Shirur Election Results: शिरुरच्या नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा झेंडा,आमदार कटकेंची 'कॉलर' झाली टाईट; अशोक पवारांच्या पॅनेलचा धुव्वा

Shirur Nagar Parishad Election: एकसंध महाविकास आघाडी सुरुवातीला प्रबळ वाटत असताना भाजपनेही चांगले उमेदवार देत मोठी मुसंडी मारली. या सर्वांवर नजर ठेवत, सावध पावले टाकत आमदार कटके यांनी जुन्या - नव्यांची मोट बांधत आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या विजयासाठी जीवाचे रान करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी देत तुल्यबळ पॅनेल दिले.
Dnyneshwar Katke -Ashok Pawar
Dnyneshwar Katke -Ashok PawarSarkarnama
Published on
Updated on

Shirur News: नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच सर्व राजकीय पक्ष मैदानात उतरल्याने झालेल्या बहुरंगी लढतीत अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळविले. या पक्षाला सर्वाधिक 11 जागा मिळाल्या. त्याखालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेसने सात तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाच जागा जिंकल्या. एका अपक्षालाही संधी मिळाली. नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसने(NCP) बाजी मारल्याने आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांची कॉलर ताठ झाली. विधानसभेतील मोठ्या विजयानंतर आमदार कटके यांची विजयी घोडदौड, खरेदी - विक्री संघावरील वर्चस्वानंतर नगर परिषदेच्या विजयाने आणखी वेगवान होण्याची चिन्हे आहेत.

प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या नेतृत्वाखालील शिरूर शहर विकास आघाडीचे 2007 पासून नगरपरिषदेवर एकहाती वर्चस्व होते. मात्र, व्यावसायिक कारणास्तव ते यावेळच्या निवडणुकीतून मागे सरकल्याने दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, भाजप, काँग्रेस, आपसह सर्वच पक्ष आपापल्या चिन्हांवर मैदानात उतरले होते. धारिवाल यांच्या बहुतांश समर्थकांचा सहभाग करून घेत माजी आमदार अशोक पवार यांनी महाविकास आघाडीचा पॅनेल उभा केला. दुसरीकडे महायुतीत बेबनाव झाल्याने भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वतंत्र पॅनेल उभे केले.

एकसंध महाविकास आघाडी सुरुवातीला प्रबळ वाटत असताना भाजपनेही चांगले उमेदवार देत मोठी मुसंडी मारली. या सर्वांवर नजर ठेवत, सावध पावले टाकत आमदार कटके यांनी जुन्या - नव्यांची मोट बांधत आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या विजयासाठी जीवाचे रान करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी देत तुल्यबळ पॅनेल दिले. वर्षभरात केलेली विकासकामे, राज्य सरकारमार्फत शहर विकासासाठी राबवायच्या विकास योजना यांचे प्रभावी मॉडेल त्यांनी मतदारांसमोर मांडले.

निवडणूक काळात शहरातच ठाण मांडून घरोघर फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेत, संवाद साधत, विकासकामांची माहिती देत प्रचार केला.ऐश्वर्या पाचर्णे यांच्या रूपाने मिळालेला प्रबळ उमेदवाराच्या विजयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेने एकाअर्थी शिक्कामोर्तबच केले होते. बारामतीच्या धर्तीवर शिरूर शहराचा वेगवान आणि रचनात्मक विकास करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पाठिशी उभे राहण्याचे अजितदादांनी केलेले आवाहनही मतदारांनी मानले.

Dnyneshwar Katke -Ashok Pawar
Pandharpur Result : भगीरथ भालकेंनी विधानसभेतील पराभवाचे उट्टे काढले; पंढरपुरात प्रणिता भालकेंची 11 हजार मतांनी बाजी

इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी पाच महिला रिंगणात होत्या. प्रत्यक्षात तिरंगी लढत झाली. पाचर्णे या एकमेव मराठा समाजाच्या असल्याने इतर उमेदवारांत ओबीसींच्या मतांची झालेली विभागणीही त्यांच्या पथ्यावर पडली. मराठा कार्डही काही प्रमाणात त्यांना विजयाकडे नेणारे ठरले. उच्चशिक्षित, तरूण चेहरा मतदारांना भावला. भाजपचे अधिक उमेदवार निवडून येण्यास पॅनेलमधील प्रबळ उमेदवारांचा हातभार लागला. नगर परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला.

Dnyneshwar Katke -Ashok Pawar
Ashok Chavan News : अशोक चव्हाणांनी आपली ताकद दाखवली, मुदखेडमध्ये 20 वर्षांनी फुललं कमळ

दिवंगत आमदार बाबुराव पाचर्णे यांनी गेल्या दोन निवडणुका भाजपच्या सच्च्या कार्यकर्त्यांच्या बळावर पक्षाचे स्वतंत्र पॅनेल टाकून बलदंड सत्ताधाऱ्यांशी चांगली झुंज दिली होती. त्यात फारसे यश आले नसले तरी भाजपसाठी (BJP) एक ग्राऊंड तयार झाले. त्याच ग्राऊंडवर भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे व शहर अध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक नेत्या जयश्री पलांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे यांच्याशी समन्वयातून आणि थेट ग्राऊंड लेव्हलच्या मार्गदर्शनातून प्रभावीपणे संयत प्रचार केला.

भाजपचे शहर अध्यक्ष, माजी नगरसेवक नितीन पाचर्णे व माजी नगरसेविका सुनीता कुरंदळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक नीलेश गाडेकर व माजी नगरसेविका संगीता मल्लाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे यांनी विजयश्री प्राप्त केली.

Dnyneshwar Katke -Ashok Pawar
BJP Election News: भाजप ठरला नंबर 1 चा पक्ष; पण विजयाचा गुलाल उधळण्याऐवजी बडा नेता पक्षावरच संतापला

तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष, माजी नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख, माजी नगरसेवक संजय देशमुख, शिवसेनेचे शहर प्रमुख मयुर थोरात यांच्या पत्नी, माजी नगरसेविका अंजली थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शरद कालेवार यांच्या पत्नी, माजी नगरसेविका मनिषा कालेवार यांना पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादीकडून मैदानात उतरलेले नीलेश लटांबळे व विनोद भालेराव या माजी नगरसेवकांनाही पराभवाचे तोंड पाहावे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com