Hadapsar Assembly Election 2024: मतदानाच्या चार दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या माजी आमदाराचा मोठा निर्णय; हडपसरच्या राजकारणात मोठी घडामोड

Thackeray's ex-MLA major decision before voting in Hadapsar: प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर होताच महादेव बाबर यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला होता. पण त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.
Mahadev Babar
Mahadev BabarSarkarnama
Published on
Updated on

सागर आव्हाड

Pune News: हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतन तुपे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप आणि मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांच्या प्रामुख्याने लढत होत असताना हडपसरच्या राजकारणात मोठी घडमोड घडली आहे.

माजी आमदाराने घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे त्यांचा फटका कुणाला बसणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी आमदार महादेव बाबर यांनी अपक्ष आमदार गंगाधर बधे यांनी पाठींबा जाहीर केला आहे.

हडपसरमधून महादेव बाबर हे इच्छुक होते. त्यांनी प्रचाराला सुरवातही केली होती. पण महाविकास आघाडीमध्ये हडपसरची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटली. प्रशांत जगताप हे आघाडीचे उमेदवार आहेत.

Mahadev Babar
Uddhav Thackeray Exclusive Interview: ठाकरे पुन्हा CM होणार की शिवसैनिकाला CM करणार? VIDEO पाहा

जगताप यांना उमेदवारी जाहीर होताच महादेव बाबर यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला होता. पण त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेल्या महादेव बाबर यांनी अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

"मतदारसंघांमध्ये मला मानणारा शिवसैनिक व मतदारवर्ग मोठा आहे. मी केलेली विकास कामे आणि मतदारांसोबत माझा मोठा संपर्क आहे. अनेक वर्षापासून मतदार संघामध्ये नागरिकांच्या प्रश्नासाठी केलेले आंदोलन यामुळे सार्वजनिक हितांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केला आहे," असे बाबर यांनी साम टिव्हीशीबोलताना सांगितले.

Mahadev Babar
Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांचा मोठा गौप्यस्फोट; परळीत 'तुतारी'च्या नेत्याला मीच फोन लावला...अन्

"गंगाधर बधे यांनी सुद्धा शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहून अनेक नागरिकांच्या मदतीला धावून विविध प्रश्न सोडवण्याचे काम केले.आम्ही दोघेही शिवसैनिक आहोत. त्यामुळे गंगाधर हेच महादेव बाबर आहेत आणि गंगाधर हेच शक्तिमान आहेत. त्यामुळे मतदारांनी गंगाधर बधे यांना महादेव बाबर समजूनच मोठ्या बहुसंख्येने मतदान करावे, असे आवाहन महादेव बाबर यांनी मतदारांना केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com