Maratha Reservation : मराठा आरक्षण पदयात्रेपासून समाजाचेच आमदार, खासदार का आहेत चार हात दूर?

Pimpri Chinchwad : आमदार सुनील शेळकेंनी केली वाकसाईतील सभेची तयारी
Maratha Reservation March in Pune
Maratha Reservation March in PuneSarkarnama
Published on
Updated on

Maval Political News : मराठा आरक्षणाच्या मागणीच्या अंतिम आणि निर्णायकी ठरू पाहणाऱ्या लढाईच्या टप्यात मराठा योद्धा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी 20 तारखेपासून जालना ते मुंबई अशी पदयात्रा सुरु केली आहे. तिचे स्वागत करताना सत्ताधारी मराठा समाजाच्या आमदार, खासदारांची अवस्था इकडे आड, अन् तिकडे विहिर अशी झाल्याचे दिसून आले. त्याचा प्रत्यय पुणे व पिंपरी-चिंचवडलाही आला.

Maratha Reservation March in Pune
रोहित पवारांची आज चौकशी, कार्यालयाबाहेर समर्थकांची प्रचंड गर्दी | Rohit Pawar | NCP Office |

उद्योगनगरीतील तीनपैकी दोन आमदार आणि दोनपैकी एक खासदार मराठा आहेत. त्यातील एकानेही जरांगे व त्यांच्या मुंबईला निघालेल्या रॅलीचे जाहीर स्वागत केले नाही. मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) त्याला अपवाद ठरले. त्यांनी, मात्र जरांगे व त्यांच्या रॅलीचे जाहीर स्वागत करण्याचे धाडस दाखवले.

लोणावळ्याजवळ वाकसई येथे होणाऱ्या या पदयात्रेच्या मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या सोयीसुविधांचा त्यांनी भेट देऊन आढावा घेतला. तसेच रॅलीतील समाजबांधवांना शक्य तो मदत करण्याचे आवाहन त्यांनी मावळवासियांना केले. त्यांच्या या पुढाकाराची त्याचवेळी पिंपरी-चिंचवडमधील मराठा आमदार, खासदार चार हात दूर राहिल्याची चर्चा मराठा समाजात आहे.

राज्यातील बहुतांश मराठा आमदार हे मराठा आरक्षण आंदोलनात जाहीरपणे सामील झालेले नाहीत. त्यात सत्ताधाऱी अधिक आहेत. मराठा आरक्षण (Maratha Reservation) देणे हे सत्ताधाऱ्यांच्या हातात असल्याचे मराठा समाजाचे म्हणणे आहे. पण, ते दिले, तर आरक्षणाची घटनात्मक मर्यादा ओलांडली जाऊन न्यायालयात ते टिकणार नाही, अशी भीती सत्ताधाऱ्यांना आहे.

ओबीसी (OBC) कोट्यातून ते देण्यास या घटकाने तीव्र विरोध केला आहे. अशा त्रांगड्यामुळे सत्ताधारी मराठा आमदार, खासदारांना याप्रश्नी बचावात्मक भूमिका घ्यावी लागली आहे. परिणामी समाजाच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागते आहे. दुसरीकडे याची किंमत निवडणुकीत मोजावी लागेल, अशी भीती त्यांना आहे. त्यातून त्यांची अवस्था 'धरलं तर चावतंय, आणि सोडलं तर पळतंय' अशी झाली आहे.

Maratha Reservation March in Pune
MangalPrabhat Lodha : आदित्य ठाकरेंना भाजप घेरणार; मंगलप्रभात लोढा थेट वरळीच्या मैदानात!

उद्योगनगरीतील मराठा समाजाचे आमदार, खासदार जरांगेंच्या पदयात्रेच्या स्वागतापासून सुरक्षित अंतर राखून असले, तरी समाज मात्र त्यासाठी एकवटल्याचे दिसून आले. मावळात, तर तो अधिक दिसून आला. त्यात त्यांना स्थानिक आमदारांची ताकद मिळाल्याने तेथील बुधवारची सभा आणि पाच ते सहा लाख बांधवांचा तेथील मुक्काम विनासायास होईल, अशी शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com