France President Viral Video : विमानात पती-पत्नीमध्ये काय घडलं? फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी थेटच सांगितलं...

Brigitte Macron's Playful Gesture Caught on Camera : राष्ट्रपती मॅक्रॉन हे पत्नीसह व्हिएतनामच्या दौऱ्यावर होते. राजधानी हनोई येथील विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानातून उतरत असतानाचे एक दृश्य कॅमेरात कैद झाले आहे.
French President Emmanuel Macron and First Lady Brigitte Macron during their arrival in Hanoi, Vietnam, where a light-hearted moment between the couple was captured on camera.
French President Emmanuel Macron and First Lady Brigitte Macron during their arrival in Hanoi, Vietnam, where a light-hearted moment between the couple was captured on camera. Sarkarnama
Published on
Updated on

Emmanuel Macron Clarifies the Viral Incident : फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिगिट यांचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पत्नीने पतीच्या थोबाडीत मारल्याचा दावा सोशल मीडियात नेटकऱ्यांकडून केला जात आहे. त्यावर आता मॅक्रॉन यांचाही खुलासा आला आहे.

राष्ट्रपती मॅक्रॉन हे पत्नीसह व्हिएतनामच्या दौऱ्यावर होते. राजधानी हनोई येथील विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानातून उतरत असतानाचे एक दृश्य कॅमेरात कैद झाले आहे. विमानातून उतरण्याआधी पत्नीकडून मॅक्रॉन यांच्या तोंडाला हात लावून तो ढकलल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. पत्नीने पतीच्या थोबाडीत मारल्याची चर्चा त्यावरून सुरू झाली.

व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर मॅक्रॉन यांनीही त्यावर तातडीने खुलासा केला आहे. पती-पत्नीतील वादाच्या बातम्या त्यांनी खोडून काढल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मी माझ्या पत्नीची थट्टा करतानाचा हा व्हिडीओ आहे.  पण तो कसा काय व्हिडीओ एका गृहावरील आपत्ती बनतो? लोक त्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी सिद्धांत देखील मांडत आहेत, अशी खिल्ली मॅक्रॉन यांनी उडवली.

French President Emmanuel Macron and First Lady Brigitte Macron during their arrival in Hanoi, Vietnam, where a light-hearted moment between the couple was captured on camera.
Opertation Sindoor नाव मोदींनी सुचवलं; पण लोगो कोणी तयार केला? अशी आहे इनसाइड स्टोरी

विमानातील व्हिडीओ खरे असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. सर्व व्हिडिओ खरे आहेत. कधीकधी लोक त्यांच्याशी छेडछाड करतात. परंतु लोक त्यांना सर्व प्रकारच्या मूर्खपणाचे श्रेय देतात, असेही मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. दरम्यान, मॅक्रॉन यांचा व्हिडीओ त्यांच्या विरोधकांकडून तसेच विरोधी देशांतूनही व्हायरल केल्याचे बोलले जात आहे.

French President Emmanuel Macron and First Lady Brigitte Macron during their arrival in Hanoi, Vietnam, where a light-hearted moment between the couple was captured on camera.
Goa BJP Minister Corruption : गोव्यातील भाजप सरकारमध्ये चाललंय काय? CM सावंतांच्या खात्यावर मंत्री गावडेंच्या आरोपाची दिल्लीत दखल, कारवाईकडे लक्ष...

नेमकं काय घडलं?

विमानातून उतरण्याआधी मॅक्रान यांच्या तोंडाला पत्नी हाताने जोरदात धक्का देत असल्याचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओ पत्नी ब्रिगिट मात्र दिसत नाही. विमानतळावरी कॅमेरा पाहून मॅक्रॉन हात दाखवत पुन्हा आत निघून जातात. त्यानंतर पती-पत्नी दोघेही एकत्रितपणे विमानातून खाली उतरतात. पण दोघांनी नेहमीप्रमाणे एकमेकांच्या हातात हात घेतला नव्हता. त्यामुळे दोघांमधील वादाच्या चर्चांना उधाण आले होते.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com