीय शेतकऱ्याने मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या केबिनबाहेरच विषप्राशन करून आत्महत्या केली. 

तर २ फेब्रुवारी २०१८ – मारुती धावरे, सोलापूर जिल्ह्यातील २८ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या करण्यासाठी कीटकनाशक घेऊन मंत्रालयात आला होता, परंतु त्याचा पोलीसांनी गेटवर ताब्यात घेतले. त्यानंतर ७ फेब्रुवारी २०१८ रोजी अविनाश शेटे, नगर जिल्ह्यातील तरुणाने मंत्रालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. ८ फेब्रुवारी २०१८ रोजी हर्षल रावते या चेंबूरमधील हर्षल रावते या तरुणाने तुरुंगवासाची शिक्षा कमी करीत नाही म्हणून नैराश्य आल्याने थेट पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी सखूबाई विठ्ठल झाल्टे या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com