Pune News : मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला सरकारची परवानगी नसताना देखील ते मुंबईत येत आहेत. त्यांना रोखावे, यासाठी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना नोटीस, हायकोर्टात हजर राण्याबाबत नोटीस देण्याची सूचना केली. हायकोर्टाच्या या नोटीस देण्याच्या आदेशानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी उत्तर दिले आहे.
मराठा आंदोलकांच्या वतीने आमचे वकील कोर्टात जातील. काय आहे ते बघतील. त्यानंतर नोटिशीचं काय करायचं ते बघू , असं सांगत न्यायमूर्ती आम्हाला न्याय देतील, असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला. जरांगे-पाटील (Manoj jarange-patil) यांची आज (बुधवारी) पुण्यात पदयात्रा होती. या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
न्यायालयाच्या (court) नोटीसबाबत बोलताना जरांगे म्हणाले, न्यायमंदिर हे सगळ्यांसाठीच आहे. त्यात एवढं काय घाबरण्यासारखं आहे? न्याय मंदिरात आम्हालाही न्याय मिळेल. एवढं काय विशेष आहे, असं मला वाटत नाही. न्यायालयात त्यांनी जी बाजू मांडली त्यावर तो निर्णय दिला आहे. आम्हीदेखील आमची बाजू मांडू. आम्हालाही न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत.
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथून निघालेली पदयात्रा पुण्यामध्ये पोहोचली आहे. पुण्यामध्ये जरांगे-पाटील यांचे मराठा समाजाकडून स्वागत करण्यात आले. पाटील यांचा ताफा आज (बुधवारी) पहाटे पुण्यामध्ये दाखल झाला. त्यानंतर त्या ठिकाणी जरांगे-पाटील यांची जाहीर सभा झाली. यानंतर जरांगे-पाटील सकाळीच मुंबईच्या दिशेने निघाले. जरांगे-पाटील यांच्या मुंबईच्या दिशेने निघालेला ताफा सहा वाजण्याच्या सुमारास येरवडा येथून शिवाजीनगरच्या जवळ पोहोचला होता.
(Edited By Roshan More)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.