राणेंच्या बंगल्याबाहेर मार खाणाऱ्या शिवसैनिकाला असंही बक्षीस!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना सुरू आहे.
mohsin shaikh appointed as yuva sena joint secretary
mohsin shaikh appointed as yuva sena joint secretary
Published on: 
Updated on: 

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा सामना सुरू झाला आहे. राणेंच्या जुहू येथील बंगल्यासमोर शिवसैनिकांनी निदर्शने केली होती. यात मोहसीन शेख (Mohsin Shaikh) याला पोलिसांनी कपडे फाटेपर्यंत मारले होते. परंतु, याचेच त्याला बक्षीस मिळाले असून, त्याची बढती झाली आहे. 

राणेंच्या जुहू येथील बंगल्यासमोर 24 ऑगस्टला आंदोलन करणारे युवासेनेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेंकांना भिडल्याने पोलिसांनी लाठीमार केला होता. यात मोहसीन शेख या युवासेनेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. यात त्याचे कपडेही फाटले होते. त्याचे फोटो आणि व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता या मोहसीन शेखला बढती देण्यात आली असून, त्याची युवासेना सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे. 

याबाबतचे ट्विट युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी केले आहे. युवासेनेचा ढाण्या वाघ मोहसीन शेख ह्यांची युवासेना सहसचिव पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. दरम्यान, मोहसीन शेख याची पत्नी नादिया शेख ही राष्ट्रवादी काँग्रेसची शिवाजीनगर, मानखुर्द येथील नगरसेविका आहे. चार वर्षांपूर्वी मोहसीन शेख याने शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याची पत्नी अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. 

राणेंची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू 
नारायण राणे यांच्या अटकेनंतर आज पुन्हा जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरीमध्ये सुरु झाली. त्यावेळी राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला आव्हान दिले. ते म्हणाले, भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? रमेश मोरे आणि जया जाधवची हत्या कशी झाली? आम्हालाही जुनी प्रकरणे माहिती आहेत. त्याचे कारण काय हेसुद्धा माहिती आहे. आपल्याच बंधूच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कोणी कोणाला सांगितले हे माहिती आहे. टप्प्याटप्प्याने सगळे बाहेर काढणार. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सॅलियनची केस संपलेली नाही. मी केंद्रात मंत्री असून, तुम्ही मला किती दिवस अटक करणार आहात. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com