Nagpur Municipal Elections 2025: चार सदस्यांच्या प्रभागाने वाढले शिवसेना, राष्ट्रवादीचे टेंशन

Nagpur Municipal Elections to Follow Four-Panel Ward Structure : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचे नेते सुरुवातीपासूनच महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधात आहे.
Nagpur Politics
Nagpur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: राज्य सरकारने अखेर चार सदस्यांच्या प्रभागानुसार नागपूर महापालिकेची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे टेंशन वाढले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी कायम राहिली तरच या पक्षांचे राजकीय अस्तित्व कायम राहणार आहे.

नागपूर शहरात भाजप आणि काँग्रेस या दोनच पक्षाचे अस्तित्व आहे. भाजपचे चार तर काँग्रेसचे दोन आमदार आहेत. उद्धव सेनेसाठी विधानसभेच्या निवडणुकीत जागाच सोडण्यात आली नव्हती. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ देण्यात आला होता. मात्र राष्ट्रवादीला सर्वाधिक मतांनी पराभूत व्हावे लागले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचे नेते सुरुवातीपासूनच महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधात आहे.

दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा नागपूरमध्ये काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आघाडी करण्याचे अधिकार आम्ही स्थानिक नेत्यांना दिले असल्याचे जाहीर केले. हे बघता आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेला स्वबळावर लढावे लागणार असल्याचे दिसून येते. भाजपनेही सुरुवातीला महापालिका निवडणुकीच्या संदर्भात स्थानिक नेते जो निर्णय घेतील त्याला मान्यता दिली जाईल, असे सांगितले होते. यात प्रदेशपातळीवर हस्तक्षेप केला जाणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले होते.

Nagpur Politics
Bacchu Kadu: बच्चू कडूंची प्रकृती खालावली; फडणवीसांच्या दौऱ्याआधी 'प्रहार'चे पदाधिकारी नजरकैदेत

भाजपने आता आपल्या म्हणण्यात थोडा बदल केला आहे. महायुती एकत्रित लढले, काही जागांवर एकमत झाले नाही तर मैत्रीपूर्ण लढती होईल, असे सांगून भाजपने सर्व पर्याय खुले ठेवले आहे. भाजपला नागपूरमध्ये मित्रपक्षांची गरज नाही. मागील निवडणुकीत भाजपचे १०८ नगरसेवक निवडूण आले होते. भाजपकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. त्यांना जागा वाटप करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

त्यांच्यासोबत असेलल्या अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेनेकडे एकही माजी नगरसेवक सध्या नाही. शिंदे सेनेने अलीकडे काही माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आधीच दोन तुकडे झाले आहे. जी काही थोडी ताकद होती तीसुद्धा विभागली गेली आहे. हे बघता भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष पुन्हा त्यांना बळकट करण्याची चूक करणार नाही, असेच एकूण चित्र शहरात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com